नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी सेक्शुअल रिलेशन्स सुरक्षितपणे ठेवणं हे फार महत्वाचे असते. अनेकदा विवाहीत जोडप्यांकडून भावनेच्या भरात किंवा निष्काळजीपणानं कोणतंही प्रोटेक्शन न वापरता संबंध ठेवले जातात. ज्यामुळे गर्भधारणा होण्याची भिती असते. अशावेळी भलते-सलते उपाय, घरगुती सल्ले ऐकण्यापेक्षा योग्य माहिती लक्षात घेऊन उपाय केले तर तब्येतीला होणारा धोका टाळता येतो.
जर तुम्हाला कंसिव्ह करायचं नसेल तर डॉक्टरांचा सल्ला आणि पार्टनरशी बोलून तुम्ही कॉन्ट्रासेप्शनची निवड करू शकता. प्रोटेक्शन शिवाय म्हणजेच गोळ्या किंवा गर्भनिरोधक कंडोम न वापरता तुम्ही संबंध ठेवले आणि प्रेग्नंसीची भिती मनात असेल तर काय करावं याबाबत स्त्री रोग विशेषज्ञ आणि आयव्हीएफ एक्सपर्ट डॉक्टर पुनीत राणा अरोडा यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. (What Should I Do After Unprotected Sexual Relations To Avoid Pregnancy)
अनसेफ सेक्शुअल रिलेशन्सनंतर प्रेग्नंसी नको असेल तर काय करावं?
एक्सपर्ट्सच्यामते जर तुम्ही प्रोटेक्शन न वापरता संबंध ठेवले असतील, इंटरकोर्स केला असेल आणि तुम्हाला प्रेग्नंसीची भिती सतावत असेल तर तुम्ही योग्यवेळी योग्य स्टेप घेऊन ही स्थिती मॅनेज करू शकता.
जर ३ दिवसांच्या आत म्हणजेच ७२ तास नसतील झाले तर तुम्ही कॉन्ट्रासेप्टीव्ह पिल्स घेऊ शकता.
तुम्ही या पिल्स जितक्या लवकर घ्याल तितका जास्त फायदा तुम्हाला होईल. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही गोळ्या घेऊ नका.
जर ७२ तासांपेक्षा जास्त वेळ झाला असेल तर या गोळ्या काम करणार नाहीत. अशा स्थितीत तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन प्रेग्नंसी रोखण्यासाठी ५ दिवसांच्या आत कॉपर टी लावू शकता किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्यांचा कोर्स पूर्ण करू शकता. पण टेंशन घेऊन लगेचच प्रेग्नंसी टेस्ट करू नका. कारण प्रेग्नंसी टेस्ट मासिक पाळी चुकल्यानंतर १४ ते २१ दिवसांनी योग्य रिजल्ट देते.
अनसेफ सेक्शुअल रिलेशन्स फक्त प्रेग्नंसीचाच नाहीतर सेक्शुअली ट्रांसमिडेट इंन्फेक्शन्सचा धोका वाढवते. इंटेमसीनंतर बर्निंग सेंसेशन, वेदना, डिस्चार्ज, खाज येणं, ताप येणं अशी लक्षणं जाणवतात. प्रेग्नंसी टाळण्यासाठी नेहमी कंडोम किंवा रेग्युलर कॉन्ट्रासेप्शनचा वापर करा. तरीही तुम्हाला शंका वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
