Join us

पाळीच्या दिवसात काय करावे आणि काय टाळावे? सवयी अगदी साध्याच पण महत्त्वाच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2025 19:51 IST

What To Do And What To Avoid During Periods? : पाळीच्या दिवसात काही गोष्टी टाळाव्यात.

पाळीच्या दिवसात त्रास होणं नैसर्गिक आहे.  प्रत्येकीला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा त्रास होतो. हा  त्रास कमी व्हावा म्हणून काही जणी औषधं घेतात. पाळीत पेनकिलर घेऊ नये असं तज्ज्ञ सांगतात. पण मग हा होणारा त्रास कमी कसा करावा? कधीकधी आपल्या चुकीच्या सवयी या त्रासाला कारणीभूत ठरतात. पाळीच्या दिवसातील शरीराची क्षमता इतर दिवसांपेक्षा वेगळी असते. रोज आपण करतो, अशा काही कृती पाळीच्या दिवसात टाळल्याने देखील हा त्रास कमी करता येतो. रोज आपल्याला करायला आवडणार्‍या प्रक्रिया पाळीच्या दिवसांमध्ये शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतात. 

पाळीच्या काळात करायला हव्यात अशाही काही कृती आहेत. साध्या सोप्या असल्याने आपण दुर्लक्ष करतो. पण ते न करता काही सवयी लावून घेतल्यामुळे शरीराच्या वेदना आणि होणारा त्रास कमी करता येऊ शकतो.  अगदीच मान्य आहे की आता महिलांची लाईफस्टाइल बदलली आहे. ऑफिसाला जाणाऱ्या महिलांना काम करणे बंधनकारक आहे. घरची काम सोडून तर आपण आराम करू शकत नाही. पण काही सोप्या सवयी तर नक्कीच लावून घेऊ शकतो. पाळीच्या दिवसात काय करू नये आणि काय करावे ते जाणून घेऊया.

काय करणे टाळावे?

१. काहींना खुप जास्त त्रास होतो. मग त्या पेनकिलर्स घेतात. पण पाळीत पेनकिलर्स घेतल्याने शरीरातील उष्णता आणखी वाढते. त्यामुळे आल्याचा काढा किंवा आलेलिंबू रस प्या. पोटातील गॅस कमी झाल्यावर दुखणं कमी होते. आराम करा. झोप घ्या.

२. कॉफी प्यायल्याने बरं वाटतं. म्हणून आपण खुप जास्त कॉफी पितो. अति कॉफी पिणं चांगलं नाही. त्यात कॅफेन असतं. 

३. पाळीच्या दिवसात व्यायाम करू नये. शरीराला आरामाची गरज असते. शरीराच्या आत होणाऱ्या प्रक्रियांमुळे शरीर थकलेले असते. त्यामुळे पाळीच्या दिवसात व्यायाम करू नये. शरीराला आराम द्यावा.

काय करावे? १. पाळीच्या दिवसांत भरपूर पाणी प्यावे. पाण्यामुळे पोट साफ राहते. डिहायड्रेशन होत नाही. पोटाला थंडावा मिळतो.

२. क्रेविंग्स होतात म्हणून तळलेले पदार्थ खाऊ नका. पौष्टिक पदार्थ खा. अन्न थोड्या वेळेच्या अंतराने खा. सतत खात राहिल्याने पोटात धवळू शकते.

३. सकारात्मक गोष्टी वाचा. चांगली गाणी ऐका. मन प्रसन्न राहील अशा कृती करा.

४. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमेल तेवढा आराम करा.    

टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्यआरोग्यअन्नमहिला