Join us

५ सवयी स्वत:ला लावून घ्या, समोरच्यावर पडेल इम्प्रेशन- सगळेच तुम्हाला म्हणतील 'स्मार्ट क्लासी वुमन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2025 17:40 IST

5 Habits Of Classy Woman: समोरच्यावर आपलं छान इम्प्रेशन पडावं असं वाटत असेल तर या काही सवयी स्वत:ला लावून घ्या..

ठळक मुद्देउगाच जोरजोरात बोलून आपलं म्हणणं तावातावात मांडून समोरचा इंम्प्रेस होत नसतो. त्यामुळे उलट समोरच्याचं आपल्याविषयीचं मत आणखी खराब होतं.

काही महिला अशा असतात की त्यांची आणि आपली मुळीच ओळख नसते. अशाच कुठेतरी, कधीतरी त्या आपल्या अचानक समोर आलेल्या असतात. त्यांच्याशी आपण एक अक्षरही बोललेलो नसतो. फक्त त्यांच्या काही कृती आपण दुरून बारकाईने पाहिलेल्या असतात. पण तरीही त्या महिलांची एक वेगळीच प्रभावी छाप आपल्या मनात कायम घर करून राहाते. त्या महिलेची एक वेगळीच आदरयुक्त इमेज आपल्या डोक्यात तयार झालेली असते. असं काय वेगळं असतं बरं त्या महिलांमध्ये ज्यामुळे त्या चारचौघींमध्ये चटकन उठून दिसतात? त्यांना पाहणाऱ्या प्रत्येकाचंच लक्ष वेधून घेतात? त्यांचं तेच वेगळेपण आता आपण पाहूया..(5 Habits Of Classy Woman)

 

स्मार्ट, क्लासी महिलांमध्ये असणारे ५ गूण

१. एटिकेट्स आणि मॅनर्स असणं खूप गरजेचं आहे. अनेकजणी खूप शिकलेल्या असतात. पण प्रत्येकाशी कसं वागावं याचं त्यांना भान नसतं. तुमच्या वागण्यात एक मृदूता असायला हवी. त्यामुळे समोरच्याचं मन तुम्ही आपोआप जिंकून घेऊ शकता.

बांधणी ब्लाऊजची नवी फॅशन!! ७ सुंदर डिझाईन्स- असं एखादं ब्लाऊज आपल्या कलेक्शनमधे हवंच..

२. सॉफ्ट स्पोकन म्हणजेच आपलं म्हणणं योग्य शब्दांत, योग्य भाषेत आणि आवाजाच्या योग्य पीचमध्ये दुसऱ्यांपर्यंत पाेहोचवता आलं पाहिजे. उगाच जोरजोरात बोलून आपलं म्हणणं तावातावात मांडून समोरचा इंम्प्रेस होत नसतो. त्यामुळे उलट समोरच्याचं आपल्याविषयीचं मत आणखी खराब होतं.

 

३. आपले कपडे आणि इतर ॲक्सेसरीज यावर नेहमी लक्ष द्या. कपड्यांची निवड अधिक चोखंदळपणे करा. कारण आपले कपडे पाहूनच समोरचा आपल्या बद्दलची पहिली इमेज त्याच्या डोक्यात तयार करत असतो. कपड्यांसोबतच तुमच्या ॲक्सेसरीजवर सुद्धा लक्ष द्या. तुमच्याकडे मोजक्याच ॲक्सेसरीज असल्या तरी चालेल. पण त्या उत्तम दर्जाच्या असाव्या.

कुरळ्या केसांची काळजी कशी घ्यावी? आलिया भट, नीता अंबानींचे हेअर स्टायलिस्ट सांगतात ४ टिप्स

४. सकारात्मक विचार असणं खूपच गरजेचं आहे. कारण बहुतांश लोकांना अशाच व्यक्ती आपल्या आसपास हव्या असतात ज्यांच्यामध्ये सकारात्मकता असेल, ज्यांच्या बोलण्याने किंवा कृतीतून समोरच्याला नवी उमेद मिळेल. कायम रडत, कुढत राहणाऱ्या व्यक्ती नकोशा वाटतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक, आनंदी राहण्यावर भर द्या. 

 

५. स्वत:कडे लक्ष द्यायला हवं. आपल्या कामातून वेळ काढून स्वत:कडे लक्ष द्या. स्वत:कडे लक्ष देणं म्हणजे टाईमपास करणं नसतं. तर स्वत:वर केलेली ती टाईम इन्व्हेस्टमेंट असते. त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी होण्यासाठी मदतच होते.

गोड खाण्याची इच्छा झाल्यास 'हे' पदार्थ खा! वजन वाढणार नाही, तब्येतही होईल ठणठणीत

स्वत:साठी काढलेल्या वेळेतून काहीतरी चांगलं वाचा, तुमच्या आवडीचं काम करा. तुमचा छंद जोपासा किंवा अगदी पार्लरमध्ये जाऊन स्वत:वर थोडा खर्च करा.. या सगळ्या गोष्टींमुळे नक्कीच तुम्हाला तुमचा आनंद मिळेल. तुम्हाला आणखी पॉझिटीव्ह वाटेल 

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीब्यूटी टिप्सस्टायलिंग टिप्समहिला