Join us

PCOS मुळे महिलांना होतात गंभीर आजार, रिसर्चचा धक्कादायक खुलासा-स्वत:ची तब्येत आधी सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2025 17:21 IST

PCOS in women: PCOS causes and effects: Polycystic ovary syndrome risks: आयआयटी मुंबईच्या संशोधकांना असे आढळून आले की, पीसीओडी आणि पीसीओएस केवळ शारीरिकच नाही संज्ञानात्मक आरोग्यावरही परिणाम करतात.

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे महिलांना अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे.(PCOS in women) यातील सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे मासिक पाळी.(PCOS causes and effects) मासिक पाळीचे हे चक्र २८ दिवसांचे असते. परंतु, ती वेळेवर आली नाही तर स्त्रियांना चिंता सतावू लागते.(Polycystic ovary syndrome risks) आजकाल खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे महिलांना पुरेसे पोषकतत्व मिळत नाही.(PCOS health complications)  पोषकतत्वांच्या कमतरतेमुळे पीसीओडी आणि पीसीओएस सारख्या समस्येला तोंड द्यावे लागते.(Hormonal imbalance in women) पीसीओडी आणि पीसीओएसच्या समस्यांमुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते. तर शरीराच्या काही भागात केसांची वाढ होऊ शकते.(PCOS and serious illnesses) तसेच वंध्यत्व देखील येऊ शकते. या आजारात अंडाशयात एक किंवा अधिक सिस्ट असतात ज्यामुळे आपले हार्मोनल असंतुलित होते. (Long-term effects of PCOS)

शुद्ध तुपाचं घरगुती काजळ, डोळे दिसतील सुंदर आणि केमिकल असलेले धोकादायक काजळ वापरणं बंद

आयआयटी मुंबईच्या संशोधकांना असे आढळून आले की, पीसीओडी आणि पीसीओएस केवळ शारीरिकच नाही संज्ञानात्मक आरोग्यावरही परिणाम करतात. पीसीओएस ग्रस्त महिलांमध्ये लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होती तर त्यांचा प्रतिसाद हा ५६ टक्के कमी होता.  तसेच अभ्यासात असे आढळून आले की, पीसीओएस असलेल्या महिलांना इन्सुलिन प्रतिरोधकता आणि उच्च एंड्रोजन पातळी असण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे लक्ष केंद्रित करण्यावर परिणाम होतो. इन्सुलिन प्रतिरोधनामुळे ग्लुकोज चयापचय बिघडतो आणि मेंदूच्या पेशींच्या क्रियाकलापांवर परिणाम होतो, ज्यामुळे लक्ष केंद्रित करण्यास अडचण येते. 

International Menstrual hygiene Day : मासिक पाळी म्हणजे विटाळ नव्हे, महिलांनी टाळायला हव्या ५ चुका

पीसीओएस असणाऱ्या महिलांना लक्ष केंद्रित करण्यास अडचण येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. ज्यामुळे त्यांना दैनंदिन कामे करणे देखील कठीण होऊ शकतात. याचा सगळ्यात जास्त परिणाम हा मेंदूवर होतोय त्यामुळे स्मरणशक्ती कमकुवत होते आहे. त्यामुळे महिलांना एकाच वेळी अनेक कामे हाताळतांना त्रास होऊ शकतो. 

 

टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्यआरोग्य