Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Pregnancy > बाळंतपणानंतर वाढलेले पोट कसे कमी कराल? ४ उपाय- पोटाचा वाढलेला घेर होईल कमी

बाळंतपणानंतर वाढलेले पोट कसे कमी कराल? ४ उपाय- पोटाचा वाढलेला घेर होईल कमी

Post pregnancy belly fat loss: How to reduce belly fat after delivery: Postpartum weight loss tips: डॉक्टरांनी काही उपाय सुचवले ज्यामुळे महिलांना पोटाची चरबी कमी करण्यास मदत होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2025 13:18 IST2025-10-12T13:17:22+5:302025-10-12T13:18:08+5:30

Post pregnancy belly fat loss: How to reduce belly fat after delivery: Postpartum weight loss tips: डॉक्टरांनी काही उपाय सुचवले ज्यामुळे महिलांना पोटाची चरबी कमी करण्यास मदत होईल.

Best home remedies to reduce belly fat after delivery naturally How to lose baby belly fat without exercise Foods to eat after pregnancy to reduce belly fat | बाळंतपणानंतर वाढलेले पोट कसे कमी कराल? ४ उपाय- पोटाचा वाढलेला घेर होईल कमी

बाळंतपणानंतर वाढलेले पोट कसे कमी कराल? ४ उपाय- पोटाचा वाढलेला घेर होईल कमी

आई होण्याचा काळ सुखद असतो, पण बाळ झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीच आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. जन्मलेल्या बाळाची काळजी घेण्यात तिचा पूर्ण दिवस निघून जातो.(Post pregnancy belly fat loss) ज्यामुळे तिला स्वत:कडे फारसे लक्ष देता येत नाही. बहुतेक महिलांना प्रसूतीनंतर पोट वाढण्याची चिंता सतावत असते.(How to reduce belly fat after delivery) नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सिझेरियन, पोट फुगणे आणि स्नायू सैल होणे या सामान्य समस्या आहेत. (Postpartum weight loss tips)
गर्भारपणात घेतलेली काळजी, खाल्लेलं पौष्टिक जेवण, आणि नऊ महिन्याचं वजन हे सगळं काही एकत्र होऊन शरीर वाढतं.(Natural ways to lose belly fat after childbirth) बाळ जन्माला आल्यानंतर अचानक पोट कमी होईल, आत जाईल अशी अपेक्षा अनेक महिलांची असते. पण खरं सांगायचं झालं तर असं काहीच होत नाही.(Post pregnancy diet for belly fat) अनेक महिला पोट कमी करण्यासाठी जेवण कमी करतात, काही उपाशी राहतात तर काही लगेच व्यायाम करायला सुरुवात करतात पण असं केल्याने आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो.(How to lose baby belly fat fast) स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दीप्ती पायघन यांनी काही उपाय सुचवले ज्यामुळे महिलांना पोटाची चरबी कमी करण्यास मदत होईल. 

अनारसे बिघडतात? घ्या अचूक प्रमाण, हलके- कुरकुरीत जाळीदार होतील अनारसे - पारंपरिक सिक्रेट टीप्स

1. डॉक्टर म्हणतात प्रसूतीनंतर पोटावर कापड किंवा पट्टी बांधणं योग्य नाही. अनेकांना असं वाटतं पोट बांधल्याने ते आत जात. पण असं केल्याने रक्ताभिसरणावर परिणाम होतो. पोटाच्या स्नायूंवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो. त्यामुळे असं करु नका. 

2. जर आपल्याला पोट कमी करायचे असेल तर साखर, मीठ आणि तुपाचे प्रमाण मर्यादित ठेवा. अनेक महिला प्रसूतीनंतर भरपूर गोड, तुपाचे पदार्थ खातात. ज्यामुळे वजन वाढू शकते. वजन कमी करण्यासाठी आपल्या खाण्यापिण्याची योग्य काळजी घ्यावी लागेल. 

3. प्रसूतीनंतर महिलांनी त्यांच्या आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करावा. प्रथिने स्नायूंना टोन करण्यास आणि चरबी कमी करण्यास मदत करतात. ते केवळ ऊर्जेची पातळी राखत नाही तर पुनर्प्राप्तीला गती देखील मिळेल. 

4. बाळंतपणानंतर पोटाची चरबी कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे हळूहळू चालणे. आपण रोज किमान २० ते ३० मिनिटे चालायला हवे. ही पद्धत व्यायाम करण्यासाठी सुरक्षित मानली जाते. हळूहळू चालण्याने शरीर सक्रिय होते. कॅलरीज बर्न होतात आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल. 

5. डॉक्टरांनी सांगितलं की सिझेरियन प्रसूती असो किंवा योनीमार्गे प्रसुती असो, महिलांनी सहा आठवड्यानंतरच व्यायाम सुरु करावा. पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपण प्लॅक्स, ग्लूट ब्रिज, स्ट्रेट लेग रिज आणि कॅट-कॉ पॉज यांचा समावेश आहे. 


Web Title : डिलीवरी के बाद पेट की चर्बी कम करें: डॉक्टर के 4 टिप्स

Web Summary : डिलीवरी के बाद पेट की चर्बी एक आम चिंता है। डॉ. दीप्ति पायघन पेट बांधने से बचने, चीनी, नमक और घी सीमित करने और प्रोटीन युक्त खाद्य पदार्थों को शामिल करने का सुझाव देती हैं। रोजाना 20-30 मिनट चलने और छह सप्ताह बाद प्लैंक जैसे व्यायाम शुरू करने से पेट की चर्बी सुरक्षित रूप से कम हो सकती है।

Web Title : Reduce post-pregnancy belly fat: Doctor's 4 tips for a flatter stomach.

Web Summary : Post-pregnancy belly fat is a common concern. Dr. Dipti Payghan suggests avoiding belly binding, limiting sugar, salt, and ghee, and including protein-rich foods. Walking 20-30 minutes daily and starting exercises like planks after six weeks can help reduce belly fat safely.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.