What Is Pap Smear Test : सर्वाइकल कॅन्सर हा आजच्या महिलांसाठी एक मोठं आव्हान ठरत आहे. WHO च्या आकडेवारीनुसार, दरवर्षी लाखो महिला या कॅन्सरच्या शिकार होतात. पण एक अशी टेस्ट आहे ज्याबाबत जास्तीत महिलांना माहीत नाही, जी या कॅन्सरपासून बचाव करू शकते. याबाबत डॉक्टर तरंग कृष्णा यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे.
डॉक्टर तरंग कृष्णा सांगतात की, दुर्दैवाने जास्तीत जास्त महिलांना या आजाराची माहिती तेव्हा मिळते, जेव्हा आजार खूप जास्त वाढलेला असतो. पण एक अशी टेस्ट आहे जी करून या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो. महत्वाची बाब म्हणजे ही टेस्ट फार सोपी आणि केवळ 5 मिनिटांची आहे. या टेस्टचं नाव आहे पॅप स्मीअर टेस्ट (Pap Smear Test).
काय आहे पॅप स्मीअर टेस्ट?
पॅप स्मीअर एक सोपी टेस्ट असून ज्यात गर्भाशय ग्रीवा (सर्विक्स) मधून काही पेशी घेऊन मायक्रोस्कोपमधून बघितल्या जातात. यातून हे स्पष्ट होतं की, पेशींमध्ये काही असामान्य बदल तर होत नाहीये ना. कारण हाच बदल पुढे जाऊन कॅन्सरचं रूप घेऊ शकतो.
कधी आणि कशी करावी टेस्ट?
डॉक्टर तरंग कृष्णा यांच्यानुसार, पॅप स्मीअर टेस्ट करण्यासाठी मासिक पाळी संपल्यानंतर लगेचची वेळ चांगली मानली जाते. महत्वाची बाब म्हणजे यात ना वेदना होतात आणि जास्त वेळ लागत. काही मिनिटांमध्ये ही टेस्ट होते.
या टेस्टचे फायदे?
जर सर्वाइकल कॅन्सरला सुरूवातीच्या काळातच पकडलं गेलं, यावर चांगले उपचार होऊ शकतील आणि तो नष्टही होऊ शकेल. ही टेस्ट महिलांना आजार सुरू होण्याआधीच संकेत देते.
WHO नुसार, जर प्रत्येक महिलेने वेळोवेळी पॅप स्मीअर टेस्ट केली, तर सर्वाइकल कॅन्सरच्या केसेस अर्ध्या कमी केल्या जाऊ शकतात.