Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Inspirational > Sheetal Devi : जिद्दीला सलाम! जन्मापासूनच नाही दोन्ही हात, तिरंदाजीत मात्र अव्वल- भारतीय संघात प्रवेश, काश्मिरी कन्येची कहाणी

Sheetal Devi : जिद्दीला सलाम! जन्मापासूनच नाही दोन्ही हात, तिरंदाजीत मात्र अव्वल- भारतीय संघात प्रवेश, काश्मिरी कन्येची कहाणी

Sheetal Devi archery: Indian archer Sheetal Devi: Inspiring story of Sheetal Devi : जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या शीतल देवीचे स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे.वर्षभरातच तिच्या जिद्दीने भारतीय संघात प्रवेश मिळवला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2025 13:16 IST2025-11-07T13:15:21+5:302025-11-07T13:16:49+5:30

Sheetal Devi archery: Indian archer Sheetal Devi: Inspiring story of Sheetal Devi : जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या शीतल देवीचे स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे.वर्षभरातच तिच्या जिद्दीने भारतीय संघात प्रवेश मिळवला.

Inspiring journey of Sheetal Devi from disability to becoming India’s top archer Born without arms but now representing India the story of Sheetal Devi | Sheetal Devi : जिद्दीला सलाम! जन्मापासूनच नाही दोन्ही हात, तिरंदाजीत मात्र अव्वल- भारतीय संघात प्रवेश, काश्मिरी कन्येची कहाणी

Sheetal Devi : जिद्दीला सलाम! जन्मापासूनच नाही दोन्ही हात, तिरंदाजीत मात्र अव्वल- भारतीय संघात प्रवेश, काश्मिरी कन्येची कहाणी

आपण आपल्या स्वप्नांच्या मागे वेड्यासारखे धावायला लागलो तर कुणीही आपल्याला थांबवू शकत नाही.(Sheetal Devi archery) काही लोक जगाला दाखवतात की प्रतिभेला शरीराची, परिस्थितीची किंवा मर्यादांची गरज नसते. पण आपल्याकडे धैर्य आणि जिद्ध असेल तर काहीही करु शकतो.(qualifies for India's able-bodied) अशीच कहाणी आहे काश्मिरी कन्या शितला देवीची. हे नाव आज भारताच्या क्रीडा इतिहासात, आपल्या हृदयात जिद्दीने उजळून निघत आहे. (Inspiring story of Sheetal Devi)
जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या शीतल देवीचे स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे.(archery team for Asia Cup) मागच्या वर्षी  'कौन बनेगा करोडपती' या टेलिव्हिजन शोमध्ये तिने सर्वोच्च स्तरावर स्पर्धा करण्याची मनापासून इच्छा व्यक्त केली. आणि वर्षभरातच तिच्या जिद्दीने भारतीय संघात प्रवेश मिळवला.
(Disability to strength stories) शारीरिक अडचणींचा डोंगर पार करून, स्वतःच्या शरीराच्या मर्यादांपलीकडे जाऊन, जगाने अशक्य म्हटलेलं शक्य करण्याची ताकद या मुलीने दाखवून दिली. (Kashmiri archery champion)

राष्ट्राध्यक्षांची भररस्त्यात छेड काढली जाते,घाणेरडे स्पर्श होतात, कोण म्हणतं महिला सुरक्षित आहेत?

जेद्दाह येथे होणाऱ्या आगामी आशिया कप स्टेज ३ साठी शीतला देवीची भारतीय एबल- बॉडी ज्युनियर संघात निवड झाली आहे. कोणत्याही भारतीय पॅरा- अॅथलीटसाठी ही ऐतिहासिक कामगिरी आहे. एबल-बॉडी ज्युनियर संघात समावेश होणारी ती पहिली भारतीय पॅरा- आर्चर बनली. संघात निवड झाल्यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट टाकली. "जेव्हा मी खेळायला सुरुवात केली, तेव्हा माझे छोटेसे स्वप्न होते. एक दिवस सक्षम तिरंदाजांशी स्पर्धा करण्याचे. सुरुवातीला मला यश मिळाले नाही, पण मी कधीही हार मानली नाही; मी प्रत्येक पराभवातून शिकले. आज, त्या स्वप्नाच्या एक पाऊल जवळ आले आहे."

हरियाणातील सोनीपत येथे झालेल्या राष्ट्रीय निवड चाचण्यांमध्ये एकाच वेळी ६० पेक्षा जास्त सक्षम धनुर्धारींविरुद्ध स्पर्धा करताना १८ वर्षीय शीतलने चार दिवसांच्या स्पर्धेनंतर तिसरे स्थान पटकवले. पात्रता फेरीत तिने एकूण ७०३ गुण (३५२+३५१) मिळवले. कटरा येथील श्री माता वैष्णदेवी श्राइन बोर्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये शिक्षण घेणाऱ्या शीतलने पॅरा-तिरंदाजीमध्ये हात नसलेली पहिली महिला विश्वविजेती बनून इतिहास रचला आहे. तिचा हा प्रवास काही सोपा नव्हता. पायाने धनुष्याला स्पर्श करायचा नाही असं देखील तिला सांगण्यात आलं. पण योग्य प्रशिक्षण आणि कोचच्या मदतीने तिने पुन्हा नव्याने सुरुवात केली. या काळात तिचे पाय दुखायचे पण हार न मानता ती जिद्दीने प्रयत्न करायची. 

तिला अनेकांकडून टोमणे मिळाले, सामने गमावले, तुझी वेळ संपली असंही तिला ऐकवण्यात आलं. पण या टिकांकडे दुर्लक्ष करत तिने प्रशिक्षणाकडे लक्ष दिलं. सप्टेंबरमध्ये, ती ग्वांगझूमध्ये पॅरा वर्ल्ड कंपाउंड चॅम्पियन बनली. अनेकदा दिव्यांग असणाऱ्यांना आपल्या समाजाकडून हिणवलं जातं, कमी लेखलं जातं, तु हे करु शकत नाहीस असं म्हणून मागेही खेचले जाते. पण मर्यादा या शरीराला असल्या तरी जिद्द राखून मनाने पुढे गेलो तर आपल्यासाठी काहीच अशक्य नाही. 

 


Web Title : शीतल देवी: जज्बे को सलाम! बिना हाथों की तीरंदाज भारतीय टीम में, कश्मीरी कहानी

Web Summary : कश्मीरी तीरंदाज शीतल देवी, जो बिना हाथों के पैदा हुईं, ने बड़ी बाधाओं को पार किया। शीतल को एशिया कप के लिए भारतीय सक्षम जूनियर टीम में चुना गया है, ऐसा करने वाली पहली पैरा-आर्चर बनकर एक ऐतिहासिक उपलब्धि हासिल की है। उनकी दृढ़ता सभी को प्रेरित करती है।

Web Title : Sheetal Devi: Saluting Grit! Armless Archer Joins Indian Team, a Kashmiri Story

Web Summary : Kashmiri archer Sheetal Devi, born without arms, overcame immense obstacles. Sheetal has been selected for the Indian able-bodied junior team for the Asia Cup, achieving a historic feat as the first para-archer to do so. Her determination inspires all.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.