Pregnancy Tips : नवजात बाळांच्या मृत्युदरात प्री-टर्म बर्थ म्हणजेच 37 आठवड्यांपूर्वी बाळाचा जन्म हा मोठा कारण मानला जातो. बाळ वेळेपूर्वी जन्माला आलं तर आरोग्यासंबंधी समस्या वाढण्याची शक्यता जास्त असते. प्री-टर्म बर्थ रोखण्यासाठी एखादा उपाय आधीच ठरवलेला नसला तरी, एका नव्या संशोधनातून काही आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत.
रिसर्चमध्ये काय आढळलं?
नवीन अभ्यासानुसार, गर्भवती महिलेच्या पार्टनरचा आत्मविश्वास, पॉझिटिव्ह विचार आणि भावनिक साथ हे बाळाचा जन्म वेळेवर होण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, मर्सिड यांनी 200 हून अधिक जोडप्यांचा अभ्यास केला. हे संशोधन Biosocial Science and Medicine या जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे.
पार्टनरचा आत्मविश्वास मोठा आधार
रिसर्चमध्ये आढळले की, ज्या पतींचा आत्मसन्मान जास्त होता आणि ते निर्धाराने पत्नीला सपोर्ट देत होते, त्या महिलांना प्रेग्नेंसीमध्ये कमी ताण येत होता. गर्भवती महिलांच्या रक्तातील C-reactive protein तपासले गेले. हे शरीरातील सूज आणि इन्फेक्शनचे संकेत देणारे मार्कर आहे. कमी सूज म्हणजे प्री-टर्म बर्थची शक्यता कमी.
इमोशनल सपोर्टचा मोठा फायदा
अभ्यासादरम्यान जोडप्यांना विचारण्यात आले की त्यांना घरी किंवा समाजाकडून किती भावनिक आधार मिळतो. पाहण्यात आले की, जे पुरुष सामाजिकदृष्ट्या स्थिर, सकारात्मक होते, त्यांच्या पत्नीची शारीरिक तब्येत चांगली राहिली यामुळे प्री-टर्म बर्थची शक्यता कमी झाली.
निगेटिव्ह पार्टनरचा नकारात्मक परिणाम
ज्या पुरुषांचा विचार नकारात्मक होता किंवा भावनिक साथ कमी होती, त्या महिलांमध्ये शरीरातील सूज जास्त आढळली. त्यामुळे गर्भावस्थेची वेळ कमी होण्याची शक्यता वाढली, म्हणजेच प्री-टर्म बर्थचा धोका अधिक वाढला.
अभ्यासाच्या सह-लेखिका जेनिफर हॅन-होलब्रुक म्हणतात की, “हा अभ्यास अशाप्रकारच्या पहिल्या अभ्यासांपैकी एक आहे ज्यात वडिलांच्या अंतर्गत शक्ती जसे की आशावाद, सकारात्मक विचारसरणी आणि आव्हानांचा सामना करण्याची क्षमता याचा न जन्मलेल्या बाळावरही परिणाम होतो.” त्यांच्यानुसार मजबूत सामाजिक नातेसंबंध, सकारात्मक वातावरण आणि भावनिक सपोर्ट हे सर्व आरोग्यदायी गर्भधारणा आणि सुरक्षित प्रसूतीसाठी उपयुक्त ठरतात.
एकंदर काय तर प्रेग्नेसीमध्ये आईसोबत बाबांचाही मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वास महत्वाचा आहे. पती जितके सकारात्मक आणि सपोर्टिव्ह असतील, तितकं बाळ वेळेवर आणि निरोगी जन्मण्याची शक्यता वाढते. त्यामुळे गर्भावस्थेत दोघांनीही एकमेकांना साथ देणे अत्यंत आवश्यक आहे.
Web Summary : Father's optimism and support during pregnancy reduces stress, lowering premature birth risks. Partner's positive mindset aids healthy gestation and delivery.
Web Summary : गर्भावस्था के दौरान पिता का आशावाद और समर्थन तनाव कम करता है, जिससे समयपूर्व जन्म का खतरा कम होता है। साथी की सकारात्मक मानसिकता स्वस्थ गर्भधारण और प्रसव में मदद करती है।