Join us   

Irregular Periods Causes : एक-दोन महिने पाळी आलीच नाही तर काय बिघडतं? घाबरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला लक्षात घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 4:17 PM

Irregular Periods Causes : मासिक पाळी एकाच वेळी थांबली किंवा तीन ते चार महिन्यांनी आली तर तुम्हाला एमेनोरिया (amenorrhea)  होऊ शकतो. ही समस्या मासिक पाळीशी संबंधित समस्या आहे, ज्यामध्ये मासिक पाळी येणे थांबते

महिलांना दर महिन्याला येणारे पीरियड्स (Menstrual Health) त्यांच्या दैनंदिन कामांवर परिणाम करतात. त्याच वेळी, पाळी वेळेवर असणे देखील महत्त्वाचे आहे. परंतु कधीकधी चुकीच्या आहारामुळे महिलांना अनियमित मासिक पाळीच्या समस्येला सामोरे जावे लागते, ज्यामुळे खूप अस्वस्थ वाटतं. जर मासिक पाळी पुढे-पुढे जात असेल, तर योग्य आहारात किंवा दिनचर्येत थोडासा बदल करून ही समस्या बरी होऊ शकते.( Irregular Periods Causes)

पण जर मासिक पाळी एकाच वेळी थांबली किंवा तीन ते चार महिन्यांनी आली तर तुम्हाला एमेनोरिया (amenorrhea)  होऊ शकतो. ही समस्या मासिक पाळीशी संबंधित समस्या आहे, ज्यामध्ये मासिक पाळी येणे थांबते. ही स्थिती रजोनिवृत्ती किंवा गर्भधारणेपेक्षा खूप वेगळी आहे. या लेखात तुम्हाला एमेनोरियाचे कारणं, लक्षणे आणि उपचारांबद्दल सांगणार आहोत.

१) प्राइमरी एमेनोरिया (Primary Amenorrhea)

या स्थितीत १६ व्या वर्षीही मासिक पाळी येत नाही, ज्याला प्राथमिक एमेनोरिया म्हणतात. अशा परिस्थितीत महिला डॉक्टरांच्या मदतीने या दुर्मिळ अवस्थेवर मात करू शकतात. ही समस्या जननेंद्रियांशी संबंधित अनुवांशिक किंवा संरचनात्मक विकारांमुळे असू शकते. याचे निदान अनुवांशिक चाचणी आणि हार्मोन चाचणीद्वारे केले जाऊ शकते.

२) सेकेंडरी एमेनोरिया (Secondary Amenorrhea)

या स्थितीत महिलांची मासिक पाळी 3 किंवा अधिक महिने थांबू शकते. ही समस्या सहसा गर्भधारणेदरम्यान किंवा स्तनपान करताना उद्भवू शकते. याशिवाय, अंडरएक्टिव्ह थायरॉईड, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हे देखील या समस्येचे कारण बनू शकतात. गर्भधारणा चाचणी, इमेजिंग चाचणी इत्यादीद्वारे ते शोधले जाऊ शकते.

एमेनोरियाचे लक्षण

निपल्समधून पांढरं पाणी बाहेर येणं

स्तनाच्या आकारात बदल.

केस गळण्याची समस्या.

डोकेदुखी होणे.

वजन वाढणे किंवा कमी होणे.

दृष्टीतील बदल किंवा डोळ्यांच्या इतर समस्या

चेहऱ्यावर केसांचे प्रमाण वाढणे.

आवाज जड होतो.

ओटीपोटात वेदना हे याचे लक्षण असू शकते.

योनीमध्ये कोरडेपणा जाणवणे.

कारणं

जास्त व्यायाम करणं, जेव्हा शरीराचे वजन सामान्यपेक्षा कमी असते, औषधाच्या प्रतिक्रियेमुळे, केमोथेरपीमुळे, काही गर्भनिरोधक गोळ्यांमुळे, हार्मोन्समधील बदलांमुळे याशिवाय, इतर काही कारणे असू शकतात ज्यामुळे एमेनोरियाची स्थिती उद्भवू शकते.

एमोनियाचे उपचार

एमेनोरियाच्या कारणावर उपचार अवलंबून असतात. काही प्रकरणांमध्ये, गर्भनिरोधक गोळ्या बंद केल्याने किंवा इतर हार्मोन थेरपी घेतल्याने मासिक पाळी सुरू होऊ शकते. थायरॉईड किंवा पिट्युटरीशी संबंधित समस्यांमुळे होणार्‍या एमेनोरियाचा उपचार औषधांनी केला जाऊ शकतो. जर ट्यूमरमुळे एमेनोरिया होत असेल तर शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते.

टॅग्स : हेल्थ टिप्सस्त्रियांचे आरोग्य