आजही अशी अनेक क्षेत्र आहेत जिथे महिलांचा समावेश फार कमी प्रमाणात दिसतो. त्यांना संधी कमी मिळतात आणि त्या क्षेत्रात जाण्याची मानसिक तयारी किंवा इच्छा मुळात महिलांचीही कमीच असते. (IPL auction 2026: The hammer that will change the fate of 369 players is in the hands of a woman this year, who is the auctioneer Mallika Sagar?)पण हळूहळू चित्र बदलू लागते आणि या क्षेत्रात आपणही काम करु शकतो. असा आत्मविश्वास महिलांमध्ये येऊ लागतो. तो असाच एकाएकी जादूने नाही तर कोणातरी एकीच्या पाऊल उचलल्याने येतो. सध्या व्यवसायिक असो, खेळ असो किंवा कला असो सगळ्या क्षेत्रात महिला कार्यरत आहेत.
भारतात मोठ्या प्रमाणावर विविध खेळांच्या भव्य लिग्ज होत असतात. प्रो. कबड्डी, आयपीएल सारख्या विविध मोठ्या देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या लिग्जसाठी लिलाव म्हणजेच ऑक्शन केले जाते. त्यात विविध संघ मालक खेळाडूंवर बोली लावतात. हा ऑक्शनचा कार्यक्रम प्रत्यक्ष सामन्याएवढाच मनोरंजक असतो. हा कार्यक्रम शांततेत आणि चांगला पार व्हावा याची जबाबदारी ऑक्शनरची असते. शांतता, आत्मविश्वास, कोट्यवधींच्या बोली, प्रेशर, वातावरणातील तामतणाव सांभाळत ऑक्शनर त्याचे काम करत असतो. या क्षेत्रात वर्षानुवर्षे पुरुषांचे वर्चस्व राहीले आहे. अशा स्थिती महिला सांभाळू शकत नाहीत असे दावेही अनेकांनी केले. मात्र या सगळ्या दाव्यांना खोटे ठरवत मुंबईतील मलिका सागर यांनी महिलाही उत्तम ऑक्शनर होऊ शकते. हे सिद्ध केले.
क्रिकेट, कबड्डी किंवा इतर क्रीडा लिलाव म्हटले की आजवर बहुतेक वेळा पुरुष ऑक्शनरच समोर दिसत होते. पण ही परंपरा मोडत मलिका सागर या महिलेने क्रीडा लिलावांच्या जगात आपले वेगळे स्थान निर्माण केले. तिने कला इतिहास (Art History) या विषयाचे शिक्षण घेतले असून सुरुवातीला ती आर्ट ऑक्शनच्या क्षेत्रात कार्यरत होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याचा अनुभव, बोली लावण्याची शिस्त, वेळेचे भान आणि अचूक निर्णयक्षमता या सगळ्या गोष्टींचा उपयोग तिला पुढे क्रीडा ऑक्शनमध्ये झाला. कला क्षेत्रातील लिलाव हाताळल्यानंतर तिने क्रीडा क्षेत्राकडे वाटचाल केली आणि इथेच तिच्या कामाची दखल मोठ्या प्रमाणात घेतली गेली. मोठाल्या ऑक्शन्सचे प्रतिनिधित्व करणारी पहिली महिला म्हणून तिचे नाव नोंदवले गेले. प्रो. कबड्डी, WPL,IPL मिनी ऑक्शन आणि आता IPL इतरही अनेक कार्यक्रम हाताळणारी आणि या क्षेत्रात एक स्त्री नक्कीच असू शकते हे सिद्ध करणारी ठरली.
