Lokmat Sakhi >Inspirational > जिद्दीची कमाल! २० वर्षांच्या तरुणीने सलग १७० तास भरतनाट्यम करत केला विश्वविक्रम

जिद्दीची कमाल! २० वर्षांच्या तरुणीने सलग १७० तास भरतनाट्यम करत केला विश्वविक्रम

A 20-year-old girl sets a world record by performing Bharatanatyam for 170 hours straight, Golden Book Of World Record : या मुलीने १७० तास नृत्य करण्याचा विक्रम करत रचला इतिहास. पाहा तिची कहाणी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2025 15:49 IST2025-07-31T15:47:03+5:302025-07-31T15:49:53+5:30

A 20-year-old girl sets a world record by performing Bharatanatyam for 170 hours straight, Golden Book Of World Record : या मुलीने १७० तास नृत्य करण्याचा विक्रम करत रचला इतिहास. पाहा तिची कहाणी.

A 20-year-old girl sets a world record by performing Bharatanatyam for 170 hours straight, Golden Book Of World Record | जिद्दीची कमाल! २० वर्षांच्या तरुणीने सलग १७० तास भरतनाट्यम करत केला विश्वविक्रम

जिद्दीची कमाल! २० वर्षांच्या तरुणीने सलग १७० तास भरतनाट्यम करत केला विश्वविक्रम

भारतात अनेकविध कला आहेत. त्या कलांना कलाकार फक्त शिकत नाहीत तर पुजतात. कलेप्रती त्यांच्या मनात आस्था असतेस प्रेम असते. कलेमुळे आनंद तर मिळतोच त्यासोबत मिळते एक ओळखही. काहीतरी असामान्य करुन दाखवण्याची इच्छा या कलाकारांच्या मानात असते. काही ती पूर्णही करतात. भारतात नृत्य प्रकाराला फार सन्मान दिला जातो. (A 20-year-old girl sets a world record by performing Bharatanatyam for 170 hours straight, Golden Book Of World Record )विविध प्रकारचे पारंपरिक नृत्य प्रकार आहेत. ज्यात कथक, कथकली, कुचीपूडी, मोहिनअट्टम अशा शास्त्रीय नृत्यांचा समावेश होतो. सारेच प्रकार सुंदर आहेत. यापैकीच एक म्हणजे भरतनाट्यम. हा नृत्यप्रकार भारतातच नाही तर बाहेरही प्रसिद्ध आहे सध्या एका भरतनाट्यम करणाऱ्या नृत्यांगनेने कमालीचा विक्रम केला आहे.    

रेमोना एव्हेट परेरा नावाच्या एका नृत्यांगनेने  १७० तासाचा नृत्याविश्वार करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. तिचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच. २१ जुलै ते २८ जुलै २०२५ या सात दिवसांत तिने सलग १७० तास भरतनाट्यम केले. दर तीन तासांनी फक्त १५ मिनिटांची विश्रांती घेत तिने हा सात दिवसांचा पल्ला पार पाडला. रेमोना ही मंगळूरु येथे राहणारी एक बीए आर्ट्सची विद्यार्थीनी आहे.  तिचा विक्रम Golden Book Of World Records मध्ये नोंदवला गेला.  सात दिवसांमध्ये तिने १०, २०० मिनिटे नृत्य केले. लोकांनी तिचा उत्साह वाढवण्यासाठी हजेरीही लावली. तिची जिद्द पाहून सारेच थक्क झाले. 

रेमोना तीन वर्षाची असल्यापासून नृत्य शिकत आहे. फक्त भरतनाट्यम नाही तर सेमी-क्लासिकल, हिप-हॉप, लेटिन, बॉलिवूड, इत्यादी नृत्यप्रकारही ती अप्रतिम करते. २०२२ मध्ये तिला प्रधानमंत्री बाल पुरस्कार मिळाला होता.  भारतातील या पूर्वी लातूरच्या सृष्टी जगताप हिने १२६ तासांचा विक्रम केला होता. १७० तासाचा विक्रम करणारी रेमोना ही पहिलीच भारतीय आहे. वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी स्वतःचे नाव विश्व विक्रमात नोंदवणारी रेमोना नक्कीच अनेकांसाठी आदर्श ठरेल. पुढे तिला असेच यश मिळावे यासाठी सोशल मिडियावर अनेक जणांनी तिला शुभेच्छा दिल्या. 

Web Title: A 20-year-old girl sets a world record by performing Bharatanatyam for 170 hours straight, Golden Book Of World Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.