>प्रेरणादायी > ऐसी लगाई दौड! भेटा हरमिलन कौर बेन्सला, नॅशनल रेकॉर्ड तर तोडलेच, पालकांच्या अपेक्षांचा बोजाही भिरकावला..

ऐसी लगाई दौड! भेटा हरमिलन कौर बेन्सला, नॅशनल रेकॉर्ड तर तोडलेच, पालकांच्या अपेक्षांचा बोजाही भिरकावला..

पालकांकडून मिळणारे सततचे सल्ले आणि उपदेश यामुळे हरमिलन कौर बेन्स पार कंटाळून गेली होती. पण ६० व्या राष्ट्रीय ओपन एथलेटिक्स चैंपियनशिप स्पर्धेत ती अशी वेगात धावली की, मागचा रेकॉर्ड तर मोडीत काढलाच आणि.......

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 01:48 PM2021-09-17T13:48:06+5:302021-09-17T13:50:12+5:30

पालकांकडून मिळणारे सततचे सल्ले आणि उपदेश यामुळे हरमिलन कौर बेन्स पार कंटाळून गेली होती. पण ६० व्या राष्ट्रीय ओपन एथलेटिक्स चैंपियनशिप स्पर्धेत ती अशी वेगात धावली की, मागचा रेकॉर्ड तर मोडीत काढलाच आणि.......

Such a race! Meet Harmilan Kaur Bains, who broke the national record, also threw the burden of parental expectations. | ऐसी लगाई दौड! भेटा हरमिलन कौर बेन्सला, नॅशनल रेकॉर्ड तर तोडलेच, पालकांच्या अपेक्षांचा बोजाही भिरकावला..

ऐसी लगाई दौड! भेटा हरमिलन कौर बेन्सला, नॅशनल रेकॉर्ड तर तोडलेच, पालकांच्या अपेक्षांचा बोजाही भिरकावला..

Next
Highlightsआज मी जिंकले आहे कारण कोणत्याही दडपणाशिवाय मी खेळले, असेही हरमिलनने मोठ्या उत्साहात सांगितले. 

हरमिलन कौर बेन्स. पंजाबची ही महिला धावपटू अवघी २१ वर्षांची. सध्या वारंगल येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरु असणाऱ्या ६० व्या राष्ट्रीय ओपन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ती अशी काही धावली की, मागचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढत एक नवा इतिहास घडवला. १५०० मीटरची धाव तिने मोठ्या जिद्दीने ४: ०५: ३९ एवढ्या वेळात पुर्ण केली आहे. अवघ्या एकविसाव्या वर्षी तिने केलेली ही कामगिरी अतिशय कौतूकास्पद आहे. 

 

हरमिलन कौर म्हणजे धावपटू अमनदिप सिंह आणि धावपटू माधूरी सिंह यांची लेक. घरात आई- वडील दोघेही पट्टीचे आणि गाजलेले धावपटू असल्याने हरमिलनवर प्रचंड दडपण होते. आई- वडिलांनी आपापल्या काळात केलेली उत्तम कामगिरी जणू हरमिलनच्या मानगुटीवर येऊन बसली होती. आई- वडिलांनी असं केलं म्हणजे मग आपल्यालाही त्यांच्या वरचढ किंवा त्यांच्या एवढं तरी जमलंच पाहिजे, अशा अनेक जणांच्या अपेक्षा तिच्या डोक्यावर, मनावर नेहमीच थयथय नाचायच्या. तिच्या आईवडीलांनाही तिच्याकडून तशीच अपेक्षा होती. त्यामुळे हरमिलन या अपेक्षांच्या ओझ्याखाली अक्षरश: दबून गेली होती. आता मात्र मी मला हवं तसं जगायला, हवं तेव्हा आणि हवं तितकं धावायला, मोकळी झाले आहे, अशी अतिशय आनंदी आणि उत्साही प्रतिक्रीया हरमिलनने विजयश्री खेचून आणल्यावर व्यक्त केली. तिच्या या प्रतिक्रीयेवरूनच तिच्यावर असणारे अपेक्षांचे ओझे लक्षात येते. 

