जन्म बाईचा, बाईचा, खूप घाईचा... सध्याच्या बदलत्या काळानुसार महिलांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. (Early menstruation in girls) वाढती जबाबदारी, कामाचा ताण यामुळे महिलांची तारेवरची कसरत पाहायला मिळते. ज्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. त्यातीलच एक मासिक पाळी. (Early puberty in girls) आजच्या काळात अनेक पालक एकाच प्रश्नाने त्रस्त झाले आहेत. माझ्या मुलीला एवढ्या लहान वयात पाळी का आली? ८ ते १० वर्षांच्या वयातच अनेक मुलींना मासिक पाळीला सामोरे जावे लागत आहे.(Why girls get periods early) ज्यामुळे पालकांची चिंता अधिक वाढतेय. याला अकाली पाळी किंवा Precocious Puberty असं देखील म्हणतात.(Causes of early menstruation) पूर्वी मुलींना १३ ते १४ वर्षांनंतर पाळी सुरु होत असे तिथे आज ती वयोमर्यादा खूप कमी झाली आहे.(Early period symptoms in teenage girls) नेमकं असं का होतंय? हे फक्त हार्मोन्समुळे आहे का, की त्यामागे आपल्या जीवनशैलीचा मोठा वाटा आहे? याविषयी जाणून घेऊया डॉक्टरांकडून. (Precocious puberty in girls)
डॉ. अरुणा कालरा यांच्या मते मुलींमध्ये मासिक पाळी लवकर येण्याची अनेक कारणे आहेत. त्या म्हणतात हल्ली मुली त्यांचा बहुतेक वेळ हा फोनवर घालवतात. ज्यामुळे त्या सतत एकाच जागी बसून असतात. मुलींनी थोडे बाहेर खेळायला जायला हवे, ज्यामुळे शारीरिक हालचाली होतील. सतत स्क्रीनच्या वापरामुळे फ्लॅशिंग लाईट्स मेंदूवर परिणाम करतो. जेव्हा मेलाटोनिनसारखे हार्मोन्स असंतुलित होतात. तेव्हा मुलींमध्ये लवकर मासिक पाळी येऊ शकते.
सध्या मुलांना बाहेरचे फास्ट फूड खाण्यास देखील अधिक आवडते. ज्यामुळे लहान वयात लठ्ठपणा वाढतो. यामुळे शरीरातील इस्ट्रोजेनची हार्मोन पातळी वाढून मासिक पाळी लवकर येते. मुलांनी कमी वयात अधिक ताण घेतल्यास कोर्टिसोल आणि एंड्रोजन हार्मोन्सची पातळी वाढल्यास देखील मासिक पाळी येऊ शकते. विविध कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये देखील हार्मोनल बदल घडवून आणणारे घटक असतात. ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.
डॉक्टर सांगतात मासिक पाळी दरम्यान वेदना होत असतील तर अनेक मुली औषधे घेतात पण असं करु नका. यामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. वेदना कमी करण्यासाठी रोज व्यायाम करा, पुरेसे आणि सकस आहार घ्या. ज्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होईल.
Web Summary : Girls are experiencing early puberty due to increased screen time, unhealthy diets, and stress. Doctors advise exercise and healthy eating instead of medication for menstrual pain to protect fertility.
Web Summary : स्क्रीन टाइम, अस्वास्थ्यकर आहार और तनाव बढ़ने के कारण लड़कियों में जल्दी यौवन आ रहा है। डॉक्टर प्रजनन क्षमता की रक्षा के लिए मासिक धर्म के दर्द के लिए दवा के बजाय व्यायाम और स्वस्थ भोजन करने की सलाह देते हैं।