एजबेस्टन कसोटी सामना भारतानं जिंकला, आकाशदीपने कमाल बॉलिंग केली. आणि नंतर त्यानं सांगितली बहिणीच्या आजारपणाची गोष्ट. (india tour of England) तिला आनंद व्हावा म्हणून खेळावं असं ठरवून या भावानं पाटा खेळपट्टीवर कमाल कामगिरी केली. कॅन्सरवर मात करण्यासाठी जगण्याची लढाई लढणारी त्याची बहीणही धिराची, तिनंही भावाला सांगितलं की माझी काळजी करु नकोस. (Akashdeep sister suffering from third stage of cancer) तू तुझ्या खेळावर लक्ष दे. मानसिक -शारीरिक वेदना परीक्षा पाहत असताना या भावाबहिणीने किती कमालीच्या हिमतीने जगण्याचा संघर्ष सुरु ठेयला आहे. (Brother sister love)
शाबास! आईबाप करतात मजुरी, लोकांनी बुटकी म्हणून हिणवलं-तिनं आयआयटी मुंबईत प्रवेश मिळवला आणि..
आकाशदीपचे वडील अकाली गेले. त्यामागोमाग दोन महिन्यात भाऊ गेला. दोन बहिणी आणि आईसह तो आपल्या जगण्यात सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतच होता तोवर बहिणीला कॅन्सरने गाठलं. गेले दोन महिने ती उपचार घेते आहे. सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना आकाशदीपची बहीण अखंड ज्योती सिंहने सांगितलं की आकाश दीपने १० विकेट्स घेतल्या ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी मी त्याला भेटायला विमानतळावर गेले होते. त्याला मी ठामपणे बजावून सांगितले की, मी पूर्णपणे ठीक आहे. माझी काळजी करु नकोस, तू देशासाठी खेळ. मला कॅन्सर झाला असला तरी असली तरी डॉक्टरने सांगितले आहे आणखी सहा महिने उपचार सुरु राहतील. त्याची कामगिरी हीच माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्याने त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची कामगिरी मला समर्पित केली. भावाचं एवढं प्रेम हीच तर ताकद आहे. तो नेहमी मला सांगतो मी इथेच आहे, काळजी करण्याची गरज नाही. मला कल्पना नव्हती की, आकाश असं काही मीडियासमोर सांगेल. ही गोष्ट माझ्यासाठी फार मोठी आहे आणि तो माझ्यासह कुटुंबावर खूप प्रेम करतो. अशा परिस्थितीतही तो खेळतोय हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे.’
२०२५ च्या आयपीएल मॅच दरम्यान लखनऊ संघाकडून आकाश खेळत होता, तेव्हा त्याला बहिणीला कर्करोग झाल्याचे समजले. त्या काळातही तो तिला भेटायला जायचा. अशी माया करणारा कर्तबगार भाऊ लाभला हीच किती मोठी गोष्ट आहे.