Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > सतत कंबर-पाठ दुखते,अंगावर पांढरं पाणी जातं? सोपे घरगुती उपाय - दुखणं होईल कमी, आराम मिळेल

सतत कंबर-पाठ दुखते,अंगावर पांढरं पाणी जातं? सोपे घरगुती उपाय - दुखणं होईल कमी, आराम मिळेल

lower back pain remedies: white discharge problem women: home remedies for back pain: व्हाईट डिस्चार्ज कमी करण्यासाठी काय करायला हवं, जाणून घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2026 12:31 IST2026-02-10T12:29:34+5:302026-02-10T12:31:01+5:30

lower back pain remedies: white discharge problem women: home remedies for back pain: व्हाईट डिस्चार्ज कमी करण्यासाठी काय करायला हवं, जाणून घ्या.

home remedies for constant lower back pain in women white discharge causes and natural remedies how to reduce back pain and weakness naturally women health issues home treatment tips | सतत कंबर-पाठ दुखते,अंगावर पांढरं पाणी जातं? सोपे घरगुती उपाय - दुखणं होईल कमी, आराम मिळेल

सतत कंबर-पाठ दुखते,अंगावर पांढरं पाणी जातं? सोपे घरगुती उपाय - दुखणं होईल कमी, आराम मिळेल

सध्याच्या धावपळीच्या युगात घराची जबाबदारी, मुलांचे शिक्षण, ऑफिसचे काम आणि नातेसंबंधांची होणारी ओढाताण हे सगळं करताना अनेक स्त्रिया स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.(lower back pain remedies) थोडं तर दुखतय, होईल बरं.. असं म्हणत ती प्रत्येक वेदना सहन करते. पण जेव्हा कंबर दुखू लागते, ओटीपोटात दुखत किंवा अंगावरुन पांढरं पाणी जातं, तेव्हा शरीर कमकुवत होऊ लागते. (white discharge problem women)
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाठ आणि ओटीपोटात होणारी वेदना आपल्या शरीराला आतून थकवत असते.(home remedies for back pain) अनेक स्त्रियांना कंबरदुखीचे कारण व्हाईट डिस्चार्ज असू शकतं हे माहित नाही. हे केवळ शारीरिक दुखणे नसून, त्यामुळे येणारा अशक्तपणा स्त्रीच्या मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम करतो. म्हणून या समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळीच घरगुती उपाय करायला हवे. 

फक्त १५०० रुपयांत ‘तिच्या’साठी साऊथ सिल्कचा रॉयल ड्रेस- ‘त्याच्या’साठी मॅचिंग शर्ट! प्यारवालं शॉपिंग..

स्त्रियांच्या शरीरातील लुकोरिया प्रमाणाहून अधिक वाढला की, शरारीतील आवश्यक पोषक तत्वे कमी होतात. यामुळे हाडांची झीज होते आणि त्याचा परिणाम आपल्या कंबर, पाठ आणि ओटीपोटीवर होतो. यामुळे पाय दुखणे, चिडचिड होणे किंवा प्रचंड थकवा जाणवतो. व्हाईट डिस्चार्ज कमी करण्यासाठी काय करायला हवं, जाणून घ्या. 

1. मेथी दाण्याचे पाणी महिलांच्याआरोग्यासाठी वरदान आहे. यासाठी २ चमचे मेथी दाणे रात्री पाण्यात भिजवा आणि सकाळी ते पाणी उकळून प्या. यामुळे व्हाईट डिस्चार्ज कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे कंबरदुखीचा त्रास कमी होतो. 

2. तांदळाचे पाणी हे व्हाईट डिस्चार्जर रामबाण उपाय आहे. हा सर्वात जुना आणि प्रभावी उपाय आहे. तांदूळ शिजवल्यानंतर त्याचे उरलेले पाणी किंवा पेज प्या. यामुळे व्हाईट डिस्चार्जचा त्रास कमी होतो. 

चेहऱ्यानुसार ‘असे’ निवडा कानातले, पाहा गोल-चौकोनी-लांबट चेहऱ्यावर कोणते कानातले शोभून दिसतात..

3. व्हाईट डिस्चार्जमुळे आपल्याला अशक्तपणा आला असेल तर रोज सकाळी भिजवलेले चणे आणि गूळ खा. यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते आणि कंबरदुखीपासून आराम मिळतो. 

4. पांढऱ्या पाण्याचा त्रास जास्त असेल, तर रोज एक पिकलेले केळे थोडे तूप लावून खावे. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. तसेच आपल्याला शरीराच्या स्वच्छतेची देखील काळजी घ्यायला हवी. रोज कोमट पाण्याने योनी स्वच्छ करा. मासिक पाळीच्या वेळी लैंगिक संबंध टाळा. जिरे, ओवा आणि तीळाच्या तेलाने कंबरचे हलकी मालिश करणे फायदेशीर ठरू शकते.
 

 

Web Title : पीठ दर्द और सफेद पानी से राहत: सरल घरेलू उपचार।

Web Summary : महिलाओं में पीठ दर्द और सफेद पानी कमजोरी का संकेत हो सकता है। मेथी का पानी, चावल का पानी, भिगोए हुए चने और गुड़, और घी के साथ केला जैसे घरेलू उपचार राहत प्रदान कर सकते हैं और आयरन के स्तर को बढ़ा सकते हैं। सर्वोत्तम परिणामों के लिए स्वच्छता बनाए रखें।

Web Title : Relief from back pain and white discharge: Simple home remedies.

Web Summary : Back pain and white discharge in women can indicate weakness. Home remedies like fenugreek water, rice water, soaked chickpeas with jaggery, and ghee with banana can provide relief and boost iron levels. Maintain hygiene for best results.