Join us

अतीश्रीमंत एलॉन मस्क यांच्या मातोश्री खरंच लेकाचं घर लहान म्हणून गॅरेजमध्ये राहतात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2022 16:42 IST

Elon Musk -Maye Musk  : एलॉन मस्क यांच्या मातोश्री अशी मे मस्क यांची आज ओळख असली तरी त्या स्वत: एक यशस्वी मॉडेल आहेत.

ठळक मुद्दे एलॉन मस्क यांची आई म्हणून ओळखत असलं तरी त्या स्वतंत्र प्रतिभेच्या कर्तृत्त्वान महिला आहेत.

एलॉन मस्क. जगातल्या अतीश्रींमत माणसांपैकी एक. त्यांच्या लाइफस्टाइलविषयी भरपूर चर्चा होते. ते ऑफिसातच राहतात, चालत ऑफिसला येतात असे अनेक किस्से प्रसिध्द आहेत. नुकतीच त्यांच्या आईने ‘टाइम’ मासिकाला एक मुलाखत दिसली. मे मस्क त्यांचं नाव. (Elon Musk -Maye Musk) त्या सांगतात, मी लेकाला म्हणजे एलॉन मस्कला भेटायला जाते तेव्हा मला गॅरेजमध्येच मुक्काम ठोकावा लागतो. तिथंच झोपावं लागतं. आता जगातल्या अतीश्रीमंत अती टेक्नोसॅव्ही माणसाच्या आईवर गॅरेजमध्ये झोपायची वेळ यावी म्हणत काहींनी लगेच कसा त्यांचा लेक पैशाच्या मागे लागला, आईची काळजी नाही म्हणून भावूक चर्चा करायला सुरुवात केली. पण खरं कारण ते नाही, त्यांची लाइफस्टाइल आणि जगण्याची वेगळी रीत हे त्यासाऱ्याला कारणीभूत आहे.

(Image : Google)

मे मस्क या एलॉन मस्क यांच्या आई. इरॉल मस्क यांच्याशी विवाह केल्यानंतर दोनच वर्षात त्या विभक्त झाल्या. त्यांचा लेक एलॉन वडिलांसोबत राहिला. मात्र मे आणि एलॉन यांचं नातं मजबूत आहे. आता टाइम मासिकाला दिलेल्या मुलाखतीत मे मस्क सांगतात की, एलॉनला भेटायला मी स्टारबेस लाँच साइटवरच जाते. तो तिथंच राहतो. ती रॉकेट साइट असल्यानं तिथं मोठी आलिशान महालांसारखी घरं बांधताच येत नाहीत. त्यामुळे त्याचं घण अगदी छोटंसं आहे. तो त्याच लहानशा घरात राहतो मग मी ही त्याच्या गॅरेजमध्ये मुक्कम ठोकत तिथंच झोपते.प्रचंड पैसा आणि जगातली वाट्टेल ती गोष्ट विकत घेण्याची क्षमता असूनही एलॉन मस्क यांनी आपली जीवनशैली अत्यंत मिनिमलाइज ठेवली आहे. २०२० मध्ये त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हंटलंच होतं की,मी माझ्याजवळच्या सर्व वस्तू विकून टाकणार आहे. मला घराचीही गरज नाही. अलीकडेच एका पाॅडकास्टमध्ये एलॉन मस्क यांनी सांगितलं होतं की, माझं घर ‘व्हेरी स्मॉल’ -अगदी लहान आहे.

(Image : Google)

मुलाची लाइफस्टाइलच अशी आहे हे मान्य करुन मे मस्क यांनीही त्याच्याशी जुळवून घेतलं आहे.त्या एकेकाळी स्वत: मॉडेल होत्या. ५० वर्षे त्यांनी माॅडेलिंग केलं आहे. जगातल्या सर्व मोठ्या मासिकांच्या मुखपृष्ठावर त्या झलकलत्या आहे. अतिशय उत्तम डायटिशियन आहेत. आणि आता सारं जग त्यांना एलॉन मस्क यांची आई म्हणून ओळखत असलं तरी त्या स्वतंत्र प्रतिभेच्या कर्तृत्त्वान महिला आहेत. 

टॅग्स :एलन रीव्ह मस्क