Cancer Risks in Women: मेनोपॉज प्रत्येक महिलेच्या जीवनात येणारी एक नॅचरल स्थिती आहे. सामान्यपणे मेनोपॉजचा कालावधी हा ४५ ते ५५ वयादरम्यान सुरू होतो. या स्थितीत मासिक पाळी बंद होते आणि शरीरातील हार्मोन्समध्ये अनेक बदल होतात. हॉट फ्लॅशेज, रात्री झोप येणे, मूड स्विंग, थकवा व्हजायनल ड्रायनेस आणि फोकस करण्यास समस्या या काळात कॉमन होतात. त्याशिवाय मेनोपॉजनंतर महिलांना काही प्रकारच्या कॅन्सरचा धोकाही वाढू शकतो. याबाबत महिलांना योग्य ती माहिती असल्यास त्यात सतर्क राहू शकतात. आज World Cancer Day निमित्ताने जाणून घेऊया मेनोपॉजनंतर महिलांमध्ये कोणत्या कॅन्सरचा धोका अधिक असतो.
मेनोपॉजनंतर कॅन्सरचा धोका का वाढतो?
मेनोपॉजनंतर शरीरात अॅस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोनचं प्रमाण फार कमी होतं. या बदलामुळे काही कॅन्सर, खासकरून ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर आणि ओव्हरी कॅन्सरचा धोका वाढू शकतो. तसेच वाढतं वय देखील कॅन्सरचं कारण ठरू शकतं. कारण काळानुसार शरीराची खराब कोशिका ठीक करण्याची क्षमता देखील कमी होते.
कोणत्या कॅन्सर अधिक लक्ष दिलं पाहिजे?
ब्रेस्ट कॅन्सर - हा कॅन्सर मेनोपॉजनंतर महिलांमध्ये आढळणारा सगळ्यात कॉमन कॅन्सर आहे. परिवारातील कॅन्सरची हिस्ट्री, लठ्ठपणा, मद्यसेवन आणि कमी फिजिकल अॅक्टिविटी धोका वाढवू शकते.
गर्भाशयाचा कॅन्सर - हा कॅन्सर सुद्धा मेनोपॉजनंतर अधिक बघायला मिळतो. खासकरून अशा महिलांमध्ये ज्या लठ्ठपणाच्या शिकार आहेत, ज्यांना डायबिटीस आहे किंवा हार्मोनल असंतुलनाचा सामना करत आहेत.
आतडीचा कॅन्सर - वाढत्या वयासोबत या कॅन्सरचा धोका देखील वाढतो. त्यामुळे नियमित चेकअप केलं पाहिजे.
लाइफस्टाइलची भूमिका काय?
मेनोपॉजनंतर वजन वाढणं सामान्य आहे, पण जास्तीची चरबी कॅन्सरचा धोका वाढवू शकते, कारण फॅट टिश्यूमधून थोड्या प्रमाणात अॅस्ट्रोजन तयार होतं.
धोका कमी करण्यासाठी
नियमित व्यायाम
हिरव्या भाज्या, फळे आणि कडधान्यांचा आहार
मद्यपान मर्यादित ठेवणे
धूम्रपान टाळणे
स्क्रीनिंग आणि सुरुवातीची लक्षणे का महत्त्वाची?
नियमित तपासणी अनेकदा जीव वाचवू शकते. महिलांनी, नियमित स्तन तपासणी, वयानुसार बॉवेल आणि सर्व्हायकल कॅन्सरची चाचणी केली पाहिजे. जर मेनोपॉजनंतर असामान्य रक्तस्राव, दीर्घकाळ पोट फुगणे, सतत अपचन, कारण नसताना वजन वाढणे किंवा घटणे अशी लक्षणे दिसली, तर ती दुर्लक्षित करू नयेत.
Web Summary : Post-menopause brings hormonal changes, increasing the risk of breast, uterine, and bowel cancers. Regular exercise, healthy diet, limited alcohol, and avoiding smoking can reduce risk. Early screening is crucial; don't ignore unusual symptoms.
Web Summary : मेनोपॉज के बाद हार्मोनल बदलाव से स्तन, गर्भाशय और आंत के कैंसर का खतरा बढ़ जाता है। नियमित व्यायाम, स्वस्थ आहार, सीमित शराब और धूम्रपान से बचने से जोखिम कम हो सकता है। शुरुआती जांच महत्वपूर्ण है; असामान्य लक्षणों को अनदेखा न करें।