स्त्रीचं शरीर आयुष्यभर अनेक टप्प्यांतून जात असतं. बालपण, तारुण्य, गर्भधारणा आणि त्यानंतर येतो तो मेनोपॉज. डॉक्टरांच्या भाषेत सांगायचं झालं तर शरीरात होणारा एक नैसर्गिक बदल. पण प्रत्यक्षपणे या बदलांना सामोरं जाणं मात्र तितकं सोपं नसतं. (Soha Ali Khan menopause) रजोनिवृत्तीविषयी फारसं कुणी बोलत नाही. पण स्त्रीच्या शरीरात होणारे बदल हे देखील त्यांना समजत नाही. हा काळ वयाच्या ४० व्या वर्षी सुरु होतो. परंतु काही महिलांमध्ये तो ३५ व्या वर्षीही दिसू लागतो. (Hormonal changes in women)
लग्नात नवरीच्याच नाहीतर ताई-वहिनी-नणंदबाईंच्या गळ्यातही शोभून दिसतो चोकर! पाहा ५ सुंदर डिझाइन्स
अभिनेत्री सोहा अली खानने सोशल मीडियावर सांगितलं की ती सध्या प्रीमेनोपॉजमधून जात आहे. ती म्हणते की टेस्ट करताना यात आपली हार्मोन्सची पातळी दिसून येते. यामध्ये स्त्रियांना बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं. याविषयी कुणासमोर उघडपणे बोलता देखील येत नाही. ती म्हणते कोणतीही स्त्री, मग ती अभिनेत्री असो किंवा सामान्य व्यक्ती मेनोपॉजच्या त्रासातून सारखीच जात असते. शरीरातील हार्मोन्समध्ये होणारे बदल अचानकपणे मूड स्विंग, चिडचिड, झोपेचा त्रास, अचानक घाम येणे, वजन वाढ, त्वचा कोरडी होणे, हाडे दुखणे अशा अनेक समस्यांना निमंत्रण देतात. आणि या सगळ्यापेक्षा मोठी समस्या म्हणजे एकटेपणा. कारण अनेकदा स्त्रिया हा त्रास शब्दांत व्यक्तही करू शकत नाहीत.
ती म्हणते की तिच्यासाठी हा प्रवास शारीरिक बदलांपेक्षा मनाने स्वीकारणं अधिक कठीण होतं. आयुष्यभर आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवत असतो. पण मेनोपॉज येतो आणि अचानक सगळं नियंत्रण सुटल्यासारखं वाटतं. आपली जणू ओळखं हरवते. शरीरातील एक महत्त्वाची गोष्ट हरवली की काय असं वाटतं. पण ही परिस्थिती मी योग्य आहार, व्यायाम आणि माझा वेळ आपल्या माणसांच्या सहवासात घालवायला सुरु केला. हा टप्पा प्रत्येक स्त्रिच्या आयुष्यात कधी ना कधी येतो. याविषयी उघडपणे बोलणे अनेक स्त्रियांना जमत नाही. ती असं ही म्हणाली की रजोनिवृत्ती ही कमजोरी नाही, आपण आपल्या शरीरावर प्रेम करायला हवं, हा बदल स्विकारायला हवा..
