Join us

लेकरु पोटाला बांधून ड्यूटी करणाऱ्या आईचे कौतुक, पण तिची हतबलता कुणालाच दिसू नये?

By कोमल दामुद्रे | Updated: February 19, 2025 17:59 IST

Female constable manages crowd at railway station while carrying baby: viral video: Mother's struggle while working with a child: Praise for mothers balancing work and parenting: Mother's silent sacrifice at work: Motherhood and work-life balance struggles: Working mothers and their untold struggles: Challenges of mothers working with infants: Mother’s dedication in the workplace: Admiring mothers juggling work and family: Invisible struggles of working mothers: नोकरी करुन मूल सांभाळणाऱ्या आईचे कष्ट कौतुकास्पद, पण तिचे हाल कमी कसे करता येतील?

नवी दिल्लीत ट्रेन पकडण्यासाठी प्रवासी धावले आणि चेंगराचेंगरीत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. याच दरम्यान एका आरपीएफ महिला कॉन्स्टेबलचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरला झाला. पोटाशी बाळ बांधून ती कर्तव्यावर हजर होती. ( Mother's struggle while working with a child) आपल्या चिमुकल्या बाळाला पोटाशी कवटाळतं तिनं गर्दीतून अनेकांना वाट दाखवली. आपल्या बाळाला सांभाळतं कर्तव्य बजावताना तिच्या या व्हिडीओनं नेटकऱ्यांनी कौतुकाची थाप दिली.

(Motherhood and work-life balance struggles) शेवटी आई ती आईच म्हणत तिचं कौतुकही झालं.(Mother’s dedication in the workplace) तिचं काम कौतुकास्पदच पण ते कौतुक करताना असा प्रश्न नाही का पडला की, या माऊलीची अशी काय मजबूरी असेल की तिला काम आणि मूल एकाचवेळी सांभाळावं लागतं. का ड्यूटी सांभाळताना तिला मुलाला वणवण घेऊन फिरावं लागतं असेल, का तिला कुणाचा सपोर्ट नसेल बाळ सांभाळायला? (Challenges of mothers working with infants)

मूल सांभाळत नोकरी करणाऱ्या आईची तगमग आज सर्वच क्षेत्रात दिसते. चूल मूल नोकरी सांभाळत करिअर करणाऱ्या बायकांच्या सोशिकतेचं कौतुक होतं पण ते केलं की संपलं सारं? हा प्रश्न त्या आरपीएफ महिलेपुरता नाही, तर आपल्या आजूबाजूला अशा अनेक महिला आहेत ज्यांना घर आणि नोकरी एकाच वेळी सांभाळावी लागते. आपल्या सपोर्ट सिस्टिमच नेहमी कौतुक केलं जातं पण अशावेळी स्त्रियांना घरच्यांकडूनही पाठिंबा मिळतं नसेल तर तिचे किती हाल होत असतील.

देशभरात अशा किती तरी महिला आहेत ज्यांना नोकरी आणि घर एकाच वेळी सांभाळावं लागतं. अगदी मूल लहान असेल तर ते पाळणाघरात ठेवावं लागतं.  शाळेत जाणारं मुल असेल तर त्याच्या खाण्यापिण्यापासून ते स्कूलला जाण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी. मग त्यात मुलांना वळण लावणं, शिस्त लावण्याचं काम फक्त आईनेच करायचं असतं. मग त्यात मुलांचं आजारपण, त्यांचा आनंद-दु:ख मात्र ती एकटीने सारं निभावून नेते.कामाच्या ठिकाणी ‘वर्क फ्रॉर्म होम’ मिळालं तर कुटुंबातले अधिक आनंदी असतात. म्हणजे काय तर आता ‘चूल आणि मुल’ एकाच वेळी सांभाळता येणार. पण कामाच्या ठिकाणी असलेलं टार्गेट, डेडलाइन आणि वेगवेगळे टास्क हे पूर्ण करणं कर्तव्यच असतं. मांडीवर रडून रडून बेजार झालेलं मूल, स्वयंपाकघरात कुकरच्या शिट्ट्यांनी दिलेली आरोळी अन् एकीकडे सुरु असलेली मिटिंग अशी कसरत आज अनेकजणी करतात.त्यात घरी अनेकींना ऐकावं लागतं, आम्हीपण मुल सांभाळली तुम्हाला काय अवघड जातं? नोकरी सोडणंही शक्य नसतं. घरासह बाकीचे ‘इएमआय’ कसे भरणार? दोघांना कमवावंच लागतं. आजच्या वर्किंग वूमनचे हे प्रश्न आहेत. नव्या काळात नव्या सपोर्ट सिस्टिम उभ्या राहायला हव्यात.  त्यांना आधार होतील अशा व्यवस्था हव्या, कुटुंबात मूल सांभाळताना कामाची समसमान वाटणी हवी. ते होत नाही, उलट महिलांचे काैतुक करुन सगळा भार तिच्यावरच टाकला जातो. अलीकडेच एक अभ्यास प्रसिध्द झाला, २०५० पर्यंत अनेक स्त्रिया सिंगल असतील आणि मूल नको म्हणतील. या निर्णयामागे ही हतबलताच असेल का विचार करायला हवा.