Lokmat Sakhi >Inspirational > लहानशी लेक सांभाळत कोनेरु हम्पीचं दणक्यात पुनरागमन, बुद्धिबळाच्या पटावर सांगतेय आपला दावा हक्कानं

लहानशी लेक सांभाळत कोनेरु हम्पीचं दणक्यात पुनरागमन, बुद्धिबळाच्या पटावर सांगतेय आपला दावा हक्कानं

Women grandmasters of India: Koneru Humpy inspiring story: Chessboard comeback after becoming a mom : कोनेरु हम्पी उपांत्य फेरीत पोहचणारी पहिली भारतीय बुद्धिबळपटू महिला खेळाडू ठरली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2025 17:52 IST2025-07-23T17:49:14+5:302025-07-23T17:52:02+5:30

Women grandmasters of India: Koneru Humpy inspiring story: Chessboard comeback after becoming a mom : कोनेरु हम्पी उपांत्य फेरीत पोहचणारी पहिली भारतीय बुद्धिबळपटू महिला खेळाडू ठरली.

Koneru Humpy comeback Chess World Cup 2025 koneru humpy fide women's world cup First Indian Woman to Reach Semifinals inspirational story | लहानशी लेक सांभाळत कोनेरु हम्पीचं दणक्यात पुनरागमन, बुद्धिबळाच्या पटावर सांगतेय आपला दावा हक्कानं

लहानशी लेक सांभाळत कोनेरु हम्पीचं दणक्यात पुनरागमन, बुद्धिबळाच्या पटावर सांगतेय आपला दावा हक्कानं

भारतीय ग्रँडमास्टर कोनेरु हम्पीने जॉर्जियातील बटुमी येथे खेळल्या जाणाऱ्या FIDE महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करुन इतिहास रचला.(fide women's world cup) उपांत्य फेरीत पोहचणारी पहिली भारतीय बुद्धिबळपटू महिला खेळाडू ठरली. उपांत्यपूर्व फेरीत तिने चीनच्या सॉन्ग युक्सिनला हरवले.(Chess World Cup 2025 ) या स्पर्धेत दिव्या देशमुखसुद्धा उपांत्य फेरीत पोहोचली आहे.(Koneru Humpy inspiring story) दोन भारतीय महिला खेळाडू एकाच वेळी उपांत्य फेरीत पोहोचल्या. लहान लेक सांभाळत हम्पीने केलेलं हे पुनरागमन फार महत्वाचं.(Chessboard comeback after becoming a mom)

आकाशदीप आणि अखंडज्योती, जगण्याचा संघर्ष करणाऱ्या भावाबहिणीच्या प्रेमाची डोळ्यात पाणी आणणारी गोष्ट

भारतीय बुद्धिबळ विश्वातलं एक तेजस्वी आणि प्रेरणादायी नाव म्हणून कोनेरु हम्पी. आंध्र प्रदेशातील एका मध्यमवर्गीय घरातून आलेली ही मुलगी. अफाट मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर तिने जागतिक स्तरावर स्वत:ची ओळख निर्माण केली. वडिलांना बुद्धिबळ खेळण्याची आवड होती. नोकरी आणि घरातील इतर जबाबदाऱ्यांमुळे त्यांना पूर्णवेळ खेळाडू म्हणून कारकीर्द घडवता आली नाही. मुलीला लहानपणापासून बुद्धीबळाची आवड असल्यामुळे त्यांनी तिच्या स्वप्नांना पंख दिले. तिच्या बुद्धिबळ कौशल्याची झलक त्यांना लहानपणापासूनच जाणवली आणि त्यांनी तिच्या पाऊलांना आधार दिला. 

शांत दिसणारी हम्पी बुद्धिबळाच्या पटावर मात्र आक्रमक आणि निर्भीडपणे खेळताना दिसते. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी ग्रँडमास्टर म्हणून ती जगातील सर्वात तरुण महिला ग्रँडमास्टर बनली. तिने अनेक पदकं आणि गौरव मिळवून भारताचे नाव उंचावले. पालकांचा त्याग, त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत हम्पीनं विविध वयोगटातून आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली. 

संसार, मातृत्व या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत तिने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन केलं. ही गोष्ट अनेक महिलांसाठी स्फूर्तिदायक उदाहरण आहे. आज कोनेरु हम्पी ही केवळ बुद्धिबळपटू नाही तर अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यावर मात करुन शिखर गाठता येतं. तिला पाहून लाखो मुलींना स्वप्नं बघण्याचं आणि ते पूर्ण करण्याचं बळ मिळतं.

Web Title: Koneru Humpy comeback Chess World Cup 2025 koneru humpy fide women's world cup First Indian Woman to Reach Semifinals inspirational story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.