ओजस सु. वि. (स्तनपान सल्लागार)
स्तनपानाचा प्रवास गरोदरपणापासूनच सुरू होतो. गरोदरपणाच्या पहिल्या काही दिवसातच आईच्या स्तनात बदल होत असता.(World Breastfeeding Week 2025) बाळ होण्याच्या अनेक महिने आधीच आईचे दूध तयार होत असते. (right breastfeeding advice in pregnancy) गरोदर असतानाच स्तनपान करण्याची तयारी केली तर बाळाच्या जन्मापासूनच स्तनपानाचा प्रवास सुरळीत होतो. (common problem new mother) अनेकदा बाळ झाल्यावर कळतच नाही की स्तनपान कसं करायचं, अडचणी येतात. त्यापेक्षा गरोदर असतानाच काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. प्रसूतीपूर्वीच स्तनपानाची तयारी आणि नियोजन केले तर स्तनपानाचा प्रवास आई- बाळ- बाबा आणि सर्व कुटुंबीय यांसाठी सुरळीत आणि सुखाचा होतो.
बाळ की नोकरी? बाळाला घरी ठेवून नोकरीवर जाणाऱ्या आईनं करायचं काय, बाळाच्या भुकेचं काय..?
१. गरोदरपणात स्तनांमध्ये होणारे बदल नोंदवून घ्यावेत.
यामध्ये स्तनांचा आकार वाढला आहे ना? बोंडशीचा भाग गडद होतो आहे ना? स्तनात जडपणा येत आहे ना? याचे निरीक्षण करावे. तसे होत नसल्यास आपल्या प्रसूतीतज्ज्ञांना कळवावे.
२. गरोदरपणात स्तनपानविषयी माहिती घ्यावी.
गरोदरपणाच्या साधारण सातव्या महिन्यापासून स्तनपानविषयी समुपदेशन करून घ्यावे. नॉर्मल किंवा सिझर प्रसूतीनंतर स्तनपान कसे सुरू करायचे, बाळाचे भुकेचे संकेत काय आहेत, तसेच सुरुवातीचे काही दिवस स्तनपानाबाबत काय होणे अपेक्षित आहे,(what to expect) हे माहिती असल्यास आत्मविश्वासाने संपूर्ण स्तनपान करता येते.
३. ब्रेस्ट मसाज व हाताने चिकदूध कसे काढायचे ते शिकून घ्यावे.
सुरुवातीच्या काही दिवसात बाळाला स्तनपान करणे जमत नसल्यास चिकदूध काढून देणे योग्य असते. आईला गरोदरपणातच चिकदूध यायला सुरवात झालेली असते. पहिले तीन दिवस बाळाला आईचे चिकदूध देणे पुरेसे असते. आईने स्वत:च मसाज करून चिकदूध काढणे शिकल्यास बाळाला ते देणे सोपे होते. परंतु गरोदरपणात अतिरिक्त ब्रेस्ट मसाज करू नये व चिकदूध काढून फेकू नये. त्याने वेळेआधीच प्रसूतीवेदना सुरू होण्याचा धोका संभवतो.
४. प्रसूतीचा सोबती निवडणे व त्यांना स्तनपानविषयक प्रशिक्षण देणे -
प्रसूतीदरम्यान आणि नंतरचे काही दिवस आईला स्तनपानाची स्थिती साध्य होईपर्यंत मदत लागते. अशावेळी आईसोबत असणाऱ्या व्यक्ती (बाळाचे बाबा, आजी, मावशी, आत्या, वगैरे) कोण असतील ते ठरवणे आणि त्यांनीही बाळाच्या सुरुवातीच्या दिवसातील स्तनपान प्रवासाविषयी समजून घेणे प्रसूतीपूर्वीच करावे.
५. व्यक्तिगत स्तनपान प्लॅन-
प्रसूतीनंतर किती वेळात बाळाचे स्तनपान झाले पाहिजे, बाळ आईसोबत किती वेळ ठेवले जावे, आपला स्तनपान प्लॅन काय आहे, बाळाला वरचे दूध दिले जावे की नाही, स्तनपानात अडचणी येत असल्यास स्तनपान सल्लागार कोण असेल, इत्यादी नियोजन प्रसूतीपूर्वीच करावे. तो स्तनपान प्लॅन प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांसोबत व हॉस्पिटलसोबत शेयर करावा.
६. प्रसूती तारखेच्या पुरेसे आधी बालकस्नेही हॉस्पिटल निवडावे. -
जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने १९९१ मध्ये बालकस्नेही रुग्णालय उपक्रम (BFHI) सुरू केला जेणेकरून जगभरातील माता आणि नवजात शिशु यांना आरोग्यसेवा देणाऱ्या सुविधांना यशस्वी स्तनपानासाठी दहा पायऱ्या लागू करता येतील. आपल्या सूतिकागृहात BFHI विषयी चौकशी करा. तसेच या गोष्टी तुमच्या प्रसूतिगृहात पाळल्या जात आहेत का याची खात्री करून घ्यावी.
अ) हॉस्पिटलमध्ये प्रसूतीपूर्व स्तनपान समुपदेशन दिले जाते. आईला बाळाचे भुकेचे संकेत, चीक दूध याविषयी शिकवले जाते.
ब) जन्मानंतरच्या पहिल्या तासात बाळांना स्तनपान दिले जात आहे. आणि त्यानंतर प्रत्येक दोन तासाने किंवा बाळाने मागितल्यावर बाळाला आईच्या छातीवर ठेवण्यात येते.
क) हॉस्पिटल मध्ये स्तनपान सल्लागार आहेत किंवा गरज पडल्यास त्यांना बोलावले जाते.
ड) आई आणि बाळाला २४ तास एकाच खोलीत ठेवले जाते. बाळाला रात्रीही आईपासून दूर नर्सरीमध्ये नेले जात नाही.
इ) डॉक्टरांच्या लिखित सल्ल्याशिवाय आणि आई-वडिलांच्या संमतीशिवाय बाळाला फॉर्मुला किंवा पावडरचे दूध दिले जात नाही. तसेच दुधाची बाटली, पॅसिफायर, बाळाने चोखण्याच्या वस्तू वापरल्या जात नाहीत.
फ) हॉस्पिटलमध्ये फॉर्मुला दूध कंपन्या, बाटल्या, पॅसिफायर यांच्या प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष जाहिरातीचे फलक लावलेले नाहीत. तसेच त्यांचे फ्री सॅम्पल, गिफ्ट देण्यात येत नाहीत.
ग) हॉस्पिटल मधून डिस्चार्जच्या वेळी स्तनपान विषयक योग्य ती माहिती दिली जाते तसेच स्तनपानविषयक फॉलो अप घेतला जातो.
https://www.instagram.com/themilkyway_ojas/
http://linktr.ee/ojas.sv.lc
contact: 94035 79416