Join us  

Inspirational Stories : कमाल! इंजिनिअरींगचं पूर्ण शिक्षण घेतलं; अन् ३५ व्या वर्षी डॉक्टर झाली; जबरदस्त टर्निंग पॉईंटची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 3:09 PM

Inspirational Stories : जास्त ताण आल्यानं अनेकदा ती आजारीही पडली. यामुळे तिला हार्मोनल असंतुनलाचा त्रासही झाला. नाईलाजानं तिला कोरोनाकाळात नोकरी सोडावी लागली.

लहानपणापासून मला मोठं झाल्यावर या प्रोफेशनमध्ये काम करायचंय, डॉक्टर, पायलट व्हायचंय अशी स्वप्न प्रत्येकानं पाहिलेली असतात. पण सगळ्यांचीच स्वप्न पूर्ण होतातच असं नाही. मेरीट लिस्ट, आजूबाजूची स्थिती, सोयी सुविधांचा अभाव अशा अनेक कारणांमुळे लोक आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाहीत. सगळ्यांसाठीच प्रेरणादायी ठरेल अशी एका तरूणीची करीयरला कलाटणी देणारी कहाणी समोर आली आहे. (Mumbai engineer shifts gears hopes to be doctor at 35)

वयाच्या २९ व्या वर्षी  आकृती गोयल नावाच्या तरूणीनं आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. BITS Pilani मधून इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त होती. पण नेहमीच तिला आपलं स्वप्न असलेल्या प्रोफेशनमध्ये काम करावसं वाटायचं. आपल्या आरोग्यविषयक करिअरची सुरूवात करण्यासाठी जवळपास २ वर्ष तिनं १४-१५ तास अभ्यास करण्यात घालवले. जास्त ताण आल्यानं अनेकदा ती आजारीही पडली. यामुळे तिला हार्मोनल असंतुनलाचा त्रासही झाला. नाईलाजानं तिला कोरोनाकाळात नोकरी सोडावी लागली.

तब्येतीचा त्रास उद्भवल्यानंतर एका वर्षानंतर तिनं पूर्ण तयारीनं आपल्या करीअरच्या दुसऱ्या वर्जनसाठी कष्ट घ्यायला सुरूवात केली. यादरम्यान तिनं NEET परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी स्वत:ला झोकून दिलं. या परिक्षेत तिनं आश्चर्यकारक यश संपादन करत देशात १११८ वी श्रेणी मिळवली. मुंबईची आकृती गोयल नीट परिक्षेत टॉपर ठरली. आता आकृती गोयल एका आघाडीच्या सरकारी संस्थेत रुजू होण्यास तयार आहेत आणि ती कदाचित वयाच्या   ४० व्या वर्षी सर्जन होईल.

 पन्नाशीत बिझनेस सुरू करून श्रीमंतांच्या पंक्तीत बसल्या; नायर ताईंचा बिझनेस सुरू करणाऱ्या महिलांना सल्ला

''आयुष्यात कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी वयाचा अडथळा नसावा. या रूढीवादी समजुतीवर आपला अधिक विश्वास असतो. जे झालं ते झालं आपण पुन्हा करीअर स्टार्ट करू शकत नाही. असा विचार केला जातो. त्यातून जर तुम्ही महिला असाल तर अधिकच कठीण असतं. लोक ३०, ४०, ५० वयातही काहीही करू  शकतात. तुमच्या आयुष्यातील ध्येय शोधण्यासाठी  उशीर झालाय असं कधीच समजू नये.'' असं ठाण्यातील रहिवासीयांची सांगितलं. 

आकृतीला MNC मध्ये काम करणे कधीच आवडले नाही. तिला लहान प्रोजेक्ट्समध्ये काम करायचं होतं. ''मी 9 ते 5 मध्ये काम करणारी व्यक्ती नाही," असं म्हणत तिने 2015 मध्ये तिच्या कॅम्पस प्लेसमेंटची निवड रद्द केली.  तिने स्वतः काहीतरी प्रयोग करायचे ठरवले. सुरूवातील छोटं पाऊल उचलत तिने ANO मध्ये नोकरी शोधली आणि काही दिवसात ANO आघाडीवर पोहोचवले.

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीमहिला