Join us

महिलांनी सॅनिटरी पॅड वापरल्याने वंध्यत्वाचा त्रास वाढतो? तज्ज्ञ सांगतात योग्य काय, पॅडने होतं काय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2025 11:26 IST

Sanitary pads and infertility: Do pads cause infertility: Health risks of sanitary pads: Pads vs infertility myths: Menstrual products and fertility: Toxic chemicals in sanitary pads: सॅनिटरी पॅड्स वापरु नये असे मत डॉक्टरांनी मांडले आहेत.

प्रत्येक महिन्याच्या २८ दिवसांनंतर महिलांना मासिक पाळी येते. या पाच दिवसांत महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.(Sanitary pads and infertility) पाळी येण्यापूर्वीच आपल्या ओटी-पोटीत दुखणे, पाय, कंबरदुखी सुरु होते. त्यात घर आणि ऑफिसचे काम सांभाळण जरा कठीणच होते. मासिक पाळी म्हटलं की, पॅड वापरणे आलेच.(Do pads cause infertility) पूर्वीच्या काळी स्त्रिया मासिक पाळीच्या दरम्यान रक्तस्त्राव शोषून घेण्यासाठी कापड वापरला जायचा. बदल्या जीवनशैलीनुसार आपल्याकडे पाळीच्या दरम्यान सॅनिटरी नॅपकीन्स वापरण्याची संख्या अधिक वाढली आहे. (Health risks of sanitary pads) सध्या बाजारात याचे विविध प्रकारचे ब्रॅण्डही आपल्याला पाहायला मिळतात. हे पॅड्स वापरायला सोपे असल्यामुळे अनेक महिला वर्ग याची निवड करतात. (Pads vs infertility myths) हल्ली यामध्ये ऑर्गेनिक पॅड, टेम्पॉन, मेंस्ट्रुअल कप यांचा देखील समावेश आहे. नियमित पॅड वापरल्याने आरोग्याच्या तक्रारी देखील कमी झाल्या तसेच ते वापरणे महिलांना देखील अधिक सोपे झाले. प्लास्टिकच्या पॅडचा पर्यावरणासह आरोग्याला देखील धोका निर्माण होतो.(Menstrual products and fertility) 

पाळीत असह्य पोट दुखतं, रक्तस्त्राव कमी होतो? वजन कमी करण्याचं फॅड पडेल महागात! पाहा परिणाम...

परंतु सॅनिटरी पॅड्स वापरु नये असे मत डॉक्टरांनी मांडले आहेत. इन्स्टाग्रामच्या हॅण्डलवरुन डॉक्टर स्मिता यांनी एक व्हिडीओ शेअर केला. त्या म्हणताय की, महिलांनी सॅनिटरी पॅडचा वापर करणे आताच थांबवायला हवे. सॅनिटरी पॅड्स बनवताना खूप साऱ्या हानिकारक केमिकल्स वापरले जातात. जसं की Dioxin, pthalates, synthetic fragrance चा वापर केला जातो. या केमिकल्सला इंडिनोक्राइन डिस्क्रप्टर्स असं म्हटलं जातं. जेव्हा हे केमिकल्स त्वचेच्या संपर्कात येतात तेव्हा आपल्या हार्मोन्समध्ये बदल होतात. तसेच ते आपल्या प्रायव्हेट पार्टच्या संपर्कात आल्यावर आपल्या खाज सूटते, प्रजनन संस्थेचे विकार देखील होतात. 

पॅड्स ओलसरपणा धरुन ठेवतात त्यामुळे फंगल इनफेक्शन, बॅक्टेरिअल इनफेक्शन होण्याचा धोका अधिक वाढतो. तसेच हे पॅड ऑर्गेनिक नसेल तर पर्यावरणाला देखील धोका निर्माण होतो. यासाठी डॉक्टरांनी मेंस्ट्रुअल कप वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ऑर्गेनिक पॅड्समध्ये नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो. हे पॅड्स बांबूपासून, केळीच्या पानांपासून तयार केलेले फायबर, सेंद्रिय कापूस यापासून तयार केलेले असतात. त्यामुळे आरोग्याला धोका देखील कमी प्रमाणात होतो. 

टॅग्स : आरोग्यमहिलामासिक पाळी आणि आरोग्य