lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Inspirational > २३ वर्षांची तरुणी झाली देशातली पहिली महिला क्रॅश फायर टेंडर! हा आगीशी खेळ असतो काय..

२३ वर्षांची तरुणी झाली देशातली पहिली महिला क्रॅश फायर टेंडर! हा आगीशी खेळ असतो काय..

Disha Naik From Goa become Countries first Women firefighter who drive crash Fire Tender : अपघातप्रसंगी ठरलेल्या वेळेत त्याठिकाणी जाणे आणि आपल्यासोबतच्या क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे ऑपरेशनसाठी पोहोचवणे हे सर्वात मोठे आव्हान

By सायली जोशी-पटवर्धन | Published: November 30, 2023 03:43 PM2023-11-30T15:43:15+5:302023-11-30T16:01:02+5:30

Disha Naik From Goa become Countries first Women firefighter who drive crash Fire Tender : अपघातप्रसंगी ठरलेल्या वेळेत त्याठिकाणी जाणे आणि आपल्यासोबतच्या क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे ऑपरेशनसाठी पोहोचवणे हे सर्वात मोठे आव्हान

Disha Naik From Goa become Countries first Women firefighter who drive crash Fire Tender : A 23-year-old girl became the country's first female crash fire tender | २३ वर्षांची तरुणी झाली देशातली पहिली महिला क्रॅश फायर टेंडर! हा आगीशी खेळ असतो काय..

२३ वर्षांची तरुणी झाली देशातली पहिली महिला क्रॅश फायर टेंडर! हा आगीशी खेळ असतो काय..

सायली जोशी-पटवर्धन

तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून करायची असेल आणि त्यासाठीची जिद्द तुमच्या अंगी असेल तर त्या गोष्टीपासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. हे सिद्ध करुन दाखवले आहे गोव्यातील दिशा नाईक या तरुणीने. अवघ्या २३ व्या वर्षी दिशा क्रॅश फायर टेंडर चालवणारी देशातील पहिली महिला ठरली आहे. अग्निशमनाचा बंब काय असतो ते साधारण आपल्याला माहित आहे. यामध्ये आग विझवण्यासाठीची विविध प्रकारची सामग्री, कित्येक लीटर पाणी आणि आग विझवण्यासाठी आवश्यक अशी सर्व प्रकारची यंत्रणा समाविष्ट असते. ही गाडी मोठ्या आकाराची असल्याने हेवी व्हेईकलमध्ये तिचा समावेश होतो. अशाप्रकारची गाडी एखाद्या मुलीने चालवणे काहीसे आव्हानात्मकच. पण हे आव्हान गोव्यातील दिशा नाईक हिने पेलून दाखवले आहे (Disha Naik From Goa become Countries first Women firefighter who drive crash Fire Tender ). 

(Image : Google)
(Image : Google)

क्रॅश फायर टेंडर चालवणे हे सामान्य अग्निशमन बंबापेक्षा जास्त आव्हानात्मक असते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या वाहनाचा वापर लष्करात किंवा विमानतळांवर केला जातो. याठिकाणी लागलेली आग विझवण्यासाठी हे विशेष वाहन वापरण्यात येते. दिशा हिची नुकतीच गोव्यातील मोपा विमानतळावर नियुक्ती झाली असून अतिशय शक्तीशाली असे वाहन चालवत तिने महिला याही क्षेत्रात मागे नाहीत हे दाखवून दिले आहे. महिलांना गाडी नीट चालवता येत नाही असे म्हणून त्यांची नेहमी खिल्ली उडवणाऱ्यांसाठी दिशाची या वाहनाची चालक म्हणून झालेली निवड म्हणजे डोळे उघडणारी गोष्ट आहे. युनिफॉर्ममधलीच नोकरी करायची हे मनाशी पक्के असलेल्या दिशाने सुरुवातीला पोलिस दलातील नियुक्तीसाठी प्रयत्न केले. पण उंची कमी असल्याने या क्षेत्रात तिला जाता आले नाही. मात्र तिने हार मानली नाही, मोपा विमानतळाच्या एरोड्रोम रेस्क्यु ॲण्ड फायरफाईटींग युनिटमध्ये २०२१ मध्ये जागा निघाल्यावर लगेचच फॉर्म भरला. याठिकाणी नियुक्ती झाल्यावर काम करत असतानाच दिशाने क्रॅश फायर टेंडर चालवण्याची इच्छा व्यक्त केली. 

(Image : Google)
(Image : Google)

जड वाहन चालवणे येत असल्याने किमान चाचण्या झाल्यावर वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार तिने तमिळनाडू येथून या विषयातील ६ महिन्याचे रितसर ट्रेनिंग पूर्ण केले. मग जुलै २०२२ मध्ये मोपा विमानतळावर तिची क्रॅश फायर टेंडर चालवण्यासाठी नियुक्ती झाली आणि ती देशातील पहिली प्रमाणित महिला फायरफाईटर म्हणून रुजू झाली. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात इतक्या लहान वयातील मुलीने येणे तितके सोपे नक्कीच नव्हते पण जिद्द आणि नवीन काहीतरी करण्याची आकांक्षा या गोष्टीमुळे दिशा तिचे स्वप्न पूर्ण करु शकली. एखाद्या एअरक्राफ्टचा अपघात झाल्यावर ठराविक मिनीटांमध्ये संबंधित ठिकाणी पोहोचणे आणि आपल्यासोबत असलेल्या क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे याठिकाणी ऑपरेशनसाठी पोहोचवणे हे सर्वात मोठे आव्हान असते. स्पीडमध्ये जात असल्याने परिस्थितीचा अंदाज घेऊन योग्य ती पाऊले उचलणे आव्हानात्मक असल्याचे दिशा सांगते. येत्या काळात आपल्याला यामध्ये जास्तीत जास्त पारंगत व्हायचे असून याबाबतचे अॅडव्हान्स ट्रेनिंग घ्यायचे असल्याचे ती म्हणते. 

Web Title: Disha Naik From Goa become Countries first Women firefighter who drive crash Fire Tender : A 23-year-old girl became the country's first female crash fire tender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.