Lokmat Sakhi >Inspirational > गणपती उत्सव विशेष : वयाच्या चाळिशीत ढोल पथकात सहभाग, लोकांनी मारले टोमणे तरी कलेचा हात सोडला नाही..

गणपती उत्सव विशेष : वयाच्या चाळिशीत ढोल पथकात सहभाग, लोकांनी मारले टोमणे तरी कलेचा हात सोडला नाही..

Ganpati Festival Special: age is just a number, women can do anything, story of a dhol vadak : गणपती उत्सव विशेष : कला आणि महिला २ : आपल्याला जे आवडतं ते करावं, कला आनंदच देते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2025 08:05 IST2025-08-28T08:00:00+5:302025-08-28T08:05:01+5:30

Ganpati Festival Special: age is just a number, women can do anything, story of a dhol vadak : गणपती उत्सव विशेष : कला आणि महिला २ : आपल्याला जे आवडतं ते करावं, कला आनंदच देते!

Ganpati Festival Special: age is just a number, women can do anything, story of a dhol vadak | गणपती उत्सव विशेष : वयाच्या चाळिशीत ढोल पथकात सहभाग, लोकांनी मारले टोमणे तरी कलेचा हात सोडला नाही..

गणपती उत्सव विशेष : वयाच्या चाळिशीत ढोल पथकात सहभाग, लोकांनी मारले टोमणे तरी कलेचा हात सोडला नाही..

चैताली मेहेंदळे

आपणही ढोलपथकात जावं, ढोल वाजवावा, गणपतीतले दहा दिवस बाकी सारं विसरुन करावं ढोल वादन असं अनेकजणींना वाटतं. पण ते सोपं कुठं असतं काम-घरकाम-वय आणि जमणार आहे का आपल्याला ही भीती असं बरंच काही वाटेत अडथळा म्हणून उभं असतं आणि मनातली इच्छा मनातच रहून जाते. (Ganpati Festival Special: age is just a number, women can do anything, story of a dhol vadak )पण हे सारं तुमचीही वाट अशीच अडवत असेल तर संध्या भालके त्यांचं नाव! त्याची ही गोष्ट वाचा..


मुलींना कुठे ढोल उचलता येतो? चालायचे वांदे होतात ? झेपतो तरी का ? असे विविध प्रश्न महिला वादकांना विचारले जातात. पण महाराष्ट्रातल्या अनेक मुली फार आवडीने ढोल वाजवतात. त्यांचा उत्साह पाहून समोरच्यालाही आपणही असे काहीतरी शिकावे अशी भावना निर्माण होते. आवडीला वयाचे बंधन नाही. एखादी कला जोपासताना सारे विसरुन त्यात दंग होता आले पाहिजे. अशाच एक उत्साही वादक म्हणजे डोंबिवलीच्या संध्या भालके. संसार, मुलं स्वतःचा व्यवसाय सांभाळत त्या गेली बारा वर्षे ढोल वादन करत आहेत.
संध्याताईंचे वय आता ५२ वर्षे आहे. त्यांचा मुलगाही ढोल वाजवतो. दोघं मायलेक उत्तम ढोल वादन करतात.
संध्याताईंना विचारलं की, या वयातही कंबरेला तो ढोल बांधून तासंतास वाजवण्याची शक्ती कुठून येते?
त्या म्हणतात, ‘जे करण्यात आनंद मिळतो ते करण्यासाठी ताकद आणावी लागत नाही, ती आपोआप येते! महिलांनी आपली आवड जपली पाहिजे. कोणी टोमणे मारत असेल तर आपले कान बंद करा!’
संध्याताईंचे पतीही त्यांना कला जोपासण्यासाठी अगदी मनापासून प्रोत्साहन देतात. पोटाला त्रास होईल, या वयात हे तिला शोभत नाही असे कोणी बोलत असेल तर ताईंचे कुटुंब ठामपणे त्यांच्या बाजूने उभे राहते. त्या डोंबिवलीत एक लहानसा कपड्यांचा व्यवसायही सांभाळतात. घर, दुकान सारे सांभाळून त्या स्वतःसाठी काहीतरी करायचे म्हणून आवड जोपासतात. चाळिशीत असताना त्यांनी प्रथम ढोल पथकात सहभाग घेतला. झांज वाजवली, ध्वज नाचवला आणि आता त्या ढोलही उत्तम वाजवतात.
आपल्याला जे आवडतं ते करावं याचंचं हे उदाहरण.

Web Title: Ganpati Festival Special: age is just a number, women can do anything, story of a dhol vadak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.