 

वारंगल येथे ही विजयाची धाव घेत हरमिलनने १५०० मीटर या गटात असणारा तब्बल १९ वर्षांपुर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. यापुर्वी हा विक्रम सुनीता राणी यांच्या नावावर होता. त्यांनी त्यांची धाव ४: ०६: ०३ एवढ्या वेळात पुर्ण केली होती. २००२ साली झालेल्या आशियायी खेळांमध्ये सुनीता राणी यांनी हा विक्रम नोंदविला होता. १५०० मीटर या गटातला विश्व विक्रम ४: ०४: २० एवढ्या वेळात पुर्ण झालेला असून हरमिनलची हा रेकॉर्ड तोडण्याची संधी कमी फरकाने हिरावली गेली असल्याची खंतही काही खेळाडूंकडून व्यक्त केली जात आहे.  

 

मला खेळायचे होते तणावमुक्त
आपल्या मुलीने यशस्वी व्हावे, यशाची अनेक नवीनवी शिखरे सर करावीत, अशी अपेक्षा हरमिलनच्या आईवडीलांची होती, त्यात काहीही गैर नाही. प्रत्येक पालकाला आपल्या अपत्याबाबत असेच वाटत असते. पण यासाठी पालक म्हणून आपली काय भुमिका असावी, हेच अनेक पालकांना कळत नाही. असेच काहीसे हरमिलनच्या पालकांचे झाले होते. त्यात त्यांचं आणि त्यांच्या लेकीचं करिअर एकाच क्षेत्रात असल्याने ही अपेक्षांची धार जरा आणखीनच तेज झाली होती. 
याविषयी सांगताना हरमिलन म्हणते की माझे आई- वडिल माझ्या खेळातल्या प्रत्येक हालचालीचं अगदी बारकाईने निरिक्षण करायचे आणि मग मला सारख्या सूूचना द्यायचे. मी काय करायचं, काय नाही करायचं हे देखील त्यांनी ठरवून टाकलेलं होतं. हे सगळं माझ्यासाठी होतं तरीही ते मला प्रचंड त्रासदायक ठरायचं. याचा माझ्या मनावर खूप परिणाम व्हायचा आणि मग अपेक्षित यश मिळू शकत नव्हतं.

 

अशा प्रकारे हरमिलनने धुडकावून लावले 'पॅरेन्ट्स प्रेशर'
पालकांच्या या सततच्या 'वॉच'चा मला तर खूप त्रास व्हायचाच, पण माझ्या प्रशिक्षकांनाही व्हायचा. म्हणून मग मी एकटीच वारंगळ येथे स्पर्धेसाठी जाण्यास निघाले. माझे पालक जशा सुचना आणि सल्ले मला द्यायचे, तसेच ते माझ्या प्रशिक्षकांनाही देत होते. त्यामुळे एक दिवस अक्षरश: कंटाळून जाऊन माझ्या प्रशिक्षकांनी म्हणजेच सुरेश सैनी यांनी माझ्या पालकांना समजावून सांगितले अणि मला मुक्तपणे, कोणत्याही सुचनांशिवाय खेळू द्या, असा सल्ला दिला. वारंगळ येथे स्पर्धेच्या दोन दिवस आधी माझे बाबा पोहोचले आणि त्यांनी सामान्य प्रेक्षकांप्रमाणे माझा खेळ पाहिला. आज मी जिंकले आहे कारण कोणत्याही दडपणाशिवाय मी खेळले, असेही हरमिलनने मोठ्या उत्साहात सांगितले. 

 

Web Title: Such a race! Meet Harmilan Kaur Bains, who broke the national record, also threw the burden of parental expectations.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.