खरंतर माणसाचं वय नेमकं कशावरुन ठरतं? चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवरुन की आधारकार्डच्या जन्मतारखेवरुन हे सांगणं थोडं कठीणचं होईल. माणसांच वय त्याच्या विचारांवरुन आणि त्याच्या जिद्दीवरुन कायम ठरतं. (Inspiring women athletes) सध्याच्या काळात विशी-तिशीत आलेली तरुण मुलं 'आपण थकलोय' किंवा 'आमच्याकडून हे होणार नाही' म्हणून हार मानून बसतात.(Claudia Riegler) ज्या वयात मध्यमवर्गीय माणूस आपली सगळी कर्तव्यं पार पाडून निवृत्तीचा विचार करू लागतो, आरामात खुर्चीवर बसून वर्तमानपत्र वाचण्याचे बेत आखत असतो, आपल्या नातंवडांना मांडीवर खेळवण्याच्या विचारात असतो, आपल्या फॅमिलीला टाइम देण्याचा विचार करत असतो.(Olympic medal winner) अगदी त्याच वयात एका महिलेने जगाला थक्क करणारा पराक्रम करून दाखवला आहे. त्या आहेत ऑस्ट्रियाच्या क्लॉडिया रिग्लर...
साधी साडी- लूक रॉयल! कस्टमाइज्ड स्टोन वर्क ब्लाऊजचे एकापेक्षा एक भारी पॅटर्न
स्वप्नांना वयाचं बंधन नसलं तरी ऑलिम्पिक सारख्या जगातील सर्वात कठीण क्रीडा स्पर्धेबद्दल बोलतो, जिथे सेकंदाच्या शंभराव्या भागाने नशीब ठरतं, तिथे वय हा एक मोठा अडथळा मानला जातो. कुठलाही खेळाडू तिशीत किंवा पस्तीशीत निवृत्तीचा विचार करतो. पण ऑस्ट्रियाच्या क्लॉडिया रिग्लर यांनी या सर्व समजांना झुंगारुन एक नवा इतिहास रचला आहे.
वयाच्या ५२ व्या वर्षी अनेक लोक शरीर थकल्याची तक्रार करतात, तेव्हा क्लॉडिया इटलीच्या लिविनो स्नो पार्कमध्ये बर्फामध्ये स्केटिंग केली. ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वात वयस्कर महिला स्पर्धक म्हणून त्यांनी हे सिद्ध केलं की, आपल्या मनात जिद्द असेल, तर वयाचा आकडा फक्त कागदापुरता उरतो.
८ फेब्रुवारीला झालेल्या स्पर्धेत ५२ वर्षीय क्लॉडियाने जेव्हा बर्फावर एन्ट्री घेतली, तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. त्यांच्या समोर असणारे स्पर्धक हे त्यांच्या वयापेक्षा अर्ध्याहून कमी वयाचे होते. पण क्लॉडियाच्या अनुभवापुढे त्यांचं वय फिकं पडलं.
त्यांनी राऊंड १६ मध्ये आपल्यापेक्षा कित्येक वर्ष लहान असलेल्या खेळाडूंना पराभूत करून प्रवेश मिळवला. त्यांना सुवर्णपदक जरी मिळालं नसले तरी त्यांनी अनेकांची मन जिंकली. २२ वर्षांच्या एस्टरने क्लॉडियाला १.१३ सेकंदांच्या फरकाने मागे टाकलं, पण या १.१३ सेकंदांच्या लढाईत क्लॉडियाने जो संघर्ष दाखवला, तो सुवर्णपदकापेक्षा कमी नव्हता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
त्यांचा हा परफॉर्मन्स पाहून इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना "क्वीन" आणि "रिअल हिरो" म्हटलं. काहींसाठी त्या प्रेरणादायी देखील झाल्या. ज्या वयात समाज आपल्याला 'आता तुमचे दिवस संपले' असं सांगायला सुरुवात करतो, त्याच वयात त्यांनी जगाला सांगितलं की, सुरुवात कधीही होऊ शकते.
अनेकदा वय उलटून गेलं असं म्हणून आपण स्वप्नांना मागे ठेवतो. पण मनात जिद्द असली तरी वय हा केवळ आकडाच उरतो हे क्लॉडिया रिग्लर यांनी दाखवून दिलं.
Web Summary : At 52, Claudia Riegler defied age by competing in the Olympics. Despite not winning gold, her performance inspired many, proving age is just a number when pursuing dreams. Her determination resonated globally, earning her praise as a 'real hero'.
Web Summary : 52 वर्षीय क्लाउडिया रिग्लर ने ओलंपिक में भाग लेकर उम्र को मात दी। स्वर्ण न जीतने पर भी, उनके प्रदर्शन ने कई लोगों को प्रेरित किया, यह साबित करते हुए कि सपने पूरे करने में उम्र सिर्फ एक संख्या है। उनकी दृढ़ता ने उन्हें 'असली हीरो' के रूप में प्रशंसा दिलाई।