पाळी जरी सगळ्या महिलांना येत असली तरी तिची रुपरेखा प्रत्येकीची वेगळी असते. वजन, वय, उंची सगळ्या बाबींचा पाळीवर परिणाम होत असतो. (How many days of bleeding is normal during menstruation? 5 important things, know about your periods ) आहार, पाणी पिण्याचे प्रमाण, झोपण्याची वेळ एवढेच नाही तर आपल्या सवयींचाही पाळीच्या चक्रावर परिणाम होत असतो. काही जणांना पाळी जास्त दिवस येते तर काहींना कमी दिवस. काही महिलांच्या अंगावरुन भरपूर रक्त जाते त्या उलट काही महिलांचा रक्तस्त्राव अगदी कमी असतो. आजकाल पीसीओडी आणि इतर पाळीसंबंधी त्रास वाढत आहेत. असे त्रास सुरु होण्याआधी पाळी सुरळीत चालू आहे का ? काही चुकत तर नाही ना हे तपासणे गरजेचे असते.
पाळी आल्यावर पाळीची तपासणी करुन त्या दिवसातील आपले वागणे आणि शरीराच्या हालचालींवरुन पाळी सुरळीत आणि व्यवस्थित आहे का काही बिघाड आहे का ? हे जाणून घेता येते. डॉ. आचलएमडी यांच्या पॉडकास्टवर सांगितल्यानुसार पाळी
कधी, कशी येणे सामान्य आहे आणि एखाद्या त्रासची कोणती लक्षणे आहेत हे पाहता येते.
१. पाळी दर महिन्याला येणे गरजेचे असते. पाळी येऊन गेल्यावर दोन पाळींमध्ये २१ ते ३५ दिवसांचा वेळ जाणे अगदी सामान्य आहे. काहीच चिंतेचे कारण नाही. जर तुम्हाला पुन्हा १५ दिवसातच पाळी आली किंवा दोन महिने आलीच नाही तर लगेच डॉक्टरांकडे जाऊन या. असे होणे चांगले नाही.
२. पाळीत सगळ्यांना कमी-जास्त दिवस रक्तस्त्राव होतो. २ ते ७ दिवसांपर्यंत रक्त जाणे अगदी सामान्य आहे. दोन दिवस व्यवस्थित रक्त जाणे म्हणजे कमी दिवस नाहीत. पण जर एकच दिवस रक्त जातं ते ही कमी तर गडबड आहे. तसेच सातपेक्षा जास्त दिवस रक्त जाणेही आरोग्यासाठी चांगले नाही.
३. रक्तस्त्रावाचे प्रमाण प्रत्येकाचे वेगळे असते. पण अगदी खुपच जास्त रक्त जाणे चांगले नाही. दर दोन तासाने जर पॅड बदलावे लागते तर रक्त फारच जास्त जात आहे. आणि दिवसभर एकच लावलं तरी चालेल असे असणेही चांगले नाही. मध्यम रक्तस्त्राव हवा. ते फार महत्त्वाचे असते.
४. रक्ताच्या गुठळ्या जाणे सामान्य आहे. त्यात घाबरण्यासारखे काही जाही. मात्र जर भरपूर जात असतील तर मग ते चांगले नाही. थोड्या गुठळ्या जाणे ठिके आहे न जाणेही ठिकंच आहे. पण अति जाणे नाही. आकाराला लहानच असावेत. मोठ्या गुठळ्या जाणे चांगले नाही.
५. पोट दुखणे अगदी साहाजिक आहे. मात्र जर त्रास असह्य होतो. साधे ऑफीसला , कॉलेजला, शाळेत जाणे आणि रोजची साधी कामं करणेही शक्य होत नसेल तर मग एवढा त्रास बरा नाही. डॉक्टरांशी संवाद साधा.