Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > PCOD, मासिक पाळीचा त्रास यावर उपयुक्त आयुर्वेदिक बस्ती उपचार, ते नक्की काय असतात?

PCOD, मासिक पाळीचा त्रास यावर उपयुक्त आयुर्वेदिक बस्ती उपचार, ते नक्की काय असतात?

आयुर्वेदानुसार पंचकर्मापैकी बस्ती ही शोधन चिकित्सा पावसाळ्यात करून घेणे अतिशय उत्तम असते. यामुळे शरीरातील जुनाट व्याधी तर कमी होतातच पण त्यासोबतच मासिक पाळीतले पोट दुखणे आणि PCOD हा त्रास देखील कमी होतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 01:27 PM2021-07-14T13:27:43+5:302023-09-21T15:56:24+5:30

आयुर्वेदानुसार पंचकर्मापैकी बस्ती ही शोधन चिकित्सा पावसाळ्यात करून घेणे अतिशय उत्तम असते. यामुळे शरीरातील जुनाट व्याधी तर कमी होतातच पण त्यासोबतच मासिक पाळीतले पोट दुखणे आणि PCOD हा त्रास देखील कमी होतो.

Panchkarma, Basti ayurvedic treatment for PCOD and menstrual period pain | PCOD, मासिक पाळीचा त्रास यावर उपयुक्त आयुर्वेदिक बस्ती उपचार, ते नक्की काय असतात?

PCOD, मासिक पाळीचा त्रास यावर उपयुक्त आयुर्वेदिक बस्ती उपचार, ते नक्की काय असतात?

Highlightsजसे कोणतेही मशिन उत्तम चालण्यासाठी नियमितपणे सर्व्हिसिंग करणे गरजेचे असते, तसेच कार्य बस्तीचे आहे. यामुळे शरीराची शुद्धी होते.

डॉ. पद्मा जगदिश तोष्णीवाल
(बीएएमएस, डी. एन. एच. ई.)

मासिक पाळीतील पोटदुखी म्हणजे अनेक तरूणी आणि महिलांसाठी वैताग. पोट दुखणे, पोटऱ्यांमध्ये वात येणे, कंबरदुखी, पाठदुखी, मळमळ असे अनेक त्रास तरूणींना या चार दिवसांमध्ये होत असतात. काही जणींचा त्रास तर इतका जास्त असतो, की कॉलेज, ऑफिसला सुटी टाकून घरी आराम करण्याशिवाय पर्याय नसतो. दर महिन्याला हा त्रास सहन करणे टाळायचे असेल, तर पंचकर्मापैकी एक असणारी बस्ती क्रिया यासाठी फायदेशीर ठरते. 

 

बस्ती म्हणजे काय ? 
आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी व बऱ्याच वात व्याधींमध्ये बस्ती या पंचकर्माचा विशेष फायदा होतो.
स्नेहन व स्वेदन म्हणजेच संपूर्ण शरीराची मालिश व वाफ या पुर्वकर्मानंतर औषधीद्रव्ये गुदावाटे शरीरात प्रविष्ट करणे म्हणजेच बस्ती. बोलीभाषेत याला एनिमा म्हणूनही संबोधतात. यामुळे शरीरात वाढलेले दोष म्हणजेच टॉक्सिन्स आतड्यांवाटे बाहेर पडतात. म्हणूनच शरीर शुद्धीसाठी पावसाळ्यात वर्षातून एकदा बस्ती करून घ्यावी.

 

बस्तीचे फायदे
१. वाताचे नियमन करणे.
२. शरीर धातूंचे पोषण व वर्धन करणे.
३. जसे कोणतेही मशिन उत्तम चालण्यासाठी नियमितपणे सर्व्हिसिंग करणे गरजेचे असते, तसेच कार्य बस्तीचे आहे. यामुळे शरीराची शुद्धी होते.
४. पचनशक्ती सुधारून ॲसिडीटी व पोटाचे विकार नाहीसे होतात.
५. संधिवात, गुडघेदुखी, कंबरदुखी, टाचदुखी, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो, पक्षाघात, अल्झायमर या विकारांमध्ये बस्तीचा खूप होतो.
६. अतिस्थुलता व मेदरोगासाठीही बस्तीचिकित्सा वरदान ठरते.

 

बस्तीविषयी आणखी काही
- बस्ती हा शब्द अन्य रूपांतही आयुर्वेदात वर्णिला आहे. जसे मन्याबस्ती, कटीबस्ती, जानुबस्ती, हृदयबस्ती. यामध्ये मान, गुडघेदुखी, कंबरदुखी या लक्षणांमध्ये त्या- त्या अवयवांवर तेल धारण केले जाते. त्यामुळे अवयवांना बळकटी मिळते.

 

पीसीओडी आणि मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी उत्तरबस्ती
जननेंद्रिय व मुत्रमार्गामध्ये विशिष्ट औषधी सोडण्याची प्रक्रिया म्हणजे उत्तरबस्ती. वंध्यत्व, पीसीओडी, पाळीतील अतिरक्तस्त्राव, पाळीतील पोटदुखी यासारख्या विकारांवर उत्तरबस्ती फायदेशीर ठरते. तसेच अनियंत्रित मुत्रप्रवृत्ती (चाळिशीनंतर स्त्रियांमध्ये शिंकताना किंवा खोकताना मुत्रप्रवृत्ती होताना आढळते.) टाळण्यासाठी उत्तरबस्ती खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे ज्यांना मासिक पाळीचा खूपच त्रास आहे, अशा महिलांनी, तरूणींनी एकदा बस्ती करून बघावी.

( लेखिका डॉ. पद्मा जगदिश तोष्णीवाल औरंगाबाद येथे आहार मार्गदर्शक आहेत.) 

 

Web Title: Panchkarma, Basti ayurvedic treatment for PCOD and menstrual period pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.