'प्रेग्नेंन्सी' हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील नाजूक आणि महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य जपणे किती महत्त्वाचे असते, हे वेळोवेळी सांगितले जाते.गरोदरपणात शांत आणि आनंदी राहण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो, पण आजच्या धावपळीच्या जगात तणावापासून दूर राहणे कठीण होते. हाच मानसिक ताण केवळ आईवरच नाही, तर जन्माला येणाऱ्या बाळाच्या विकासावरही हळूहळू परिणाम करत असतो(early teething in babies).
बाळाचा पहिला दात येणे हा प्रत्येक पालकांसाठी आनंदाचा क्षण असतो. परंतु अलीकडेच एका संशोधनातून अशी माहिती समोर आली आहे, त्यानुसार गरोदरपणातील ताणतणाव आणि बाळाचे लवकर येणारे दात यांचा जवळचा संबंध आहे. गरोदरपणातील मानसिक ताणाचा थेट परिणाम बाळाच्या शारीरिक विकासावर, विशेषतः त्यांच्या दातांवर (pregnancy stress and infant teeth) होत असल्याचे समोर आले आहे. संशोधकांच्या मते, जर माता (maternal mental health and baby development) गरोदरपणाच्या शेवटच्या काळात प्रचंड तणावाखाली असेल, तर बाळाचे पहिले दात अपेक्षेपेक्षा लवकर येऊ शकतात.
गरोदरपणातील आईवरील ताण आणि बाळाचे दात यांचा नेमका काय संबंध ?
युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टर मेडिकल सेंटर (University of Rochester Medical Center) मधील संशोधकांनी अमेरिकन डेंटल असोसिएशन (American Dental Association) च्या दंत शास्त्रज्ञांच्या मदतीने केलेल्या संशोधनानुसार, प्रेग्नंन्ट आईचे आरोग्य आणि पोटातील गर्भाचा विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात मातेच्या शरीरातील 'कोर्टिसोल' या स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढल्यास, बाळाच्या हाडांची आणि दातांची निर्मिती प्रक्रिया वेगाने होऊ शकते. या प्रक्रियेमुळे बाळाला सहा महिन्यांच्या आतच दात येऊ लागतात.
विराट कोहलीच्या फिटनेस ट्रेनरने सांगितल्या ५ गोष्टी, बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे उपाय...
संशोधन करताना संशोधकांना असे समजले की, ज्या माता गरोदरपणात सर्वात जास्त तणावाखाली होत्या, त्यांच्या बाळांना सहा महिन्यांचे होईपर्यंत इतरांच्या तुलनेत फारच लवकर दात आले होते. हा अभ्यास असे सांगतो की, जन्मापूर्वीचा ताण गर्भाच्या विकासावर वेगवेगळे परिणाम करु शकतो. यामुळे हाडे आणि दात तयार होण्यासारख्या प्रक्रियांचा वेग वाढू शकतो.
आईने प्रेग्नंन्सीत घेतलेल्या ताणतणावाचा परिणाम केवळ आईपुरताच मर्यादित राहत नाही, तर तो गर्भातील बाळाची वाढ आणि विकासावरही होतो. विशेषतः हाडांची निर्मिती, दातांची वाढ, मेंदूचा विकास या प्रक्रिया वेगाने होऊ शकतात. त्यामुळे बाळाचे दात लवकर येणे हे गर्भधारणेतील ताणतणावाचं एक लक्षण मानलं जात आहे.
लवकर दात येणं चांगलं की चिंतेचं?
डॉक्टरांच्या मते, बाळाचे दात लवकर येणं हे नेहमीच गंभीर समस्या नसते. मात्र, शास्त्रज्ञ असंही सांगतात की, बाळाचे दात लवकर येणे हे जन्मापूर्वीच्या तणावामुळे भविष्यात उद्भवू शकणाऱ्या आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारींचे सुरुवातीचे संकेत असू शकतात.
तमन्ना भाटियाच्या मिल्की त्वचेचा 'देसी' फॉर्म्युला! स्वयंपाकघरातील ३ पदार्थ देतात ५ मिनिटांत ग्लो...
गर्भवती महिलांनी ताणतणाव कसा कमी करावा?
१. पुरेशी विश्रांती आणि झोप घ्या.
२. हलका व्यायाम, प्राणायाम किंवा योग करा.
३. सकारात्मक विचार आणि ध्यानधारणा करा.
४. कुटुंबियांशी मोकळेपणाने संवाद करा.
५. गरज असल्यास डॉक्टर किंवा समुपदेशकांचा सल्ला घ्या.
गर्भधारणेदरम्यान आईचा मानसिक ताण हा बाळाच्या आरोग्यावर खोलवर परिणाम करू शकतो. बाळाचे दात लवकर येणं ही एक छोटी गोष्ट वाटत असली, तरी त्यामागे आईच्या मानसिक आरोग्याचा मोठा वाटा असू शकतो. त्यामुळे गर्भधारणेच्या काळात आईने मानसिक शांतता जपणं हे तिच्या स्वतःच्या आणि तसेच बाळाच्या निरोगी भविष्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.
Web Summary : Pregnancy stress can cause babies to develop teeth early, potentially indicating future health issues. High cortisol levels in stressed mothers accelerate fetal bone and teeth development. Doctors advise pregnant women to reduce stress through rest, exercise, and counseling for healthier outcomes.
Web Summary : गर्भावस्था का तनाव शिशुओं में जल्दी दांत आने का कारण बन सकता है, जो भविष्य में स्वास्थ्य समस्याओं का संकेत देता है। तनावग्रस्त माताओं में उच्च कोर्टिसोल का स्तर भ्रूण की हड्डियों और दांतों के विकास को तेज करता है। डॉक्टर स्वस्थ परिणामों के लिए गर्भवती महिलाओं को आराम, व्यायाम और परामर्श के माध्यम से तनाव कम करने की सलाह देते हैं।