Lokmat Sakhi >Inspirational > हुंड्यासाठी सासरच्यांनी छळलं, नवऱ्यानं सोडलं! आयएएस अधिकारी होत ‘तिने’ घेतली नवी भरारी-झुगारलं नैराश्य आणि..

हुंड्यासाठी सासरच्यांनी छळलं, नवऱ्यानं सोडलं! आयएएस अधिकारी होत ‘तिने’ घेतली नवी भरारी-झुगारलं नैराश्य आणि..

Success Story Of IRS Officer Komal Ganatra: काही वर्षांपुर्वी ज्या कोमल गनात्रा या तरुणीचा हुंड्यासाठी छळ झाला होता आज तिच आयआरएस अधिकारी झाली आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2024 05:18 PM2024-10-22T17:18:28+5:302024-10-22T17:23:56+5:30

Success Story Of IRS Officer Komal Ganatra: काही वर्षांपुर्वी ज्या कोमल गनात्रा या तरुणीचा हुंड्यासाठी छळ झाला होता आज तिच आयआरएस अधिकारी झाली आहे..

success story of irs officer komal ganatra | हुंड्यासाठी सासरच्यांनी छळलं, नवऱ्यानं सोडलं! आयएएस अधिकारी होत ‘तिने’ घेतली नवी भरारी-झुगारलं नैराश्य आणि..

हुंड्यासाठी सासरच्यांनी छळलं, नवऱ्यानं सोडलं! आयएएस अधिकारी होत ‘तिने’ घेतली नवी भरारी-झुगारलं नैराश्य आणि..

Highlightsपहिल्या प्रयत्नात अपयश आलेच. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळीही यशाने त्यांना हुलकावणी दिली.

'कोशिश करनेवालोंकी कभी हार नही होती है..' या ओळी मेहनत करणाऱ्या प्रत्येकासाठीच अगदी समर्पक आहेत.. आज आयआरएस अधिकारी म्हणून उत्तम कामगिरी करत असणाऱ्या आणि आजुबाजुच्या कित्येक तरुणींसाठी आदर्श असणाऱ्या कोमल गनात्रा यांची गोष्टही तशीच.. कोमल या मुळच्या गुजरातमधील अमरेली या जिल्ह्यातल्या. वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचं लग्न एका एनआरआय तरुणाशी मोठ्या थाटामाटात पार पडलं. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच त्या माणसाचं, त्याच्या घरच्यांचं खरं रुप समोर आलं आणि त्यांनी कोमल यांचा हुंड्यासाठी छळ सुरू केला. हुंडा मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर अवघ्या काही आठवड्यातच त्यानी कोमलला सोडून दिलं आणि न्युझिलंड येथे जो पळून गेला तो आजतागायत आलेला नाही.(Success Story Of IRS Officer Komal Ganatra)


 

नवरा अशा पद्धतीने निघून गेल्यानंतर कोमल पुन्हा माहेरी आल्या. आता नुकतीच लग्न झालेली तरुण मुलगी सासरी नांदायचं सोडून माहेरी राहते आहे हे पाहून शेजारचे, नातलग तिला आणि घरच्यांना टोमणे मारू लागले. या त्रासाने कंटाळून कोमल आणि तिचे कुटूंबिय शेवटी त्यांच्या मुळ गावाला परत गेले. तिथे कोमल यांनी प्राथमिक शिक्षिका म्हणून काम सुरु केले. तेव्हा त्यांना ५ हजार रुपये महिना मिळायचा.

Diwali 2024: कुणालाही सहज हातावर काढता येतील अशा ८ मेहेंदी डिझाइन्स- सोप्या-सुंदर-लेटेस्ट आणि झटपट

पण हे त्यांचं ध्येय नव्हतं. जेव्हा पती त्यांना सोडून गेला होता, तेव्हा त्याला अद्दल घडविण्यासाठी त्यांनी अनेक सरकारी कार्यालयांमध्ये दाद मागून मदत मिळविण्याचा प्रयत्न केला होता. पण प्रत्येकवेळी अपयश आले होते. ही खदखद कुठेतरी मनात होतीच. त्यामुळे मोठी पोस्ट घेऊन सरकारी नोकरी मिळवायची आणि थोडा का होईना पण सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायचा, असा त्यांचा मानस होता. त्यातूनच मग त्यांनी युपीएससी परीक्षेची तयारी करायची ठरवली.

पाहा दीपिका पादुकोणचं ब्यूटी सिक्रेट! फक्त ४ स्टेप्स- दिवाळीपर्यंत त्वचेवर येईल सोनेरी तेज

ज्या खेडेगावात त्या राहात होत्या तिथे ना कोणते इंग्रजी वर्तमानपत्र यायचे ना कुठे इंटरनेटची सुविधा होती. पण तरीही त्यांनी प्रयत्न केले. नेटाने जमेल तसा अभ्यास केला. मात्र पहिल्या प्रयत्नात अपयश आलेच. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळीही यशाने त्यांना हुलकावणी दिली. याचा त्यांना ताण आला असणारच. नैराश्यही आले असणार.. पण तरी त्यांनी ते कुरवाळले नाही. पुन्हा एकदा जोमाने तयारीला लागल्या आणि अखेर चाैथ्या प्रयत्नात म्हणजेच २०१२ साली उत्तम रॅकिंग मिळवून आयआरएस म्हणून नियुक्त झाल्या. कधीकाळी त्यांना टोमणे मारणाऱ्या लोकांच्या मुलींसाठीच आज त्या एक आदर्श ठरल्या आहेत.. यश हे यापेक्षा वेगळं काय असू शकतं नाही का?

 

Web Title: success story of irs officer komal ganatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.