Lokmat Sakhi >Inspirational > गणपती उत्सव विशेष : शेतातलं काम करत ‘तिने’ साकारलेल्या गणेश मुर्तीची गोष्ट, महिला मूर्तीकारांच्या कलेला कष्टांची साथ

गणपती उत्सव विशेष : शेतातलं काम करत ‘तिने’ साकारलेल्या गणेश मुर्तीची गोष्ट, महिला मूर्तीकारांच्या कलेला कष्टांची साथ

Ganpati Festival Special: It's her story, she created Ganesh idol while working in farm and looking after family : गणपती उत्सव विशेष : कला आणि महिला १ : कल्पकता आणि कष्ट यांच्या जोरावर साकारणारी सुंदर कला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2025 08:05 IST2025-08-27T08:00:00+5:302025-08-27T08:05:06+5:30

Ganpati Festival Special: It's her story, she created Ganesh idol while working in farm and looking after family : गणपती उत्सव विशेष : कला आणि महिला १ : कल्पकता आणि कष्ट यांच्या जोरावर साकारणारी सुंदर कला!

Ganpati Festival Special: It's her story, she created Ganesh idol while working in farm and looking after family | गणपती उत्सव विशेष : शेतातलं काम करत ‘तिने’ साकारलेल्या गणेश मुर्तीची गोष्ट, महिला मूर्तीकारांच्या कलेला कष्टांची साथ

गणपती उत्सव विशेष : शेतातलं काम करत ‘तिने’ साकारलेल्या गणेश मुर्तीची गोष्ट, महिला मूर्तीकारांच्या कलेला कष्टांची साथ

चैताली मेहेंदळे

गणपतीची मूर्ती घडवणं सोपं काम नसतं. त्यातही डोळे. ते डोळे जिवंत वाटणं, गणेशाच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न भाव साकारणंही सोपं नसतं. अनेक वर्षे हे काम पुरुषप्रधान मानलं गेलं. अनेक उत्तम मूर्तीकारांच्या हाताखाली महिला काम करत पण महिला मुर्तीकार आणि तिचं उत्तम काम यांना आदर मिळणं, त्यांच्या कलेचा सन्मान होणं ही गोष्ट घडायलाही वेळ लागली. (Ganpati Festival Special: It's her story, she created Ganesh idol while working in farm and looking after family  )पण कलेची देवता असलेल्या गणपतीच्या मूर्तीकारांच्या वाट्याला ते सुखाचे दिवस आले आणि आता महाराष्ट्रभर अनेक महिला मूर्तीकार आहेत. ज्या उत्तम मूर्ती घडवतात आणि आपली कलासेवा बाप्पाचरणी अर्पण करतात. त्याच मूर्तीकारांपैकी एक फलटणजवळच्या साखरवाडीत राहणाऱ्या एका महिला मूर्तीकाराची ही गोष्ट.
फलटणच्या साखरवाडी या ठिकाणी राहणाऱ्या  शीतल समीर कुंभार गेली १४ वर्षे गणपतीची मूर्ती स्वत: घडवतात. स्वत: रंगवतात. लहानपणापासूनच शीतलला काही ना काही रंगवण्याची किंवा मातीच्या वस्तू करण्याची आवड होती. शेतात पेरणी ते कापणी सगळी कामं करुन, घरसंसार, एकत्र कुटुंब असं सारं छान सांभाळून तिनं आपला हा छंदही जोपासला. 


शीतल सांगते, ‘ एकत्र परिवार असल्यामुळे घरच्यांची फार मदत होते.  गेली अनेक वर्षे मी गणपती तयार करते आहे. मला मूर्ती घडवायला आवडतात, ते काम करताना मला कधीही थकवा-कंटाळा येत नाही. एकअर्थी मी देवाची सेवाच करते आहे. मूर्ती तयार करणे म्हणजे फक्त कला नाही तर एक जबाबदारी असते. ती निभावण्याची ताकद हाताला बाप्पाच देतो!’ 
याच विश्वासानं घडवलेल्या शीतलच्या मूर्ती म्हणून वेगळ्याही दिसतात आणि सुंदरही!
साच्यातून मुर्ती घडवण्याचा हा सोपा काळ आहे, सगळं एकसाची दिसतं. मात्र हातानं मूर्ती घडवणं सोपं नसतं, रंगवणं तर त्याहून सोपं नसतं. त्यासाठी हाताला शिस्त लागते आणि कलात्मकताही. कष्ट तर भरपूर असतातच पण वेळेचंही बंधन असतं. ही सारी व्यवधानं सांभाळून मूर्ती घडवल्या जातात आणि त्यातून साकारलेलं प्रसन्न रुप सुंदरही दिसतं. कलेत हीच तर ताकद असते.

Web Title: Ganpati Festival Special: It's her story, she created Ganesh idol while working in farm and looking after family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.