इच्छा शक्ती प्रबळ असेल तर अख्ख जगही जिंकता येतं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.(riddhima paul) सध्या मुली विविध क्षेत्रात काम करताना, स्वत:ची नव्याने ओळख निर्माण करण्यासाठी दिवसरात्र अभ्यास-मेहनत घेतात.(IIT Student) पण जसजसा काळ बदलतोय तसतशी परिस्थिती देखील सुधारताना दिसत आहे. मुलीदेखील स्वत:च्या करिअरसाठी अधिक मेहनत घेताना दिसतं आहेत.(wheelchair student success) अशाच एका मुलीबद्दल जाणून घेऊया, जिने अथक परिश्रम करुन आयआयीटमध्ये संधी मिळवली. (inspiring IIT story)
आयआयटीमध्ये संधी मिळणं खरंतर कठीण आणि आव्हानात्मकच असते. पण रिद्धीमा पॉलने जेईईची परीक्षा पास करुन आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश मिळवला. जन्मापासूनच स्पाइनल मस्क्युलर ॲट्रोफी (एसएमए) नावाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रिद्धिमाने कधीही हार मानली नाही. तिचे स्वप्न जगण्याचे धाडस कायम ठेवले. तिला चालता येत नाही, व्हिलचेअरवर आहे. पण तिचे मन आणि धाडस इतरांपेक्षा कमी नाही. तिने सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहिले आणि लवकरच ते सत्यात उतरणार नाही.
लहानपणापासूनच शिकण्याची जिद्द
रिद्धिमा म्हणते की तिचं बालपण इतरांपेक्षा वेगळं होतं. तिला खेळण्याची संधी मिळाली नाही, परंतु ती नेहमीच अभ्यासात हुशार होती. तिच्या कुटुंबाने नेहमीच तिचे मनोबल कधीही ढळू दिले नाही. आजारी असून देखील तिने बारावीत चांगले गुण मिळवले. ती म्हणते प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी एक आव्हान घेऊन येतो. फक्त शारीरिक समस्याच नाही तर मानसिक ताकद देखील महत्त्वाची असते. कधीकधी परिस्थिती इतकी कठीण होते की, पुढे जाणं देखील कठीण वाटतं. जेव्हा आपल्याला कुटुंबाची साथ मिळते, तेव्हा आपलं स्वप्न सहज मिळते.
गव्हाची चपाती पौष्टिक होण्यासाठी पिठात कालवा ५ पदार्थ, १ सोपी ट्रिक- चपाती होईल मऊसुत- टम्म फुगेल..
तिने घरबसल्या ऑनलाइनद्वारे जेईईची तयारी केली. कधीकधी वीज किंवा इंटरनेटची समस्या येत असे, पण कधी हार मानली नाही. मेहनत आणि परिश्रमाच्या जोरावर आयआयटी कानपूरमध्ये निवड झाली. भारतात स्पाइनल मस्क्युलर ॲट्रोफीवर उपचार पूर्णपणे उपलब्ध नाहीत. या आजारात स्नायू हळूहळू काम करणं थांबवतात. या आजारांवर उपचार घेण्यासाठी तिला परदेशात देखील जावं लागलं. यावेळी तिला बॉलिवूड अभिनेत्रीची मुलगी मेघनाने मदत करण्याच आश्वासन दिलं. त्यानंतर सोशल मीडियावरुन अनेकांनी मदतीचा हात दिला. ती म्हणते माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी अपंग असणाऱ्या लोकांसाठी सॉफ्टवेअर अॅप्स बनवेल. जे शारीरिकदृष्ट्या त्यांना मदत करतील. या तंत्रज्ञानाचा वापर केवळ नफा मिळवण्यासाठी नाही तर समाजात बदल घडवण्यासाठी करेन.
तिची ही कहाणी अनेक मुलींसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या जिद्दीला सलाम करण्यासारखी आहे. जर आपल्याकडे देखील जिद्द असेल तर स्वप्न साकार करु शकतो.