Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > पाळी तर अनियमित होतेच, त्यात मानेवर दिसतात ‘असे’ डाग; PCOSची २ लक्षणं वेळीच ओळखली नाही तर..

पाळी तर अनियमित होतेच, त्यात मानेवर दिसतात ‘असे’ डाग; PCOSची २ लक्षणं वेळीच ओळखली नाही तर..

Symptoms of Polycystic Ovary Syndrome, darkening skin and.. : मानेवर २ गोष्टी दिसतील तर, आपल्याला PCOSचा तर धोका नाही ना? दुर्लक्ष करू नका..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2024 02:45 PM2024-06-24T14:45:33+5:302024-06-24T17:20:38+5:30

Symptoms of Polycystic Ovary Syndrome, darkening skin and.. : मानेवर २ गोष्टी दिसतील तर, आपल्याला PCOSचा तर धोका नाही ना? दुर्लक्ष करू नका..

Symptoms of Polycystic Ovary Syndrome, darkening skin and.. | पाळी तर अनियमित होतेच, त्यात मानेवर दिसतात ‘असे’ डाग; PCOSची २ लक्षणं वेळीच ओळखली नाही तर..

पाळी तर अनियमित होतेच, त्यात मानेवर दिसतात ‘असे’ डाग; PCOSची २ लक्षणं वेळीच ओळखली नाही तर..

महिलांमध्ये पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम) हा आजार सामान्य आहे (PCOS). हा आजार लवकर कळून येत नाही. पण बहुतांश महिलांना याबद्दल काही कल्पनाही नसते. पीसीओएस म्हणजे काय? यातून शरीराला काय धोका असतो? याबद्दल महिलांना ठाऊक असणं गरजेचं (Health Tips). पीसीओएस होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. ही समस्या चयापचय आणि हार्मोनल असंतुलनामुळे उद्भवते. ज्यांची मासिक पाळी अनियमित असते, त्यांना पीसीओएसचा धोका अधिक असतो(Symptoms of Polycystic Ovary Syndrome, darkening skin and..).

पीसीओएस म्हणजे काय?

पीसीओएस ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये अंडाशय जास्त प्रमाणात एंड्रोजन तयार करतात. हे हार्मोन्स पुरुषांमध्ये जास्त आणि स्त्रियांमध्ये कमी आढळतात. त्याच्या अधिक उत्पादनामुळे, अंडाशयात सिस्ट तयार होऊ लागतात. यामुळे अनियमित मासिक पाळी, लठ्ठपणा, केस गळणे, मुरुम आणि गर्भधारणा होण्यास त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर पीसीओएसमुळे महिलांचे मानसिक आरोग्यही बिघडते.

फक्त २ गोष्टी दह्यात कालवून खा, बॅड कोलेस्टेरॉलचा त्रास होईल कमी, रक्ताभिसरण होईल छान

जॉन हॉपकिन्स मेडिसिनच्या मते, 'पीसीओएस असलेल्या महिलांचे ओव्हुलेशन होत नाही. जेव्हा ओव्हुलेशन होत नाही, तेव्हा अंडाशयात अनेक लहान सिस्ट तयार होतात. जे एंड्रोजन नावाचे हार्मोन तयार करतात. या स्थितीत असलेल्या महिलांमध्ये एन्ड्रोजनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे त्यांच्या मासिक पाळीत समस्या निर्माण होतात.

पीसीओएसची काही लक्षणं

- ओटीपोटाजवळ फॅट्स जमा होणे.

- अनियमित मासिक पाळी.

- चेहऱ्यावर मुरूम.

- टक्कल किंवा केस पातळ होणे.

- वंध्यत्व.

मानेवर दिसतात दोन लक्षणे

जर आपल्याला पीसीओएस झाला असेल तर, मानेवर दोन लक्षणे दिसतील. काही लक्षणं आपल्याला काखेत देखील दिसतील. मान आणि काखेत आपल्याला चामखीळ दिसतील. दुसरे लक्षण मानेमागील त्वचेवर, काखेत किंवा स्तनांखाली गडद आणि जाड डागांच्या स्वरूपात दिसू शकते.

पावसाळ्यात चेहऱ्यावर दह्यात १ सोनेरी गोष्टी मिसळून जरूर लावा; मुरुमांचे डाग - टॅनिंग होईल गायब

हे स्पॉट्स कसे तयार होतात?

वजन वाढल्यामुळे इन्शुलीनची पातळी वाढते. त्यामुळे त्वचेवर काळे ठिपके तयार होतात. हे मानेच्या मागच्या बाजूला किंवा काखेत तयार होतात. त्यांना अकॅन्थोसिस म्हणतात. या लक्षणांमुळे आपल्याला कोलेस्टेरॉल किंवा ब्लड प्रेशरचा देखील त्रास होऊ शकतो.

पीसीओएसमुळे मानेचा रंग काळपट पडतो?

पीसीओएसमुळे मान, काख आणि बऱ्याच ठिकाणाची स्किन काळपट पडू लागते. शिवाय स्किन ऑइली देखील होते.

Web Title: Symptoms of Polycystic Ovary Syndrome, darkening skin and..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.