भारतातील महिलांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी कष्ट घेतले. (26th January Special: 'Jhansi Ki Rani Regiment!') महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालले पाहिजे. अशी शिकवण देणारे अनेक जण होऊन गेले. त्यातीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजे सुभाषचंद्र बोस. त्यांनी 'बाईच्या डोक्यावरचा पदर ही सरकता कामा नये' अशा विचारधारणेच्या समाजासमोर, अख्खीच्या अख्खी सशस्त्र महिलांची पलटण उभी केली. आज भारतीय सेनेत महिलांचे योगदान मोठे आहे. याची बीजे आझाद हिंद सेनेत रोवली गेली. (26th January Special: 'Jhansi Ki Rani Regiment!')
गोष्ट आहे १९४३ ची. स्वातंत्र्य लढ्यात महिलांचे ही योगदान हवे. त्यांना वगळून चालणार नाही. या विचारातून सुभाषचंद्र बोसांनी महिलांचा सशस्त्र दल स्थापन केला.(26th January Special: 'Jhansi Ki Rani Regiment!') राणी लक्ष्मीबाईंच्या आयुष्याने प्रेरित असल्याने नावसुद्धा 'रानी ऑफ झासी रेजिमेंट' असे ठेवण्यात आले. भारताच्या पहिल्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व 'कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन' यांनी केले होते. बोसांच्या इंडियन नॅशनल आर्मी बरोबर रेजीमेंटमधील महिलांनीही युद्धांमध्ये बलिदान दिले आहे.
रेजिमेंटमध्ये १७ ते २२ वयाच्या तरूणी होत्या. जात-पात, धर्म काहीही न बघता, सर्व जणी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झटत होत्या. कोणी समाजापासून पळून आली होती. तर कोणी घरच्यांच्या आणि नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून आली होती. वेगवेगळ्या कारणासाठी आलेल्या या महिला नंतर मात्र एक सैनिक म्हणूनच जगल्या. त्या सगळ्यांना राणी हीच उपमा देण्यात आली होती.२३ ऑक्टोबर १९४३ ला या महिलांचे प्रशिक्षण सुरू झाले. सिंगापूर व बर्मामध्ये दोन वर्षांसाठी हे प्रशिक्षण चालले. रायफल शुटिंगपासूनचे सगळे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले.
चांद बीबी नर्सिंग कोर्स सुरू करून आर्मी डॉक्टर म्हणूनही महिलांनाच जबाबदारी दिली. समाज कंटकांच्या शीवीगाळाला बळी न पडता ३०० जणींनी या रेजिमेंटमध्ये सहभाग घेतला. नंतर संख्या कमी जास्त होत राहिली. या रेजिमेंटमधील रणरागीणींचे अनेक किस्से आहेत . कोणी वयाच्या १६व्या वर्षी गुप्तहेर बनली. तर कोणी देशासाठी जीवाची बाजी लावली.
दुसर्या महायुद्धा दरम्यान आझाद हिंद सेना आणि सुभाषचंद्र बोसांचे सरकार ढासळले. नंतर हे रेजिमेंटही बंद करण्यात आले. या महिलांचे योगदान फार मोठे आहे. खरी सशक्त स्त्री काय असते, हे त्यांनी दाखवून दिले.