Join us  

२ वर्षांचं लेकरु आईबाबांसह पोहचलं थेट एव्हरेस्ट बेसकॅम्पवर; त्याच्या आईबाबांनी हे धाडस केलं कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2024 11:17 AM

2 Year Old Boy Reached To Mount Everest Base Camp: जिथे पोहोचताना भल्याभल्यांची दमछाक होते त्या माउंट एव्हरेस्ट बेसकॅम्पला चक्क २ वर्षांचा चिमुकला पोहोचला. बघा कसा केला त्याने हा प्रवास...

ठळक मुद्देमाउंट एव्हरेस्ट बेसकॅम्पवर जाणारा तो जगातील सर्वात कमी वर्षांचा मुलगा ठरू शकतो, असा विश्वास त्याच्या आई-बाबांना वाटत आहे.

एक ना एक दिवस माउंट एव्हरेस्टला पोहोचायचं, असा ध्यास घेतलेले अनेक जण असतात. त्यांच्या या स्वप्नासाठी त्यांची वर्षानुवर्षे कसून तयारी सुरू असते. पण माउंट एव्हरेस्टतर नाहीच पण त्याच्या बेसकॅम्पला जाण्याचं स्वप्न पुर्ण करण्यातही अनेकांचं अख्खं आयुष्य संपून जातं. असं असताना दुसरीकडे मात्र अवघ्या २ वर्षांचा चिमुकला माउंट एव्हरेस्ट बेसकॅम्पला पोहोचला आहे. माउंट एव्हरेस्ट बेसकॅम्पवर जाणारा तो जगातील सर्वात कमी वर्षांचा मुलगा ठरू शकतो, असा विश्वास त्याच्या आई-बाबांना वाटत आहे. बघा या धिटुकल्याने हा प्रवास कसा केला, त्याची रंजक गोष्ट... (Carter Dallas 2 year old boy reached to Mount Everest base camp)

 

माऊट एव्हरेंट बेसकॅम्पवर जाणाऱ्या या चिमुकल्याचं नाव आहे कार्टर डलास. तो मुळचा स्कॉटलँडचा. २ वर्षांच्या बाळाला २ दिवस बाहेरगावी न्यायचं म्हटलं तरी त्याच्या आई- वडिलांना टेन्शन येतं.

वजन कमी करण्यासाठी हे पाहा कोरफडीचे ५ जबरदस्त फायदे, कोरफडीसारखा असरदार इलाज नाही

पण इथे मात्र त्याचे वडील राॅस डलास आणि आई जेड त्याला थेट माउंट एव्हरेस्टला घेऊन गेले. न्यूयॉर्क पोस्ट यांनी दिलेल्या वृत्तानुसार कार्टरने कधी स्वत: चालत तर कधी त्याच्या वडिलांच्या पाठीवर बसून त्यांचा प्रवास पुर्ण केला. न्यूयॉर्क पोस्ट यांच्या वृत्तात असे म्हटले आहे की कार्टरसाठी त्याच्या पालकांनी स्लिपिंग बॅग घेतल्या होत्या. त्यामुळे त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर झाला.

 

एव्हरेस्ट चढायला सुरुवात करण्यापुर्वी जेव्हा मेडिकल कॅम्पमध्ये त्या तिघांच्या तपासण्या झाल्या तेव्हा तो छोटासा चिमुकला त्याच्या आई-वडिलांपेक्षा अधिक फिट होता. यामुळे त्याच्या पालकांचा उत्साह वाढला.

चेहरा चमकदार पण हात- पाय खूप काळे पडले? बघा टॅनिंग कमी करण्याचा १ सोपा उपाय

पुढे आणखी वर गेल्यानंतर रॉस आणि जेड दोघांनाही उंचीचा त्रास झाला, पण छोटासा कार्टर मात्र त्याठिकाणीही एकदम तंदुरुस्त होता. त्याने एवढी चांगली साथ दिल्यानेच हा प्रवास पुर्ण होऊ शकला, असं त्याचे पालक म्हणतात. हे दाम्पत्य ऑगस्ट २०२३ पासूनच जगभ्रमंतीसाठी देशाबाहेर पडले असून ऑक्टोबरमध्ये ते माउंट एव्हरेस्ट बेसकॅम्पला पोहोचले. भारत, मलेशिया, नेपाळ, मालदिव, श्रीलंका, सिंगापूर असा त्यांचा प्रवास अजूनही सुरूच आहे.  

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीलहान मुलंएव्हरेस्ट