Join us  

तो ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकला आणि वेड्यासारखा एका मुलीला शोधत निघाला, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 12:17 PM

Olympic gold medallist tracks down volunteer : सुवर्णपदक विजेता उपांत्य फेरीच्या नियोजित दिवशी चुकीच्या बसमध्ये चढला.

ठळक मुद्देहा  व्हिडीओ व्हायरल झाल्या झाल्या १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला. त्या मुलीला शोधण्यासाठी त्यानं खूप प्रयत्न केले कारण तिचं नाव काय, कुठे राहते याबाबत काहीही कल्पना नव्हती.

दयाळूपणात मोठी शक्ती असते हे आज ऑलिम्पिक चॅम्पियन हंसले पर्चमेंटनं (Jamaican athlete Hansle Parchment)  सगळ्यांना दाखवून दिलं. जमैकन खेळाडूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 110 मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. दरम्यान या सामन्यासाठी येताना चुकीची बस पकडल्यानं तो शर्यतीच्या ठिकाणीही पोहोचला नाही. असं पर्चमेंटनं या आठवड्याच्या सुरुवातीला शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले. सुवर्णपदक विजेता उपांत्य फेरीच्या नियोजित दिवशी चुकीच्या बसमध्ये चढला. गाणी ऐकण्यात मग्न असताना पर्चमेंट चुकून टोकियोच्या ऑलिम्पिक स्टेडियमऐवजी जलचर क्षेत्रात गेला.

तो म्हणाला की, ''मी चुकीच्या बसमध्ये बसून चुकीच्या ठिकाणी गेलो.  कारण मी गाणी ऐकत होतो. बसमध्ये चढणारे लोक काय बोलत आहेत याची मला कल्पना नव्हती. मी चुकीच्या बसमध्ये चढलोय हे लक्षात आल्यावर एकच पर्याय शिल्लक होता तो म्हणजे योग्य ठिकाणी जाणं. जर मी असं केलं नसतं तर सामन्यासाठी वेळेत पोहोचलो नसतो.'' हा  व्हिडीओ व्हायरल झाल्या झाल्या १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला. 

पुढे त्यानं सांगितलं की, ''अशावेळी एका अनोळखी व्यक्तीकडून मला मदत मिळाली. एका स्वयंसेवक मुलीनं मला इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी पैसै दिले. तेच पैसे मी कॅब चालकाला देऊन स्टेडिअममध्ये पोहोचलो आणि स्पर्धेसाठी सराव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळवू शकलो.''

एका खऱ्या चॅम्पियनप्रमाणे, पर्चमेंट त्या मुलीला विसरला नाही. त्या मुलीला शोधण्यासाठी त्यानं खूप प्रयत्न केले कारण तिचं नाव काय, कुठे राहते याबाबत काहीही कल्पना नव्हती. तिचं नाव त्रिजाना स्टोजकोविक असल्यांच कळलं. जेव्हा ती त्याला पुन्हा दिसली तेव्हा तो म्हणाला, मी आठवतोय का तुला? मला तुला परतफेड करायची आहे आणि काहीतरी दाखवायचे आहे. 

त्याच्या बॅगेतून सुवर्णपदक बाहेर काढताना तो म्हणाला, "त्या दिवशी अंतिम फेरी गाठण्यात तू मला मदत केली यात तुझा मोलाचा वाटा होता." यावर, त्रिजाना स्टोजकोविकने उत्तर दिले, '' खरंच? तुम्ही हे जिंकलात? यावर तो म्हणाला "फक्त तुम्ही मला मदत केली म्हणून,", नंतर पर्चमेंटनं तिला फोटो काढण्यासाठी विनंती केली. 

त्याने उधार घेतलेले पैसे तिला परत करून टी-शर्टही भेट दिला. व्हिडीओ शेअर करताना पर्चमेंटनं लिहिले, ''नेहमी कृतज्ञ राहण्याची आठवण ... जपानी लोक तुम्ही सर्वात चांगले आहेत. धन्यवाद माझ्या मित्रा,'' या पोस्टमध्य त्यानं त्रिजाना स्टोजकोविकलाही टॅग केले. व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त करताना आठ वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलेल्या उसैन बोल्टने धन्यवाद म्हणत इमोजी पोस्ट केल्या आहेत. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीभारत ऑलिंपिक 2021जपान