Join us  

बाटलीतलं पाणी प्या आणि बाटली खाऊन टाका.. १२ वर्षांच्या चिमुरडीने बनवली एडीबल बाटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2022 12:38 PM

Edible Water Bottle: दिवसेंदिवस प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वाढत जाणारा कचरा तिला अस्वस्थ करत होता. म्हणून मग १२ वर्षांच्या मेडिसन चेकेट्सनी (Madison Checketts) हा अनोखा शोध लावला.

ठळक मुद्देबीचवर प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा झालेला कचरा पाहून अमेरिकेत राहणारी १२ वर्षांची मेडिसन अस्वस्थ झाली आणि तिने त्यावर एक मस्त तोडगा शोधून काढला.

बाहेर फिरायला गेलं की तहान लागल्यावर हमखास पाण्याची बाटली विकत घ्यायची, पाणी पिऊन टाकायचं आणि बाटली टाकून द्यायची, ही सवय अनेकांना असते. आपल्याला तहान लागणारच आहे, हे माहिती असूनही अनेक जण घरून निघतानाच पाण्याची बाटली सोबत घेऊन निघण्याचा कंटाळा करतात. त्यामुळे दिवसेंदिवस सगळीकडेच आणि विशेषत: पर्यटनस्थळी प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा कचरा वाढत चालला आहे. असाच प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा बीचवर झालेला कचरा पाहून अमेरिकेत राहणारी १२ वर्षांची मेडिसन (12 Years old girl Madison Checketts) अस्वस्थ झाली आणि तिने त्यावर एक मस्त तोडगा शोधून काढला. तो म्हणजे पाणी प्यायल्यानंतर खाता येईल (water bottle that you can eat after finishing water) अशा एडीबल बाटल्यांचा (Edible Water Bottle).

स्मिथसोनियन या मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार यासाठी मेडिसनने इको- हिरो या नावाचा प्रोजेक्ट सुरू केला आहे. कॅलिफॉर्निया येथील इगल माऊंटेन या शाळेची ती विद्यार्थिनी आहे.

भेगाळलेल्या टाचांसाठी खास होममेड क्रिम.. फक्त ४ गोष्टी वापरा, टाचा होतील मऊ- मुलायम

अमेरिकेत एका वर्षी अंदाजे ३०० करोड पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्या जातात. सिंगल युज प्रकारातल्या या बाटल्यांमधलं पाणी संपलं की लोक त्या टाकून देतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या कचऱ्याचं रिसायकलिंग म्हणावं तेवढ्या प्रमाणात होत नाही. म्हणूनच आपण खाता येतील अशा बाटल्यांचा तोडगा शोधून काढल्याचं इगल म्हणते. 

 

तिने आधी या बाटल्या शालेय स्तरावर होणाऱ्या वैज्ञानिक प्रयोग स्पर्धेत केल्या. त्यात पारितोषिक जिंकून ती आणखी पुढच्या लेव्हलवर गेली.

साईड फॅट म्हणजेच कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी ३ व्यायाम, आठवड्यातून फक्त ३ वेळा करा

स्टेम फिल्ड, ब्रॉडकॉम मास्टर्स या नावाजलेल्या स्पर्धांमध्ये हाच प्रयोग सादर करून तिने प्रथम क्रमांक पटकाविला. आता तिच्या या अनोख्या प्रयोगाला चांगलीच लोकप्रियता मिळत असून ती राष्ट्रीय स्तरावर तो राबवत आहे. जिलेटीनचा वापर करून तिने या बाटल्या तयार केल्या आहेत. एका बाटलीमध्ये साधारण एक कप एवढे पाणी मावत असून त्याची किंमत जवळपास १०० रुपये आहे.  

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीपर्यावरणप्लॅस्टिक बंदीअमेरिकाकॅलिफोर्निया