"किसी चीज़ को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है".. असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजाचे, जातीचे, धर्माचे किंवा कुटुंबाचे बंधन असो.(Kerala news viral) ते पूर्ण करण्यासाठी आपण कायमच प्रयत्नशील असतो. कला जपण्यासाठी आणि ती जगण्यासाठी माणूस काहीही करु शकतो. भारत हा कलेसाठी ओळखला जाणारा देश.(Muslim woman in Kathakali) यात अनेकविध कला आहेत. त्या कलांना कलाकार फक्त शिकत नाही तर पुजतात देखील. कलेमुळे त्यांना आनंद मिळतो, जगण्याची नवीन उम्मेद मिळते. काहीतरी वेगळं करुन दाखवण्याची इच्छा या कलाकारांच्या मनात असते.
भारतात नृत्य प्रकाराला फार सन्मान दिला जातो.(Indian classical dance news) देशातील आठ शास्त्रीय नृत्यांपैकी एक असलेली कथकली हे केरळचे वैशिष्ट्य आहे.(motivational success story) हे नृत्य शतकानुशतके प्रचलित असताना केरळमधील कलामंडल येथे अलीकडेच कथकलीचा ऐतिहासिक प्रयोग पाहायला मिळाला. एका १६ वर्षीय मुस्लिम मुलाने कथकली नृत्य सादर करत नवा विक्रम रचला.
यार भोपळा कोण खातं? मग खा भोपळ्याचा पास्ता, हॉटेलमधल्या पास्त्यापेक्षाही भारी जबरदस्त रेसिपी
कथकली हे केरळची ओळख, रंगमंचावर साकारलं जाणारं अद्भुत नाटक, जिथे प्रत्येक भाव, हालचाल आणि नजरेतून एक कथा जिवंत होते. पण या मंचावर महिलांचं स्थान फारसं नव्हतं. त्यातही मुस्लिम समुदायातील एखादी मुलगी कथकली सादर करेल, हे कल्पनेतही शक्य नव्हतं. पण सबरीनं ते शक्य करून दाखवलं!
डीम्ड युनिव्हर्सिटीत ९५ वर्षात पहिल्यांदाच, एका मुस्लिम मुलीने केरळ कलामंडलम येथे कथकली हा शास्त्रीय नृत्य प्रकार सादर करुन इतिहास रचला. तिने भगवान श्रीकृष्णाचा वेष धारण करत नृत्य सादर केलं. २०२३ मध्ये सबरी ही कथकली शिकण्यासाठी प्रवेश घेणारी पहिली मुस्लिम विद्यार्थिनी होती.
सबरी ही कोल्लम भागातली. छायाचित्रकार निजाम अम्मास आणि अनिसा यांची मुलगी. तिच्या वडीलांनी सांगितलं की, ती एका मंदिरात रात्रभर कथकली नृत्याचे कार्यक्रम पाहात असतं. साबरी म्हणते की, माझे स्वप्न साकार झाले. मला आनंद आहे की, नृत्य सादर करण्याची संधी मिळाली. तिने असं ही म्हटलं की मी एका संस्थेत १२ तास सराव करायची. दसऱ्याच्या दिवशी कलामंडलात झालेल्या कथकली सादरीकरणात ती एकमेव मुस्लिम मुलगी होती. हे नृत्य तिच्यासाठी जीवनाला कलाटणी देणारे ठरले. तिला मोठे झाल्यानंतर नर्तक आणि शिक्षिका बनण्याची इच्छा आहे.
२०२१ मध्ये, केरळ कलामंडलमने जाहीरपणे जाहीर केले की ते पहिल्यांदाच मुलींना प्रवेश देणार आहे. त्यावेळी सबरी सहावीत होती, परंतु संस्थेने आठवी इयत्तेपासून मुलींना प्रवेश देण्यास सुरुवात केली. न डगमगता, सबरीच्या वडिलांनी तिला स्थानिक गुरूकडून कथकली नृत्याचे प्रारंभिक प्रशिक्षण देण्याची सुरुवात केली. सबरीने सहा महिने कठोर परिश्रम घेतले. लॉकडाऊननंतर, सबरीने तिचे प्रशिक्षण सुरू ठेवले आणि २०२३ पर्यंत कलामंडलम येथे आठवीच्या अभ्यासक्रमासाठी अर्ज केला.
यामुळे कला ही कलाकाराला जगवते, रुजवते आणि फुलवते देखील. कलेसाठी धर्म, पार्श्वभूमी आणि परंपरांच्या पलीकडे जातं. समर्पण, चिकाटी आणि कलाकृतीवरील अतूट प्रेम कायम पाहायला मिळते.