Lokmat Sakhi >Inspirational > गणपती उत्सव विशेष 2025 : महिलांनी व्हायला हवं फिट आणि करावं स्वत:ला स्ट्रॉँग म्हणून हाती घेतला मुदगर!

गणपती उत्सव विशेष 2025 : महिलांनी व्हायला हवं फिट आणि करावं स्वत:ला स्ट्रॉँग म्हणून हाती घेतला मुदगर!

गणपती उत्सव विशेष 2025 : कला आणि महिला ४ : महिलांचं आरोग्य हा फार महत्वाचा विषय, मुदगर वापरुन फिटनेसचा मार्ग शोधणारा एक खास क्लब.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2025 17:39 IST2025-08-29T17:38:20+5:302025-08-29T17:39:15+5:30

गणपती उत्सव विशेष 2025 : कला आणि महिला ४ : महिलांचं आरोग्य हा फार महत्वाचा विषय, मुदगर वापरुन फिटनेसचा मार्ग शोधणारा एक खास क्लब.

Ganpati Festival Special 2025: Women should get fit and make themselves strong | गणपती उत्सव विशेष 2025 : महिलांनी व्हायला हवं फिट आणि करावं स्वत:ला स्ट्रॉँग म्हणून हाती घेतला मुदगर!

गणपती उत्सव विशेष 2025 : महिलांनी व्हायला हवं फिट आणि करावं स्वत:ला स्ट्रॉँग म्हणून हाती घेतला मुदगर!

Highlightsसौंदर्यात्मक सुधारणा,चांगले क्रीडा प्रदर्शन किंवा सुधारित आरोग्याचे ध्येय ठेवत असाल तर मुदगर उत्तम साधन आहे.

प्राची देवस्थळी (मॅराथॉनर, फिटनेस एक्सपर्ट)

मुदगर या व्यायामाचे उल्लेख प्राचीन भारतीय साहित्यामध्ये सुद्धा आढळतात. गदा आणि मुदगर ही़ प्राचीन भारतामध्ये युद्धांमध्ये वापरली जाणारी शस्त्रे होती, ती शक्ती आणि अधिकाराचे प्रतीकही समजले जात असे. त्यापैकी गदा हे प्रत्यक्ष युद्धामध्ये शस्त्र म्हणून वापरले जाई तर मुदगर हे योद्धांसाठी साठी एक प्रशिक्षणाचे साधन देखील होते. देशभरात आखाडे आणि व्यायाम शाळांमध्ये आजही मुदगरचा व्यायाम केला जातो. मुदगर म्हणजे एक विशिष्ट आकाराचे लाकडी दंडगोलाकार किंवा बाटलीच्या आकाराचे डंबेल सारखे दिसणारे व्यायाम प्रकाराचे एक साधन होय. मुदगर हे पारंपारिक पद्धतीने बाभळीच्या झाडाच्या लाकडापासून बनवले जाते. मुदगर ही डोक्यावरून क्लाॅकवाईज आणि अँटिक्लॉकवाईज दिशेने फिरवली जाते. आम्ही तिघींनी म्हणजेच वैशाली सावळे, शिल्पा सोनार आणि प्राची देवस्थळी यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये 'मुदगर शक्ती क्लब' ची स्थापना केली. ऑनलाईन माध्यमातून प्रॅक्टिस सुरू केली. त्यांनी पाच किलोच्या मुदगरपासून सुरुवात करून आता दहा किलो मुदगरपर्यंत क्षमता वाढवली आहे.

 

महिलांसाठी या उपकरणाचे प्रशिक्षण वर्ग  नाशिकमध्ये अनेक ठिकाणी घेतले. प्रत्येक प्रशिक्षण वर्गात महिलांनीही त्याला उत्तम प्रतिसाद दिला. महिलांना शारीरिक दृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे हे या प्रशिक्षणात प्रत्येकीला जाणवत होते. या प्रशिक्षण वर्गांमध्ये सुरुवातीला पंधरा मिनिटांचे मुदगरचे प्रात्यक्षिक दाखवले जाते त्यात एका हाताची परिक्रमा, दोन्ही हाताची परिक्रमा,लंजेस,सिक्वेन्स, स्विंग इत्यादी अनेक मुव्हज् केल्या जातात.

ज्येष्ठा- कनिष्ठा गौरींसाठी झटपट तयार करा सुंदर बॅकड्रॉप- ७ डेकोरेशन आयडिया, आरास होईल मस्त

त्यामुळे हे प्रशिक्षण विशेष आकर्षक बनते. मुदगरच्या या वर्गांमध्ये व्यायामासाठी प्रशिक्षण सूचना दिल्या जातात, जसे हलके वॉर्मअप, योग्य पकड आणि नियंत्रित हालचाली, योग्य तंत्रावर लक्ष केंद्रित करणे, हळूहळू वजन वाढवणे, संतुलित दिनचर्या इत्यादी तसेच सर्वोत्तम मुदगर कसा निवडायचा हेही सांगितले जाते.
मुदगरचे हे सर्व व्यायाम शरीराला अधिक लवचिक आणि गतिशील बनवतात,सांध्यांच्या समस्या कमी होतात, कोअरची ताकद(Core strength ), फिरणाऱ्या हालचाली(Rotational)मुळे वाढते. मुदगरचा जाड दांडा पकड मजबूत करतो. हा व्यायाम (cardiovascular strength) साठी उत्तम आहे हृदयाची क्षमता वाढते आणि रक्तप्रवाह सुधारतो. ज्यामुळे हृदय निरोगी राहते.

photo credit- Google

मुदगर व्यायाम दररोजच्या जीवनातील कामाची नक्कल करतात, जसे जड वस्तू उचलणे किंवा हलविणे त्यामुळे कार्यात्मक ताकद वाढते मुद्गरचा योग्य वापर केल्याने शरीराचा समतोल आणि स्थिरता सुधारते. तसेच कॅलरीज जळतात आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

गणपतीला वाहिलेल्या फुलांचं काय करायचं? निर्माल्यापासून घरीच तयार करा ‘असं’ खत, बाग फुलेल छान

मुदगरमुळे प्रामुख्याने दंड, पाठ, खांदे भक्कम होतात. मुदगर व्यायामाचे विविध प्रकार आहेत जसे पारंपारिक गदा, पर्शियन मील, स्टील गदा, भारतीय जोरी इत्यादी. मुदगर केवळ ताकद आणि सहनशक्ती वाढविण्याचा एक अनोखा आणि प्रभावी मार्ग देत नाही तर तुमच्या व्यायामामध्ये एक मजेदार आणि आकर्षक घटक देखील आणते. तुम्ही सौंदर्यात्मक सुधारणा,चांगले क्रीडा प्रदर्शन किंवा सुधारित आरोग्याचे ध्येय ठेवत असाल तर मुदगर उत्तम साधन आहे.

 

Web Title: Ganpati Festival Special 2025: Women should get fit and make themselves strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.