Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांनी घेतला तरुणीचा जीव, डॉक्टरांचा सल्ला - तुम्हीही सणउत्सवात 'असं ' करत असाल तर..

पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांनी घेतला तरुणीचा जीव, डॉक्टरांचा सल्ला - तुम्हीही सणउत्सवात 'असं ' करत असाल तर..

Period delay pills took the life of a young woman, doctor's advice - If you too are doing 'this' during festivals then you must stop : पाळी पुढे ढकलण्याची चूक पडली फारच महागात. पाहा काय घडले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2025 15:17 IST2025-08-24T15:15:25+5:302025-08-24T15:17:03+5:30

Period delay pills took the life of a young woman, doctor's advice - If you too are doing 'this' during festivals then you must stop : पाळी पुढे ढकलण्याची चूक पडली फारच महागात. पाहा काय घडले.

Period delay pills took the life of a young woman, doctor's advice - If you too are doing 'this' during festivals then you must stop | पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांनी घेतला तरुणीचा जीव, डॉक्टरांचा सल्ला - तुम्हीही सणउत्सवात 'असं ' करत असाल तर..

पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांनी घेतला तरुणीचा जीव, डॉक्टरांचा सल्ला - तुम्हीही सणउत्सवात 'असं ' करत असाल तर..

महिलांना एखादा सण जवळ आल्यावर सतावणारी गोष्ट म्हणजे पाळीची तारीख. कोणताही सण असो पाळी येऊन गेलेली बरी किंवा सणात येऊ नये यासाठी मग विविध उपाय केले जातात. जसे की उष्ण पदार्थ खायचे, लवंग चघळायची, व्यायाम करायचा आणि इतरही काही गोष्टी केल्याने पाळी लवकर  येते असे मानले जाते. (Period delay pills took the life of a young woman, doctor's advice - If you too are doing 'this' during festivals then you must stop)जर हे सगळे करुन लवकर आली नाही मग एकच उपाय ती पुढे ढकलणे. त्यासाठी मग मुली गोळी घेतात. पाळी पुढे ढकलण्याची गोळी घेणे आता फार सामान्य झाले आहे. उत्सवांसाठी तुम्हीही जर अशा गोळ्या घेत असाल तर अजिबात घेऊ नका.  डॉ. विवेकानंद यांनी रिबुटींग द ब्रेन या पॉडकास्टवर त्यांचा एक भयंकर अनुभव सांगितला. 

डॉक्टरांकडे एक १८ वर्षाची मुलगी पायाला सुज आल्यामुळे तपासणीसाठी गेली होती. सोबत पालक नव्हते तर तिच्या मैत्रिणी होत्या. डॉक्टरांनी तिला तपासले. मुलगी फार त्रासातून जात होती. तिचे पाय आणि मांड्या  सुजून चांगल्याच फगल्या होत्या. Deep vein thrombosis ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे. मुलीला त्याचाच त्रास असावा असा अंदाज डॉक्टरांनी लावला. तिच्या घरच्यांना बोलवले आणि त्यांना कल्पना दिली. मुलीशी संवाद साधून नक्की त्रास कशामुळे झाला याची त्यांनी चौकशी केली. तेव्हा डॉक्टरांना समजले की काही दिवसांपुर्वी घरी पुजा असल्यामुळे त्या मुलीने पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतल्या होत्या. सलग तीन दिवस गोळ्या घेतल्या आणि नंतर पुजाही केली. त्याचाच हा साईड इफेक्ट असावा असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला. 

मुलीच्या वडिलांना सगळे सांगितले आणि मुलीला ताबोडतोब दवाखान्यात भरती करण्याचा सल्ला दिला. मात्र वडिलांनी सांगितले की आम्ही उद्या सकाळी येऊ. मुलीची आई दवाखान्याची गरज नाही असे म्हणत होती. डॉक्टरांनी समजवण्याचा प्रयत्न केला मात्र पालकांनी ऐकले नाही. त्याच रात्री दोन वाजता डॉक्टरांना फोन आला की सकाळच्याच मुलीला पुन्हा दवाखान्यात आणले आहे. तिचा श्वास बंद होत आहे. डॉक्टरांना ताबडतोब दिला तपासायला घेतले मात्र तोवर तिचा जिव गेला होता. एका पूजेसाठी घेतलेली गोळी आणि पालकांचा निष्काळजीपणा एका १८ वर्षाच्या मुलीच्या जीवावर बेतला. डॉ. म्हणतात, म्हणून मी मुलींना कायम सांगतो सणांसाठी गोळ्या घेणे टाळा. गणपतीसाठी जर तुम्हीही अशा गोळ्या घेत असाल तर तसे करणे थांबवा. कोणताही सण जीवापेक्षा महत्त्वाचा नाही.      
  

Web Title: Period delay pills took the life of a young woman, doctor's advice - If you too are doing 'this' during festivals then you must stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.