आईच्या दुधासारखा दुसरा पौष्टिक आहार बाळासाठी नाही. बाळ जन्मल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांपर्यंत फक्त आईचं दूध हे बाळासाठी चांगलं मानलं जातं.(breastfeeding benefits) बाळाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.(breastfeeding and brain development) अनेक अभ्यासातून असं समजून आलं की, सहा महिन्यांपर्यंत केवळ स्तनपान केलेल्या मुलांची बुद्धी ही अधिक तीक्ष्ण असते, त्यांची स्मरणशक्ती चांगली विकसित होण्यास मदत होते.(breastfeeding and child IQ) आणि पुढे जाऊन त्यांच्या शैक्षणिक कामगिरीतही सकारात्मक बदल पाहण्यास मिळतो. (breastfeeding health benefits)
मुलांसाठी आईचे दूध हे फक्त अन्नच नाही तर जीवनसत्त्व, प्रथिने, कॅल्शियम, फॅट्स आणि प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक असतात. नवजात बाळाच्या मेंदूच्या विकासाची प्रक्रिया ही पहिल्या सहा महिन्यात अतिशय वेगाने होते. या काळात योग्य पोषण मिळाल्यास मुलांचा IQ आणि एकाग्र क्षमता अधिक वाढते. तसेच आईचे दूध हे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवते. सर्दी, ताप यांसारख्या अनेक संसर्गजन्य आजारांपासून बचाव करते. मुलांच्या वाढीसाठी आईचे दूध अधिक महत्त्वाचे आहे.
ब्रिस्टल विद्यापीठाच्या एव्हॉन लॉन्गिट्यूडिनल स्टडी ऑफ पॅरेंट्स अँड चिल्ड्रन (ALSPAC) वर आधारित अभ्यासात जन्मापासून ते पौगंडावस्थेपर्यंत ५,००० हून अधिक मुलांचा समावेश होता. संशोधकांना असे आढळून आले की किशोरावस्थेत किमान सहा महिने स्तनपान केल्याने उच्च बुद्ध्यांक गुण, वाचन आणि गणितात चांगली शैक्षणिक कामगिरी आणि सुधारित भाषा कौशल्ये यांचा संबंध आहे.
ब्रिस्टल अभ्यासात स्तनपानाचा मेंदूच्या विकासावर मोजता येण्याजोगा प्रभाव पडतो याचे काही पुरावे उपलब्ध आहेत. सहा महिने ही एक महत्त्वाची मर्यादा असल्याचे दिसून येते, या कालावधीत स्तनपान करणाऱ्या मुलांमध्ये स्तनपान करणाऱ्या किंवा फॉर्म्युला-फिड केलेल्या मुलांपेक्षा बुद्ध्यांक गुण सातत्याने जास्त असतात.
डॉक्टर सांगतात “पहिल्या सहा महिन्यांत फक्त आईचं दूध दिलं तर मुलांचं शारीरिक आरोग्य मजबूत होतं आणि मानसिक विकास वेगाने होतो. यामुळे त्यांचा आत्मविश्वास, स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता दीर्घकाळ टिकते.”
आई आणि मुलामधील नातंही स्तनपानामुळे अधिक घट्ट होतं. आईच्या प्रेमात वाढणाऱ्या बाळाचं भावनिक संतुलन अधिक चांगलं असतं. मातृत्वाच्या या प्रवासात आईने आपल्या बाळाला सहा महिन्यांपर्यंत केवळ स्तनपान द्यावं, हे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर पूरक आहार सुरू करूनही स्तनपान सुरू ठेवण्याचा सल्ला दिला जातो. आईचे दूध हे बाळासाठी पोषण नाही तर बुद्धी, आरोग्य आणि उज्ज्वल भवितव्याचं भक्कम पायाभूत साधन आहे.