Lokmat Sakhi >Inspirational > ग्रँडमास्टर हम्पीने उंचावली भारताची मान, नववर्षाला सुवर्णपदकाची झळाळी - पाहा तिची कामगिरी

ग्रँडमास्टर हम्पीने उंचावली भारताची मान, नववर्षाला सुवर्णपदकाची झळाळी - पाहा तिची कामगिरी

Koneru Hampy Created History : सलग दोनवेळा सुवर्णपदक मिळवत ग्रँडमास्टरने इतिहास रचला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2024 12:15 IST2024-12-30T21:51:25+5:302024-12-31T12:15:28+5:30

Koneru Hampy Created History : सलग दोनवेळा सुवर्णपदक मिळवत ग्रँडमास्टरने इतिहास रचला.

Koneru Hampy Created History | ग्रँडमास्टर हम्पीने उंचावली भारताची मान, नववर्षाला सुवर्णपदकाची झळाळी - पाहा तिची कामगिरी

ग्रँडमास्टर हम्पीने उंचावली भारताची मान, नववर्षाला सुवर्णपदकाची झळाळी - पाहा तिची कामगिरी

२०२४ संपता-संपता एक अत्यंत अभिमानास्पद बातमी मिळाली आहे.(Koneru Hampy Created History ) 'हमारी छोरी किसीसे कम नही' च्या ट्रेंडमध्ये अजून एका महिलेचे नाव नमूद झाले. आंध्रप्रदेशच्या कोनेरू हम्पी हिने २९ डिसेंबर २०२४ ला न्यूयॉर्क येथे झालेल्या वुमन्स वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक पटकवले आहे.(Koneru Hampy Created History ) अंतिम फेरीत इंडोनेशियाच्या इरीन सुकंदरवर मात करून हा ऐतिहासिक विजय मळविला आहे.  

२०१९ सालीसुद्धा कोनेरू हम्पीने जॉर्जिया येथे संपन्न झालेल्या रॅपिड चेसमध्ये  विजय प्राप्त केला होता.(Koneru Hampy Created History ) सलग दोनदा विजय मिळवणारी ती पहिली भारतीय महिला बुद्धिबळ पटू ठरली आहे. गुकेशने पुरूष गटाचे प्रतिनिधीत्त्व करतं भारताचे नाव उंचावले. त्याच पाठोपाठ आता महिला बुद्धिबळ खेळाडूंसाठी कोनेरू हम्पी एक आदर्श ठरली आहे. कोनेरू हम्पीचे नाव जागतिक महिला बुद्धिबळपटूंमध्ये दुसर्‍या क्रमांकावर येते.(Koneru Hampy Created History ) या अभूतपूर्व यशाचे श्रेय कुटुंबियांना देताना ती म्हणाली,"कुटुंबियांच्या सहकार्याशिवाय हा विजय मिळवणं शक्य नव्हतं. श्रेय आई-वडि‍लांचे आहे."       

कोनेरू हम्पीने सिद्ध केले की तिला उगाचचं ग्रॅडमास्टर हम्पी म्हणत नाहीत. वयाच्या ३७व्या वर्षी तिने हे यश पटकवले आहे. पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर खचलेल्या कोनेरूला ती पुढच्या फेरीत जाईल अशीही अपेक्षा उरली नव्हती. मात्र अशा मनस्थितीत असूनसुद्धा पुढील फेरी तर सोडाच, ती चॅम्पियनशीपचं जिंकून आली. सर्वांसाठीच ती एक आदर्श आहे. शारीरिक खेळांबरोबरच बौद्धिक खेळांतही भारतीय महिला आघाडीवर आहेत.   

ती २००२ साली वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी  ग्रँडमास्टर ही पदवी मिळवणारी आत्तापर्यतची सर्वात लहान महिला बुद्धिबळपटू ठरली. एवढंच नाही तर ही पदवी मिळवणारी ती पहिली महिला आहे. कोनेरू हम्पीला ए.पी.जे अब्दुल कलामांच्याहस्ते २००७ साली पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. आत्तापर्यंत कोनेरू हम्पीने अनेक पुरस्कार पटकवले आहेत. ज्युडिट पोल्गार नंतर २६०० एलो गुणांचा पल्ला गाठणारी दुसरी महिला ठरली.हम्पी वयाच्या ६व्या वर्षी बुद्धिबळाची आवड तिच्या वडि‍लांमुळे लागली होती. या आवडीने पुढे जाऊन विक्रम घडवून आणला आहे.

 

 

 

 

 

 

 

Web Title: Koneru Hampy Created History

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.