मासिक पाळीचे ४ दिवस अनेकी जणींसाठी खूप कठीण जातात. काही जणींचे तर भयानक पोट दुखते. काही जणींची तर पाठ आणि कंबरही आखडून जाते. हा त्रास एवढा जास्त असतो की पाळी आल्यानंतर कित्येक मुलींना शाळा- कॉलेज बुडवून घरी बसावे लागते. कारण त्या त्रासात घराबाहेर पडायलाही नकोसे होऊन जाते. यासोबतच बहुतांश महिलांना आणि मुलींना पाळीच्या काळात जाणवणारा त्रास म्हणजे पोटऱ्यांमध्ये गोळे येऊन पाय भयानक दुखणे. या त्रासामध्ये पोटऱ्या आत ओढल्यासारख्या होतात आणि खूप वेदना जाणवतात. हा त्रास रात्रीच्या वेळी तर खूप वाढतो (how to get relief from leg cramps during periods?). पायाच्या दुखण्यामुळे मग शांत झोपही लागत नाही (how to get rid of leg cramps during periods?). असा त्रास तुम्हालाही होत असेल तर तो का होतो आणि त्यावर कोणते उपाय करणं गरजेचं आहे ते पाहा..(causes of leg cramps in menstruation cycle)
पिरियड्सच्या दरम्यान पोटऱ्यांमध्ये गोळे का येतात?
१. मासिक पाळी सुरू होत असताना आपल्या शरीरात जे काही हार्मोन्स स्त्रवत असतात त्यामुळे गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावतात. त्याचा परिणाम पाय, पाठ, कंबर आणि पोटाच्या स्नायूंवरही दिसून येतो.
२. ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असते त्यांच्याही पोटऱ्यांमध्ये नेहमीच गोळे येतात.
जावई माझा भला! विराट कोहली म्हणतो, अनुष्काच्या आईबाबांनीही मला समजून घेतलंच ना, कारण..
३. ज्यांच्या शरीराला अजिबातच व्यायामाची सवय नसते, चालणे खूप कमी असते त्यांनाही हा त्रास नेहमी होतो.
४. पोटऱ्यांमध्ये गोळे येणे हे शरीरात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम कमी असण्याचे एक लक्षण आहे.
पोटऱ्यांमध्ये गोळे येऊ नये म्हणून काय उपाय करावे?
१. आहारातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण वाढवावे.
२. रोज नियमितपणे थोडा तरी असा व्यायाम करावा की ज्यामुळे पोटऱ्यांच्या स्नायूंवरचा ताण कमी होईल. काही मिनिटांसाठी वॉकिंग केले तरी चालेल.
३. पोटऱ्यांमध्ये जर खूप दुखत असतील तर गरम तेलाने पोटऱ्यांना मालिश करा. तेथील रक्ताभिसरण चांगले होऊन दुखणं कमी होईल.
इन्स्टंट नूडल्सला द्या चटकदार पंजाबी तडका! रिमझिम पावसात या नूडल्स खाऊन पाहाच- घ्या रेसिपी
४. पोटावर झोपा आणि गुडघ्यांच्या खाली उशा ठेवून त्यावर पाय ठेवा. अशा पद्धतीने पाय थोडे उंच केल्यानेही त्रास कमी होईल.
५. विपरित करणी हे आसन केल्यानेही पोटऱ्या दुखणे कमी होते. त्यासाठी पाठीवर झोपा आणि पाय भिंतीला सरळ रेषेत लावून उभे ठेवा. दोन्ही हात जमिनीवर आडवे पसरवून ठेवा.