lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Inspirational > कोंकणा सेन शर्मा म्हणते, बायकांनी आपल्या पायावर उभं राहावं, नवरा श्रीमंत असेल पण...

कोंकणा सेन शर्मा म्हणते, बायकांनी आपल्या पायावर उभं राहावं, नवरा श्रीमंत असेल पण...

Konkana Sen on the importance of being financially independent : हातात स्वत:चा पैसा असेल तर तुम्ही काही निर्णय स्वत: घेऊ शकता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2024 03:28 PM2024-01-02T15:28:07+5:302024-01-02T15:30:07+5:30

Konkana Sen on the importance of being financially independent : हातात स्वत:चा पैसा असेल तर तुम्ही काही निर्णय स्वत: घेऊ शकता.

Konkana Sen on the importance of being financially independent : Konkona Sen Sharma Says Wives Should Stand On Their Feet, Husband May Be Rich But... | कोंकणा सेन शर्मा म्हणते, बायकांनी आपल्या पायावर उभं राहावं, नवरा श्रीमंत असेल पण...

कोंकणा सेन शर्मा म्हणते, बायकांनी आपल्या पायावर उभं राहावं, नवरा श्रीमंत असेल पण...

शिक्षण, नोकरी, पैसा कमावणे हे आता बहुतांश महिलांसाठी सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र आजही लग्न झाल्यावर घरचं सगळं चांगलं आहे मग नोकरीची काय गरज. मूल झाल्यावर त्याला नीट वाढवण्यासाठी,  कुटुंबाला वेळ देणं जास्त महत्त्वाचं असल्यानं तिने नोकरी नाही केली तरी चालेल अशा मानसिकतेत आजही अनेक पुरुष किंवा कुटुंबातील इतर मंडळी दिसतात. पैसा कमावला तर महिला आपल्या पुढे जाईल किंवा तिचा रुबाब वाढेल असा या लोकांचा समज असतो. त्यामुळे शिक्षण, ज्ञान असूनही नोकरी न करणाऱ्या किंवा करु न दिल्या जाणाऱ्या बऱ्याच जणी आपल्या आजुबाजूला असतात (Konkana Sen on the importance of being financially independent). 

पैसा मिळवायचा म्हणून प्रमाणापेक्षा जास्त ओढाताण करुन कोणतीच गोष्ट करु नये. हे जरी खरे असले तरी समाजात वावरत असताना प्रत्येक व्यक्ती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असायला हवी. आपल्याला जे येतं, जे आवडतं ते काम करुन आपण आपल्याला शक्य तितका पैसा अवश्य कमवायला हवा असं प्रसिद्ध अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हिचे म्हणणे आहे. She The People या चॅनेलला आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा हा एका मुलाखतीतला व्हिडिओ पोस्ट केला आहे.  या मुलाखतीत नुकतेच तिने आपले महिलांनी आर्थिक स्वावलंबी असण्याविषयीचे मत मोकळेपणाने व्यक्त केले.

ती म्हणते, "तुमच्या हातात पैसा असेल तर तुम्हाला पर्याय उपलब्ध राहतात. हातात स्वत:चा पैसा असेल तर काही  निर्णय घेणे तुमच्यासाठी नक्कीच सोपे होते.  नाहीतर मला हे करायचं, ते करायचं होतं, पण जमलंच नाही असं होण्याची शक्यता कमी असते. काहीवेळा घरातील लोकांचा पाठिंबा नसतो, पुरेसं शिक्षण नसतं त्यामुळे नोकरी करता येत नाही. पण तरीही प्रत्येकीने काही ना काही करुन पैसा कमावयलाच हवा. कारण गाठीशी पैसे नसतील तर महिलांचे शारीरिक, भावनिक शोषण आणि आर्थिकरित्या शोषण होण्याची शक्यताच जास्त असते." त्यामुळे घरची परिस्थिती चांगली असेल, आर्थिकदृष्ट्या आपल्याला नोकरीची तितकी गरज नसेल तरीही आत्मसन्मान आणि स्वावलंबन या गोष्टींसाठी तरी प्रत्येकीने स्वत:च्या पायावर उभे राहायला हवे. 
 

Web Title: Konkana Sen on the importance of being financially independent : Konkona Sen Sharma Says Wives Should Stand On Their Feet, Husband May Be Rich But...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.