Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मासिक पाळी चुकली म्हणून गोळ्या घेतल्या? ५ घरगुती उपाय-वेदना होतील कमी

मासिक पाळी चुकली म्हणून गोळ्या घेतल्या? ५ घरगुती उपाय-वेदना होतील कमी

Foods to get periods immediately: Home remedies for missed periods: मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी आपण कोणते उपाय करायला हवे पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2026 13:21 IST2026-03-20T13:20:16+5:302026-03-20T13:21:11+5:30

Foods to get periods immediately: Home remedies for missed periods: मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी आपण कोणते उपाय करायला हवे पाहूया.

Home remedies for delayed periods Masik pali yenyasathi gharguti upay How to regularize periods naturally Period pain relief home remedies Ayurvedic treatment for irregular periods | मासिक पाळी चुकली म्हणून गोळ्या घेतल्या? ५ घरगुती उपाय-वेदना होतील कमी

मासिक पाळी चुकली म्हणून गोळ्या घेतल्या? ५ घरगुती उपाय-वेदना होतील कमी

मुली वयात आल्या की त्यांच्या शरीरात अनेक बदल होतात. असंतुलित हार्मोन्स, चिडचिडेपणा, तारुण्य, चेहऱ्यावर केस येणं आणि मासिक पाळी. मासिक पाळीचे हे चक्र प्रत्येक महिन्याच्या २८ दिवसानंतर येते. या पाच दिवसात महिल्यांच्या शरीरात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होताना दिसतात.(Foods to get periods immediately) कधीकधी धावपळीचं आयुष्य, कामाचा ताण, अपुरी झोप आणि बदलता आहार यामुळे या नैसर्गिक चक्रात अडथळे येतात.(Home remedies for missed periods) जेव्हा दोन-तीन महिने पाळी येत नाही किंवा ती वेळेवर येत नाही, तेव्हा मनात एक प्रकारची अस्वस्थता आणि भीती निर्माण होणं साहजिक आहे. अशा वेळी आपण पटकन आराम मिळावा म्हणून औषधांकडे वळतो, पण कधीकधी आपल्या शरीराला गरज असते ती केवळ थोड्या विश्रांतीची आणि निसर्गाच्या सोबतीची.(Pali lavkar yenyasathi gharguti upay)
आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक नैसर्गिक गोष्टी आहेत, ज्या आपल्या आजी-पणजींच्या काळापासून वापरल्या जात आहेत. या गोष्टी केवळ शरीरातील उष्णता वाढवत नाहीत, तर अतिशय हळुवारपणे हार्मोन्स संतुलित करून नैसर्गिकरीत्या पाळी येण्यास मदत करतात.(Irregular periods solution in marathi) या उपायांमुळे केवळ वेळेवर पाळीच येत नाही, तर त्या काळात होणारा त्रास आणि वेदनाही कमी होतात. मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी आपण कोणते उपाय करायला हवे पाहूया. 

Elephant Bangles Design : पाटल्या-तोड्यांसह शोभतील हातात हत्ती अंबारीच्या बांगड्या, ५ लेटेस्ट डिझाइन्स-महाराणीसारखे श्रींमत दिसतील हात

1. कच्ची पपई हा मासिक पाळी नियमित करण्यासाठी सर्वात जुना आणि प्रभावी उपाय आहे. पपईमध्ये कॅरेटीन असते. जे शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनला उत्तेजित करते. कच्च्या पपईच्या सेवनामुळे गर्भाशयाच्या स्नायूंना आकुंचन मिळण्यास मदत होते. ज्यामुळे थांबलेले पाळी वेळेत येते. पण अतिप्रमाणत कच्ची पपई खाल्ल्यास तोंड येणे किंवा घसा दुखू शकतो. 

2. आल्यामध्ये दाहशामक गुणधर्म असतात आणि गूळ उष्ण आहे. आल्याचा छोटा तुकडा किसून तो पाण्यात उकळा आणि त्यात थोडा गूळ मिसळा. हे कोमट पाणी दिवसातून दोन वेळा प्यायल्याने शरीरातील उष्णता वाढते आणि रक्ताभिसरण सुधारते. यामुळे मासिक पाळी वेळेवर येते आणि पाळी दरम्यान होणाऱ्या क्रॅम्प्सपासूनही आराम मिळतो. 

3. दालचिनी फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर इन्सुलिनची पातळी नियंत्रित करण्यास आणि हार्मोन्स संतुलित होण्यास मदत होते. ज्या महिलांना PCOD मुळे मासिक पाळीचा त्रास होतो, त्यांच्यासाठी दालचिनी रामबाण उपाय आहे. एक ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा दालचिनी पावडर घालून रोज रात्री प्यायल्याने पाळीचे चक्र सुधारते आणि ती नियमितपणे येते. 

4. तिळामध्ये लिग्नान नावाचे घटक असतात जे हार्मोन्स बांधून ठेवण्यास मदत करतात. ओवा पोटाच्या तक्रारी आणि वेदना कमी करण्यासाठी उत्तम आहे. एक चमचा तीळ आणि अर्धा चमचा ओवा पाण्यात उकळवून प्या. हे मासिक पाळी येण्याच्या १० दिवस आधीपासून केल्यास आपल्याला पाळी वेळेवर येते. तसेच त्रासही कमी होतो. 

5. कोरफडीचा ताज गर काढून त्यात चमचाभर मध मिसळा. हे मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी घेतल्याने मासिक पाळीशी संबंधित सर्व समस्या हळूहळू दूर होतात. कोरफड शरीरातील मेटॅबॉलिझम सुधारून प्रजनन आरोग्याला चालना देते. तसेच रोज किमान ३० मिनिटे चाला, व्यायाम करा. भरपूर पाणी प्या, पुरेशी झोप आणि योग्य आहार देखील घ्या. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला देखील घ्या. 
 

Web Title : मासिक धर्म में देरी? राहत के लिए ये 5 घरेलू उपाय आजमाएं।

Web Summary : मासिक धर्म में देरी हो रही है? पपीता, अदरक, दालचीनी, तिल-अजवाइन और एलोवेरा जैसे प्राकृतिक उपचार चक्र को नियमित करने और परेशानी को कम करने में मदद कर सकते हैं। व्यायाम करें, हाइड्रेटेड रहें और जरूरत पड़ने पर डॉक्टर से सलाह लें।

Web Title : Missed Period? Try these 5 home remedies for relief.

Web Summary : Late period? Natural remedies like papaya, ginger, cinnamon, sesame-carom seeds, and aloe vera can help regulate cycles and reduce discomfort. Exercise, hydrate, and consult a doctor if needed.