Join us

पाळीची तारीख सतत मागेपुढे होते? पाहा मासिक पाळी अनियमित होण्याची कारणं, नेमकं चुकतं काय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2025 17:46 IST

See the reasons for irregular periods, what to do ? : पाळी अनियमित येते? तारीख सारखी बदलते, तर पाहा काय कारणे असतात.

प्रत्येक महिन्याला त्याच तारखेला पाळी येईलच असे होत नाही. पाळीच्या दिवसात त्रास होणे जसे नैसर्गिक आहे तसेच पाळीची तारीख बदलणेही नैसर्गिकच आहे. (See the reasons for irregular periods, what to do ?)पण जर पाळी आठ-दहा पुढे मागे होते तर मग काही समस्या असू शकतात. महिलांच्या प्रत्येक कृतीचा परिणाम हा पाळीवर होतच असतो. आपला आहार, सवयी, झोपेचे चक्र याचा परिणाम पाळीवर होतोच. पीसीओडी, पीसीओएस असे त्रास आजकाल अनेक महिलांना असतात. त्याचे प्रमाण वाढतचं चालले आहे. मात्र काही महिलांना असे काही त्रास नसतानाही पाळी पुढे मागे होते. त्यामागे काही कारणे असतात. दुर्लक्ष करु नका. पाळी वेळेवर येणे गरजेचे आहे. नाही तर त्याचा शारीरिक त्रास होतोच मात्र मानसिक त्रासही होतो. पाहा काय कारणे असू शकतात. 

१. मानसिक त्रास असतील कोणत्याही गोष्टीचा अति विचार करत असाल तरी त्याचा पाळीवर परिणाम होतो. केअर हॉस्पिटल्सच्या साईटवर सांगितल्यानुसार, ताण हार्मोनल संतुलन बिघडवतो. (See the reasons for irregular periods, what to do ?)त्यामुळे पाळीवर परिणाम होतो. पाळी पुढे मागे होतेच मात्र चुकूही शकते. त्यामुळे मानसिक तणाव वेळीच कमी करायला हवा. 

२. वजन जास्त असेल किंवा अति कमी असेल तरीही पाळीच्या तारखांवर परिणाम होतो. स्थुलता असेल तर अनेक त्रास उद्भवतात. तसेच वजन अगदीच कमी असल्याने रक्तस्त्राव कमी होतो. 

३. थायरॉईडच्या त्रासाचे प्रमाणही फार वाढले आहे. ओव्हअॅक्टिव्ह थायरॉईड तसेच अंडरअॅक्टिव्ह थायरॉईड मासिक पाळीवर परिणाम करतात. पाळी उशीरा येण्या मागचे कारण थायरॉईड असू शकते. 

४. गर्भनिरोधक गोळीचा वापर आजकाल फार वाढला आहे. मोठ्या महिलाच नाही तर तरुणीही या गोळ्या सतत घेतात. त्यांचा परिणाम थेट पाळीवर होतो. तसेच पाळी दरम्यानही जास्त त्रासही होतो. 

५. पाळी पुढे मागे करण्यासाठीही गोळ्या मिळतात. त्या गोळ्यांचा वापर आजकाल फार केला जातो. एखाद्या समारंभासाठी किंवा फिरायला जाताना तरुणी अशा गोळ्या घेतात. या गोळ्या आता फार कॉमन आहेत. मात्र त्या सतत घेतल्याने पाळीचे चक्र बिघडते. अशा गोळ्या घेऊ नयेत . 

टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्यमहिलाहेल्थ टिप्स