Join us

केसांवरुन हात फिरवला तरी चार केस हातात येतात? तुमच्याच काही सवयी तर कारणीभूत नाहीत ना? पाहा काय चुकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2025 18:47 IST

your wrong habits can cause hair fall see how : या काही चुकीच्या सवयी बदला केस गळायचे थांबतील.

केस गळणे ही समस्या फार वाढत चाल्ली आहे. कारणे अनेक आहेत. प्रदूषण हे त्यातील मुख्य कारण. तसेच धूळ व माती केसांवर बसते त्यामुळे केस खराब होतात. पाण्यामुळेही केस गळतात. (your wrong habits can cause hair fall see how)आजकाल पाणी शुद्ध उरलेले नाही. प्रदूषित पाण्यामुळे केस गळतात. आपण विविध ब्यूटी प्रॉडक्ट्स केसांसाठी वापरतो. त्यामध्ये भरपूर रसायने असतात. त्यामुळेही केस खराब होतात. मात्र काही वेळा आपणच आपल्या केसांची वाट लाऊन घेतो. काही आपल्याच सवयी आपलाच घात करतात. अगदी साध्या सवयी आहेत त्यामध्ये काही तोटा असू शकतो हा विचारही मनात येणार नाही. (your wrong habits can cause hair fall see how)मात्र वेळीच या सवयी बदलल्या तर केसाचे होणारे वाटोळे थांबता येईल. 

१. केस मानेवर लटकट असतील तर घाम येतो. तसेच त्वचेवर केस हुळहूळतात. म्हणून बरेचदा केस वरती घट्ट बांधतो. काही जणी हाय पोनी बांधतात. तर काही रबरमध्ये केस गुंडाळून घट्ट बांधून टाकतात. घट्ट आंबाडा कम्फर्टेबल वाटतो. मात्र त्यामुळे समोरून केस तुटतात. केस घट्ट बांधल्याने मुळांपाशी ते सैल पडतात. त्यामुळे मग केस गळतात. केसांची छान वेणी घाला. किंवा आंबाडा जरा सैल बांधा. वेणीमध्ये केस छान राहतातही तसेच गुंता होत नाही. 

२. केसांवरुन अंघोळ करताना बऱ्याच जणी एक चूक करतात. जी फार महागात पडते. केस गरम पाण्याने धुतल्याने केसांची मजबुती कमी होते. गरम पाण्याने अंघोळ करताना मस्त वाटते. मात्र केसांना गरम पाणी लागल्यावर केस कोरडे पडतात. केसाची मुळेही कमकुवत होतात. तसेच केसांचे तेल पूर्णच निघून जाते. बाहेरुन लावलेले तेल नाही तर केसांच्या वाढीसाठी मुळांजवळ असणारा हा द्रव केसांचे रक्षण करतो. त्यामुळे केसांवर गरम पाणी घेऊ नका. कोमट पाणी वापरा.

३. आजकाल बाजारात बरेच प्रॉडक्ट आहेत जे केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरले जातात. केसांचा रंग असेल किंवा मग विविध शाम्पू व कंडीश्नर असतील. इतरही सिरम मिळतात. जाहिरात पाहून आपण त्याला भुलतो. मात्र अशी प्रॉडक्ट वापरणे केसांसाठी चांगले असतेच असे नाही. त्यामुळे चुकीचे प्रॉडक्ट वापरल्याने केस गळतात. व्यवस्थित अभ्यास करुन मगच प्रॉडक्ट वापरा. 

४. केसांना तेल लावल्याने केस चिपचिपीत होतात. दिसताना मग ते चिकट-चापट दिसतात. म्हणून अनेक जणी केसांना तेलच लावत नाहीत. केसांना तेलाची गरज असते. रात्री झोपताना छान चांगले खोबरेल तेल किंवा मग बदामाचे तेल केसांना लावणे फायदेशीर ठरते. तेल लावायचेच नाही असे करु नका. तेलामुळे केसांना पोषण मिळते.    

टॅग्स : केसांची काळजीहेल्थ टिप्सब्यूटी टिप्सहोम रेमेडी