भारतीय महिला गटाने असे काही करुन दाखवले ज्याची कल्पना कोणीही केली नव्हती. लोकांचे टोमणे, अविश्वास सारे झेलूनही ठामपणे स्वतःच्या खेळावर विश्वास ठेवणाऱ्या या संघातल्या प्रत्येकीने वर्षानुवर्षे घेतलेली मेहनतच या यशाला कारणीभूत आहे. अंतिम सामन्यात फार महत्त्वाची ठरलेली अमज्योतची कॅच आता ऐतिहासिक आहे. (Amanjyot, who took a brilliant catch to help India win, at the same time her grand mother was struggling for life but...)क्रिकेटच्या मैदानावर उभं असलेलं अमनज्योत कौरचं तेजस्वी व्यक्तिमत्त्व आज लाखो लोकांना प्रेरणा देतं. तिच्या बॉलिंगच्या प्रत्येक ओव्हरमध्ये ताकद आहे, पण त्या ताकदीमागे आहे, तिच्या कुटुंबाचं मोलाचं प्रेम, विश्वास आणि त्याग.
अमनज्योतचा जन्म पंजाबमध्ये एका साध्या कुटुंबात झाला. तिची स्वप्नं मात्र लहानपणापासूनच खूप मोठी होती. हातात बॅट घेतलेल्या मुलीकडे वडिलांनी कुतूहलाने पाहिलं, मात्र कुणी टोचून विचारलं “मुली क्रिकेट खेळतात का?”. वडील पाठीशी खंबीर असतील तर बोलणाऱ्या चार लोकांकडे लक्षच कशाला द्यायचं. म्हणून अमनज्योतने क्रिकेट खेळायचे ठरवले. गल्लीबोळात खेळणाऱ्या मुलांनी अनेक कारणे शोधून तिला खेळू द्यायचे. नाही ठरवले. आधी मुलीशी खेळायचे नाही म्हणून टाळले नंतर मुलीकडून हारायला लागले म्हणून खेळणे बंद केले. वडिलांनी मग तिला प्रॉपर क्रिकेट खेळणाऱ्या संघात दाखल केले.
तिच्या आयुष्यातील वर्ल्ड कपची मॅच फारच महत्त्वाची ठरली. त्या दरम्यानच तिच्या कुटुंबावर मात्र फार वाईट वेळ आली होती. भारतासाठी ती महत्त्वाची मॅच खेळत असताना तिच्या आजीला हृदयविकाराचा झटका आला. तिच्या वडिलांनी अमनज्योतला त्यातील काही सांगायचे नाही असा निर्णय घेतला. ती खेळत असताना तिचं मन विचलित होऊ नये म्हणून कुटुंबाने ही बातमी लपवली. अमनज्योत त्या दिवशी फार जबरदस्त खेळली, भारतासाठी विजय मिळवला आणि नंतरच तिला आजीच्या प्रकृतीबद्दल समजलं. त्या क्षणी ती स्तब्ध झाली, पण तिच्या डोळ्यांत एकच चमक होती.
ती सांगते, “माझं कुटुंब हे माझं सर्वात मोठं बळ आहे. वडिलांच्या प्रेमाशिवाय आणि आईच्या प्रोत्साहनाशिवाय मी काहीच नाही.” त्यांच्या विश्वासानेच अमनज्योत आज भारतीय महिला क्रिकेटमध्ये एक विश्वासार्ह नाव ठरलं आहे.
Web Summary : Amanjot Kaur's crucial catch secured India's victory while her grandmother battled illness. Her family hid the news to keep her focused. Supported by her family's unwavering belief, Amanjot shines in Indian women's cricket.
Web Summary : अमनजोत कौर के महत्वपूर्ण कैच ने भारत की जीत सुनिश्चित की, जबकि उनकी दादी बीमारी से जूझ रही थीं। उनके परिवार ने उन्हें केंद्रित रखने के लिए खबर छिपाई। उनके परिवार के अटूट विश्वास से समर्थित, अमनजोत भारतीय महिला क्रिकेट में चमक रही हैं।