Lokmat Sakhi >Inspirational > जिद्दीला सलाम! माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अंध महिला, सिद्ध केलं-स्वप्न पहायला डोळ्यांची गरज नाही..

जिद्दीला सलाम! माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अंध महिला, सिद्ध केलं-स्वप्न पहायला डोळ्यांची गरज नाही..

Chhonzin Angmo Mount Everest: Visually impaired Indian woman Everest: First blind Indian woman Everest summit: माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर तिरंगा फडकवणारी ती भारतातील पहिली अंध महिला ठरली आहे. त्याच वेळी ती जगातील पाचवी अंध गिर्यारोहक बनली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2025 17:47 IST2025-05-23T17:47:20+5:302025-05-23T17:47:54+5:30

Chhonzin Angmo Mount Everest: Visually impaired Indian woman Everest: First blind Indian woman Everest summit: माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर तिरंगा फडकवणारी ती भारतातील पहिली अंध महिला ठरली आहे. त्याच वेळी ती जगातील पाचवी अंध गिर्यारोहक बनली आहे.

himachal pradesh lady chhonzin angmo first visually impaired indian women climb | जिद्दीला सलाम! माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अंध महिला, सिद्ध केलं-स्वप्न पहायला डोळ्यांची गरज नाही..

जिद्दीला सलाम! माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अंध महिला, सिद्ध केलं-स्वप्न पहायला डोळ्यांची गरज नाही..

आपल्यात जिद्द असेल तर आपण काहीही करु शकतो असं म्हटलं तर चुकीच ठरणार नाही. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी देखील म्हटलं आहे, 'स्वप्न माणसाला झोपू देत नाही'. आपली स्वप्न पूर्ण करायची असतील तर त्यासाठी तितकीच मेहनत देखील लागते. अशीच एक गोष्ट आहे हिमाचल प्रदेशातील महिलेची. (Visually impaired Indian woman Everest) नेत्रहीन असून तिने माऊंट एव्हरेस्ट सर केला. (Himachal Pradesh woman Everest climb)
हिमाचल प्रदेशातील किन्नोर जिल्ह्यातील हंग्रांग खोऱ्यातील छोट्या पाड्यात राहणारी छोंझिन अंगमो ने इतिहास रचला आहे.(Chhonzin Angmo Mount Everest) माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर तिरंगा फडकवणारी ती भारतातील पहिली अंध महिला ठरली आहे. त्याच वेळी ती जगातील पाचवी अंध गिर्यारोहक बनली आहे. (Women empowerment India)

केस गळून झाडूसारखे पातळ झाले? आजीचा खास उपाय, केसवाढीसाठी जादुई पोटली- महिन्याभरात केस झरझर वाढतील


२९ वर्षाच्या छोंझिन अंगमो ला आपली दृष्टी वयाच्या आठव्या वर्षी गमवावी लागली. औषधांच्या इन्फेक्शनमुळे तिला आपले डोळे गमवावे लागले परंतु, तरी देखील तिने हार पत्करली नाही. माध्यामांशी बोलताना ती म्हणाली जेव्हा मी एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवले तेव्हा माझ्या मनात पहिला विचार आला की, जीवनातील प्रत्येक पाऊल किती महत्त्वाचे आहे. मग त्यावेळी तुम्ही फक्त सामान्य व्यक्ती आहात की दिव्यांग हे महत्त्वाचं नाही. हे माझ्या प्रवासातील महत्त्वाचे पाऊल आहे आणि माझे उद्दिष्ट फक्त दिव्यांग लोकांना प्रेरित करण्याचे आहे. त्यासाठी आपली इच्छाशक्ती फक्त प्रबळ असायला हवी. ती प्रबळ असेल तर आपल्याला कुणीही रोखू शकत नाही. माझे ध्येय इतकेच जगातील सगळे शिखर सर करणे. 

छोंझिन अंगमो म्हणते माझा आदर्श हेलेन केलर आहे, तिची पुस्तके आणि चरित्र वाचून मला जगण्याची दिशा मिळाली. माझं संपूर्ण कुटुंब मला पाठिंबा देते. माझ्या अंधत्वामुळे मला अनेकांनी टोमणे मारले पण कुटुंबाने मला नेहमीच पाठिंबा दिला. तिचे वडील शेतकरी आहेत. ते म्हणतात की, माझी मुलगी एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही, माऊंट एव्हरेस्ट चढताना तिला पाहणे हा संपूर्ण गावासाठी खास क्षण होता. तिने कधीही हार मानली नाही. दृष्टी गेल्यानंतरही तितक्याच जिद्दीने तिने शिक्षण पूर्ण केले. अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगमधून बेसिक माउंटेनियरिंग कोर्स पूर्ण केला. 

कौतुकास्पद! परिस्थिती बेताची; आदिवासी पाड्यातील लेक झाली 'एअर होस्टेस', आई-वडिलांच्या कष्टाचं चीज

तिची गिर्यारोहणाची आवड पाहून ऑक्सिजनशिवाय माउंट एव्हरेस्ट चढणारे पहिले भारतीय नागरिक स्कालजुंग रिग्झिन यांचे मार्गदर्शन मिळाले.तर रिग्झिन म्हणाले, "छोंझिन अंगमोमध्ये एक वेगळीच इच्छाशक्ती आहे, जी तिला नेहमी वर जाण्यास प्रोत्साहन करेल."

या ऐतिहासिक मोहिमेचे प्रायोजकत्व युनियन बँक ऑफ इंडियाने केले होते आणि त्याची तयारी बूट्स अँड क्रॅम्पन्स आणि पायोनियर अ‍ॅडव्हेंचर्स यांच्या सहकार्याने करण्यात आली होती. त्याने प्रथम माउंट लोबुचे (६,११९ मीटर) चढाई केली आणि नंतर माउंट एव्हरेस्ट चढण्यास सुरुवात केली. दृष्टीहीन असून माऊंट एव्हरेस्ट चढणारी पहिली भारतीय हिला ठरल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

Web Title: himachal pradesh lady chhonzin angmo first visually impaired indian women climb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.