Lokmat Sakhi >Inspirational > बहिणीमुळे मिळाली प्रेरणा!कठोर परिश्रम घेत तनुश्री झाली IPS ऑफिसर, काश्मीरमधे देश सेवेसाठी रुजू- लग्नानंतर स्वप्न साकार

बहिणीमुळे मिळाली प्रेरणा!कठोर परिश्रम घेत तनुश्री झाली IPS ऑफिसर, काश्मीरमधे देश सेवेसाठी रुजू- लग्नानंतर स्वप्न साकार

IPS Tanu Shree biography: IPS Tanu Shree inspirational story: civil services success after marriage: माझी बहिण आणि आई-वडील माझ्यासाठी प्रेरणा आहे. आज मी जे काही आहे ते फक्त त्यांच्यामुळेच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2025 18:05 IST2025-06-03T18:00:00+5:302025-06-03T18:05:02+5:30

IPS Tanu Shree biography: IPS Tanu Shree inspirational story: civil services success after marriage: माझी बहिण आणि आई-वडील माझ्यासाठी प्रेरणा आहे. आज मी जे काही आहे ते फक्त त्यांच्यामुळेच...

ips officer tanu shree served as ssp and sp in jammu Kashmir crack civil services after marriage inspired by her sister inspirational story | बहिणीमुळे मिळाली प्रेरणा!कठोर परिश्रम घेत तनुश्री झाली IPS ऑफिसर, काश्मीरमधे देश सेवेसाठी रुजू- लग्नानंतर स्वप्न साकार

बहिणीमुळे मिळाली प्रेरणा!कठोर परिश्रम घेत तनुश्री झाली IPS ऑफिसर, काश्मीरमधे देश सेवेसाठी रुजू- लग्नानंतर स्वप्न साकार

लग्न झाल्यानंतर चूल आणि मुलं ही प्रथा आजही आपल्याला पाहायला मिळते. एकदा का लग्न झालं की अनेक स्त्रिया घर सांभाळण्यात व्यस्त होतात.(IPS Tanu Shree biography) यामुळे त्यांची किती तरी स्वप्न मागे पडताना पाहायला मिळतात.(IPS Tanu Shree inspirational story) पण त्यातही काही महिला अशा असतात ज्या जिद्दीमुळे आपलं स्वप्न साकार करतात.(civil services success after marriage) अशीच एक महिला जिने सरकारी नोकरी आणि लग्नानंतरही यूपीएससीचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द सोडली नाही. कठोर परिश्रम घेत, मेहनतीच्या बळावर तनुश्री आयपीएस अधिकारी  बनली. (Tanu Shree IPS journey)

२४ एप्रिल १९८७ ला तनुश्रीचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण घेऊन तिने दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून बीए हिस्ट्री ऑनर्सची पदवी प्राप्त केली. पदवी पूर्ण झाल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु केली. आणि त्यासाठी तिने कठोर परिश्रम करायला सुरुवात केली. 

आता थांबायचं नाय! मैत्रिणींचा सल्ला अन् जेईई सोडली, NDA कॅडेट हरसिमरन कौरच्या शौर्याची कहाणी

बहिणीला पाहून मिळाली प्रेरणा 

तनुश्री म्हणते की, माझी मोठी बहिण मनुश्री ही सीआरपीएफमध्ये कमांडंर आहे. तिला ड्रेसमध्ये पाहून मला देखील देशासाठी काही तरी करावं अशी इच्छा मनात आली. तेव्हाच मी ठरवलं आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करु लागली. तिचे वडील हे सीआरपीएफमधून निवृत्त डिआयजी आहेत. 

सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंर 

२०१४ मध्ये तनुश्री सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंर म्हणून कार्यरत झाली. २०१५ साली तिचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर देखील तनुश्रीने आयीपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द दाखवली. कुटुंब आणि नोकरी सांभाळत तिने २०१६ साली यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. २०१७ मध्ये आयपीएस अधिकारी म्हणून तिची निवड करण्यात आली. तिच्या यशाचे श्रेय ती नेहमीच आपल्याला पालकांना आणि बहिणीला देते. सीआरपीएफ अधिकारी होण्यापासून ते आयपीएस ऑफिसर होण्यापर्यंत तिला अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले. तिची दृढ इच्छा शक्ती आणि परिश्रम करण्याची जिद्द तिला इथंपर्यंत घेऊन आली असं देखील तिने म्हटलं. 

वयाच्या सोळाव्या वर्षी स्तनात झाली गाठ, कॅन्सरशी लढली आणि.. मिस वर्ल्ड झालेल्या तरुणीची कहाणी..

देश सेवेसोबतच ती तिच्या कुटुंबाची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळते. इतकेच नाही तर ती आई होण्याच्या अनुभवातूनही जात आहे. दोन महिन्यापूर्वीच तिने तिच्या मुलासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तनुश्रीन जम्मू -काश्मीरमधील शोपियानसारख्या भागात एसएसपी म्हणूनही काम केले. सध्या ती एसपी एसआयअए म्हणून काश्मीरमध्ये कार्यरत आहे. 

Web Title: ips officer tanu shree served as ssp and sp in jammu Kashmir crack civil services after marriage inspired by her sister inspirational story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.